10 मे : लग्नाचा दिवस हा एका मुलीच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा असतो. त्याला आणखी खास बनवण्यासाठी आज-काल प्री-वेडिंग, पोस्ट-वेडिंग, मेकअप असे वेगवेगळ्या प्रकारचे फोटोशूट्स, डान्स नाईट, स्पिंस्टर पार्टी, बॅचलर्स पार्टी असं हटके काही तरी करण्याचा सध्या ट्रेंड आहे.
वरातीत तर नाचगाणं होतं, पण लग्न मंडपात धुमाकूळ घालण्याची मज्जाच काही और आहे. असाच एक धमाल व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नववधूने 'नववधू'बाबतचे सर्व प्रकारचे स्टिरिओटाईप मोडून काढले आहेत.
सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या या वधूचं नाव आहे अमिषा भारद्वाज. तिनं चक्क सियाच्या 'चीप थ्रिल्स' या गाण्यावर ताल धरला, आणि तेही साडी किंवा लेहेंगा न घालता , डायरेक्ट हाॅट शाॅर्ट्स घालून तिने नववधू बाबतच्या साऱ्या संकल्पना बदलून टाकल्या आहेत. या बोल्ड अॅण्ड ब्युटिफुल वधूचा हा हटके अंदाज तुम्हाला आवडणार नाही असं होऊच शकत नाही.
यू-ट्युबवर तर हा व्हिडिओ चांगलाच गाजलाय. आतापर्यंत 25 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून,फेसबुकवरही तो मोठ्या प्रमाणात शेअर झाला आहे.