वाट्टेल ते! ही Naked Cleaning कंपनी घरकामासाठी पुरवते नेकेड क्लीनर्स

काही कंपन्या त्यांच्या विचित्र ऑफर्समुळे चर्चेत येतात. त्यातलीच ही एक. घरकामासाठी नग्न कर्मचारी पुरवतात तेही तासाच्या दराने.

काही कंपन्या त्यांच्या विचित्र ऑफर्समुळे चर्चेत येतात. त्यातलीच ही एक. घरकामासाठी नग्न कर्मचारी पुरवतात तेही तासाच्या दराने.

  • Share this:
    लंडन, 15 डिसेंबर : जगभरात सफाई काम करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. ज्या घर साफ करण्यासाठी भाड्यानं सफाई कामगार (Maid) पुरवतात. हे कामगार घरी येऊन सफाईचं किंवा स्वयंपाक बनवण्याचं काम करतात. पण काही कंपन्या त्यांच्या विचित्र ऑफर्समुळे चर्चेत येतात. इंग्लंडमधील प्लेमथमध्ये (PlyMouth) अशीच एक कंपनी आहे. या कंपनीचं नाव 'द नेकेड क्लिनिंग कंपनी' (The Naked Cleaning Company) असून ही कंपनी घरकाम करण्यासाठी केवळ अंतर्वस्त्र (Lingerie) घातलेली किंवा टॉपलेस (Topless) तसेच पूर्णपणं नग्न (Naked Cleaners) सफाई कामगार पुरवते. या कंपनीचे संचालक निक्की बेल्टन (Nikki Belton) आणि लीएन्ने वूलमन (Leanne Woolman) आहेत. निक्की बेल्टन यांनी सांगितलं की, आमची कंपनी सध्या यूकेमध्ये कार्यरत आहे. पण लवकरच आम्ही आमच्या शाखा पूर्ण जगभर उघडणार आहोत. अगदी सुरुवातीपासूनच मला अशाप्रकारचा व्यवसाय सुरू करण्याची प्रबळ इच्छा होती. ज्याचा विस्तार पूर्ण जगभर असेल. आता आमच्याकडं फ्रेंचायझी मॉडेल आहे. आणि आम्हाला आशा आहे की, आम्ही लवकरच ही सेवा अमेरिका, कॅनडा, नेदरलँड्स आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरू करू. निक्कीनं पुढं सांगितलं की, दुबईसह जगभरातील अनेक ठिकाणी 'द नेकड क्लिनिंग कंपनीबद्दल लोकांमध्ये उत्सुकता आहे. आम्ही सफाई कामगार आणि क्लायंट या दोघांसाठीही एक सुरक्षित बुकिंग सिस्टम उभारणार आहोत. लॉकडाऊननंतर आमच्या सेवेला जोरदार मागणी असेल. तसेच येत्या काळात आम्ही आमच्या कंपनीची संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणात जाहिरात करणार आहोत. आम्हाला आशा आहे की, यामुळं महिला सबलीकरणाला प्रोत्साहन मिळेल. त्यासाठी सर्वप्रथम आम्ही आमच्या सर्व शाखांना आणि कामगारांना योग्य ते प्रशिक्षण देऊ. यामुळं आता वादाला तोंड फुटलं आहे संचालक निक्की बेल्टन आणि तिच्या सहकाऱ्यांनी ही सेवा सोशल मीडियावर उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करायला सुरूवात केली आहे. याबाबत निक्कीचं म्हणणं आहे की 'लोकं नेहमीच तुमच्या यशाचा हेवा करत असतात. त्यामुळं त्यांना घाबरण्याची गरज नाही. मला विश्वास आहे की केवळ एक महिलाचं दुसर्‍या महिलेला सक्षम बनवू शकते. म्हणून आम्ही ही सेवा सुरू केली आहे. ही सेवा कोणत्याही महिलेच्या शरीरयष्टीशी किंवा तिच्या आकाराशी संबंधित नाही. ही कंपनी अर्धनग्न किंवा टॉपलेस सफाई कामगार पुरवण्यासाठी दर तासाला 6700 रुपये आकरणार आहे तर न्यूड क्लिनरचा दर तासाला 8500 रुपये इतका असेल.
    Published by:News18 Desk
    First published: