Elec-widget

या एका डिवाइसने आता पुरुषांचं टक्कल होईल दूर

या एका डिवाइसने आता पुरुषांचं टक्कल होईल दूर

सध्याच्या बदल्या जीवनशैलीमुळे पुरुषांचे केस जास्त प्रमाणात गळतात.

  • Share this:

चेहऱ्याच्या सौंदर्यामध्ये केसांना फार महत्त्व आहे. महिलांच्या सौंदर्यात तर केसांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर पुरुषांच्याही स्टायलिश लुकसाठी केस असणं फार महत्त्वाचं आहे. पण सध्याच्या बदल्या जीवनशैलीमुळे पुरुषांचे केस जास्त प्रमाणात गळतात. सतत केस गळल्यामुळे पुरुषांमध्ये टक्कल होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहे. मात्र संशोधकांनी या समस्येवर रामबाण उपाय शोधून काढला आहे.

संशोधकांनी एक नवीन उपकरण शोधून काढलं आहे हे उपकरण कोणत्याही टोपीच्या खाली वापरले जाऊ शकते. या उपकरणाचं वैशिट्य म्हणजे हे व्यक्तीच्या शरीरातूनच उर्जा घेतं आणि केसांच्या मुळांना उत्तेजित करण्यासाठी इलेक्ट्रिक पल्स पाठवतं. या उपकरणाच्या मदतीने पुन्हा एकदा केस यायला मदत होते.

हे उपकरण वजनाने हल्क असून हे वापरणाऱ्या व्यक्तिच्या शरीरातील उर्जा घेत असल्यामुळे कोणत्याही बॅटरी किंवा इलेक्ट्रॉनिक गोष्टींची गरज पडत नाही. पुरुष कोणत्याही टोपीमध्ये हे डिवाइस ठेवू शकतात. अमेरिकेतील विस्कॉन्सिन मॅडिसन यूनिवर्सिटीचे प्रोफेसर यांनी हे डिवाइस नेहमीच्या वापरासाठी चांगलं असल्याचं म्हटलं.

या संशोधनचं प्रकाशन जर्नल एसीएस नॅनोने केलं आहे. यात दरदिवशी शरीरातून जी उर्जा निघते त्याला संग्रहित करून उपकरण केसांच्या वाढीला मदत करतं. यात त्वचेतून इलेक्ट्रिक पल्स पाठवून कमकूवत झालेल्या फालिकल्सला पुन्हा सक्रिय करतात आणि केसांच्या वाढीला मदत करतात.

Research- ...म्हणून महिलांना असतो पुरुषांपेक्षा कमी पगार

Loading...

तुमच्यासाठी फायदेशीर आहे धनुरासन, जाणून घ्या आसन करण्याची योग्य पद्धत

5 Tips: गुळाचे हे फायदे वाचून तुम्ही साखर खाणं सोडाल

आज जेवणाची ही प्राचीन पद्धत सारेच विसरले, जाणून घ्या कधी आणि कसं जेवायचं!

VIDEO: पुण्यात बिबट्याची दहशत! पहाटेच्या सुमारास भरवस्तीत दिसला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2019 12:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...