मिल्कशेक, चहा-कॉफीत टाका नारळ तेलाचे काही थेंब; आरोग्याला होतील बरेच फायदे

मिल्कशेक, चहा-कॉफीत टाका नारळ तेलाचे काही थेंब; आरोग्याला होतील बरेच फायदे

आहारात नारळाच्या तेलाचा (coconut oil) वापर करण्याशिवाय अशा पद्धतीने नारळ तेलाचं सेवन करणंही फायदेशीर आहे.

  • Last Updated: Sep 24, 2020 01:47 PM IST
  • Share this:

नारळाचं तेल म्हणजेच कोकोनट ऑइल हे आरोग्य आणि सौंदर्य उत्पादनांमध्ये लोकप्रिय आहे. हे तेल केस, त्वचेसाठी वापरलं जातं. तसंच आहारातही याचा वापर केला जातो. नारळाच्या तेलाला 'सुपरफूड' असं म्हणतात. नारळाच्या तेलात असलेले फॅटी अॅसिड्स आरोग्यावर सकारात्मक प्रभाव करू शकतात. ज्यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते. हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारतं, मेंदूच्या कार्यांनाही प्रोत्साहन मिळतं.

myupchar.com चे डॉ.लक्ष्मीदत्त शुक्ल म्हणतात की, नारळाचं तेल सेवन करताना त्याची योग्य पद्धत आणि योग्य वेळ माहिती असणं फार महत्त्वाचं आहे. नारळाच्या तेलाचा वापर स्वयंपाकात होतो. मिल्कशेकमध्ये या तेलाचे काही थेंब मिसळून पिणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. शिवाय मिल्कशेक चविष्टही लागतं. चहा किंवा कॉफीमध्येदेखील तुम्ही तेल मिसळून पिऊ शकता. नारळाच्या तेलाचा वापर चॉकलेट तयार करण्यासाठीही केला जातो. विशेषत: सकाळी हे तेल वापरल्यानं आरोग्यास अधिक फायदा होतो. सकाळी सेवन केल्यास पचन चांगलं होतं. अशा प्रकारे नारळाच्या तेलाचं सेवन केल्यास शरीरास बरेच फायदे होतात.

हाडं मजबूत करण्यासाठी

नारळाच्या तेलात असलेलं कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हाडं मजबूत करतात. त्याच्या नियमित सेवनामुळे ऑस्टिओपोरोसिस (हाड ठिसूळ होण्याचा आजार) होण्याचा धोका कमी होतो.

पचनप्रणालीत सुधार

नारळाच तेल सहज पचत. हे अपचन, बद्धकोष्ठता, मूळव्याध यासारख्या समस्या दूर ठेवतं. जीवनसत्त्वं, खनिजं आणि अमिनो अॅसिड्स यासारख्या पोषक द्रव्यांचं शोषण करण्यात मदत करून पचन सुधारतं.

कोलेस्टेरॉल कमी करतं

myupchar.com शी संबंधित एम्सचे डॉ. नबी वाली यांनी सांगितलं, आहारात नारळाच्या तेलाचा वापर केल्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते आणि खराब कोलेस्टेरॉल घटतं. यामुळे रक्तदाब संतुलित होतो आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो, असं बऱ्याच संशोधनात दिसून आलं आहे.

मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर

अभ्यासातून असं समोर आलं आहे की, नारळाच्या तेलात असलेलं मध्यम साखळी फॅटी अॅसिड्स, टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी करतं. हे तेल शरीरातील इन्सुलिन स्त्रावात सुधार करण्यासाठी रामबाण उपाय आहे आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते.

अल्झायमरमध्ये फायदेशीर

नारळाच्या तेलात अल्फायमर रुग्णांच्या मेंदूत कार्य सुधारण्यास मदत करणारे फॅटी अॅसिड्स असतात. हा प्रभाव केटोन्स (कार्बनयुक्त एक सेंद्रिय पदार्थ) सहित होतो. मेंदू ऊर्जेचा मुख्य स्त्रोत म्हणून ग्लुकोजचा वापर करतो आणि अल्झायमरमध्ये ग्लुकोज मेंदूतल्या पेशींमध्ये पोहोचत नाही, असं आढळलं आहे. तसंच शरीरात तयार केलेले केटोन्स जेव्हा नारळाच्या तेलाचं पचन करतात, तेव्हाच मेंदूचे पोषण राखण्यासाठी ते इंधनाला पर्यायी स्त्रोत म्हणून निवडतात.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - योनीमधील यीस्ट संक्रमणासाठी घरगुती उपाय

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: September 24, 2020, 1:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading