या 5 गोष्टींमुळे अडचणीत येऊ शकतं तुमचं लव्ह लाइफ

तुमचं नातं दिर्घकाळ टिकावं असं वाटत असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी वेळीच लक्षात घेणं गरजेचं आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 10, 2019 10:26 PM IST

या 5 गोष्टींमुळे अडचणीत येऊ शकतं तुमचं लव्ह लाइफ

आजकाल प्रत्येकाला नात्यामध्ये सुरक्षितता हवी असते. मात्र अनेकदा काही लहान-लहान वादांचं रुपांतर मोठ्या भांडणात होतं आणि मग नाती तुटतात. पण तुम्हाला जर तुमचं नातं दिर्घकाळ टिकावं असं वाटत असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी वेळीच लक्षात घ्यायला हव्यात. नाहीतर तुमचं लव्ह लाइफ कायम स्वरूपी धोक्यात येऊ शकतं.

तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये सतत वाद होत असतील तर एका कालावधीनंतर त्या व्यक्तीबद्दलच्या भावना संपतात. तुम्ही त्या नात्यावर कितीही विश्वास ठेवत असाल तरीही तुमच्यातील प्रेम संपलेलं असेल तर असं नातं फार काळ टिकू शकत नाही.

नातं म्हटलं की तिथं भांडणं आलीच. मात्र तुम्ही हे भांडण कशाप्रकारे मिटवता त्यासोबतच तुमचं भांडण कोणत्या गोष्टींवरून होतं हे समजून घेणं महत्त्वाचं असतं. तुम्ही एकाद्या चुकीच्या गोष्टीवरून तुमच्या जोडीदाराशी वाद घालत असाल तर ही तुमच्या नात्यासाठी धोक्यची घंटा आहे.

भांडणं किती झाली तरी आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवणं त्या नात्यासाठी खूप गरजेचं असतं. जर तुम्ही वारंवार जोडीदारावर अविश्वास दाखवत असाल तर तुमचं नातं धोक्यात येऊ शकतं.

ओव्हर पझेसिव्ह हा नात्यासाठी धोक्याचा असतो. आपल्या जोडीदाराची अतिकाळजी करणं किंवा सतत त्याचाच विचार करणं यामुळे तुमचं नातं धोक्यात येतं. त्यामुळे तुमच्यातमध्ये लहान लहान कारणांनी वाद सुरू होतात.

Loading...

तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराचे विचार एकमेकांशी पटत नसतील किंवा तुम्ही दोघंही वेगवेगळ्या भविष्याचा विचार करत असाल तर मग तुम्ही एकमेकांवर कितीही प्रेम करत असाल तरीही ते नातं फार काळ टिकू शकत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2019 06:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...