मुंबई, 28 मार्च : कॅन्सर आणि हृदय रोग हे आजार भयंकर समजले जातात. हल्ली हे आजार होऊनही माणूस औषधौपचारानं बरा होऊ शकतो. पण यापेक्षाही आहे एक भयंकर आजार. आणि तो जास्त पसरतोय.
हा आजार आहे डिप्रेशनचा. हल्ली बिघडलेल्या लाइफस्टाइलमुळे डिप्रेशन वाढतंय. बऱ्याचदा एकटेपणामुळे हा आजार होतो. तज्ज्ञांच्या मते एकटेपणामुळे हार्टअॅटॅक येण्याचा धोका 40 टक्के वाढतो. म्हणूनच हा आजार जास्त धोकादायक आहे.
रिसर्चप्रमाणे जे लोक एकटे आहेत, त्यांना क्राॅनिक डिसिसचा धोका जास्त आहे. अशा लोकांना काॅर्डियोवस्कुलर आजार इतरांपेक्षा होण्याची शक्यता जास्त आहे. या लोकांना डिप्रेशनचा धोकाही जास्त असतो.
डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तींना लवकर मृत्यू यायची शक्यता 50 टक्के जास्त असते. म्हणूनच तुम्हाला असा कोणी व्यक्ती आढळला, तर डाॅक्टरांशी संपर्क करायला सांगा. अशा व्यक्तींचं वजन एक तर जलद वाढतं तरी किंवा कमी तरी होतं. बराच काळ या व्यक्ती उदास राहतात. त्यांच्यात नकारात्मकता जास्त असते.
या आजारावर डाॅक्टर गोळ्याही देतात. पण निसर्गानंच डिप्रेशनवर औषधं तयार केलीयत. त्यानं खूपच फायदा होतो. जाणून घेऊ अशाच काही नैसर्गिक औषधांबद्दल
यात पहिलं नाव येतं ते अश्वगंधाचं. ही वनस्पती तुमचा स्ट्रेस कमी करते. यातल्या अॅक्टिव कंपाउंड्समध्ये अँटी-डिप्रेसेंट असतं. दुसरं औषध आहे ब्रह्मी. यामुळे स्ट्रेसशी लढण्याची ताकद मिळते. ब्रह्मीमुळे तुम्ही शांत होता.
याशिवाय जटामासी औषधाचाही वापर करा. यात अँटी-डिप्रेसेंट, अँटी - स्ट्रेस आणि अँटी-फटीग असे गुणधर्म असतात. जटामासीमुळे तुमचा मूड स्विंग होत असेल तर तो सुधारतो. मनातला ताण कमी होतो.
पुदिनाही औषधी आहे. पुदिना नियमित खाल्ल्यानं तुम्ही डिप्रेशनपासून वाचता. पुदिना खाल्ल्यानं मेंदू शांत रहातो आणि शरीरही थंड राहतं.
तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येतो. तुम्ही दु:खी आहात याची जाणीवही तुम्हाला होत नाही. तेव्हा समजा तुम्हाला डिप्रेशन आहे. मित्रमैत्रिणींपासून दूर राहणं, स्वत:ला एकटं समजणंही डिप्रेशन असू शकतं. डिप्रेशन असलेल्या व्यक्तीला आयुष्यात काय करायचंय, याचं उत्तर सापडत नाही. ती व्यक्ती फोकस नसते.
मोदी, घराणेशाही आणि पहिल्या भाषणावर काय म्हणाले पार्थ पवार; UNCUT मुलाखत