पावसाळ्यात हे 5 पदार्थ नक्की खा, चांगले राहील तुमचं आरोग्य

पावसाळ्यात अनेक आजार पसरतात, म्हणूनच या दिवसात आपल्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यावं लागतं.

  • Share this:

सध्या पावसाळा सुरू झाला आहे. अशावेळी आपल्याला आपल्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. कारण पावसाच्या दिवसात अनेक आजार पसरतात. जाणून घ्या असे कोणते पदार्थ आहेत जे खाल्यानं पावसाच्या दिवसातही तुमचं आरोग्य चांगलं राहतं.

अनेकांना पावसाच्या दिवसात चाट आणि भजी खावीशी वाटते. मात्र यामुळे आरोग्य बिघडू शकतं. त्यापेक्षा पावसाळ्यात सूप प्यायची सवय लावा. यामध्ये भरपूर न्यूट्रीशन असतात. तसेच सूप पचन्यासाठी हलकं असतं.

पावसाच्या दिवसात उकडलेल्या भाज्या खाव्यात. भाज्या हलक्या उकडून त्या खाल्यानं त्यातील पोषक तत्त्व कायम राहतात. पण यामुळे शरीरातील नुकसान करणारे किटाणू मारले जातात. उकडलेली ब्रोकली, मशरूम, गाजर आणि टोमॅटो अशा भाज्या खाणं पावसाच्या दिवसात आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं.

पावसाळ्यात ज्यूसपेक्षा स्मूदी पिणं जास्त फायदेशीर ठरतं. फळं आणि ताज्या भाज्यांपासून बनवलेली स्मूदीज जास्त हेल्दी असते. यामुळे शरीराला इतर अनेक फायदे होतात.

पावसाळ्यात जास्त ड्रायफ्रूट्स खायला हवेत. यामुळे शरीरातील इम्यूनिटी वाढते. तसेच शरीरात ताकद राहिल्यानं आजारांपासून तुम्ही लांब राहता. पण प्रमाणापेक्षा जास्त ड्रायफ्रूट्स खाऊ नयेत.

चहा आणि पावसाचं वेगळं नातं आहे. पण पावसाच्या दिवसात शक्यतो तुलसी चहा प्या. कारण यातील एंटीऑक्सीडेंट तुम्हाला अनेक रोगांपासून दूर ठेवतात आणि तुम्ही निरोगी राहता. शक्य असेल तर चहामध्ये तुळशीच्या पानांचा वापर करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 20, 2019 06:44 AM IST

ताज्या बातम्या