• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • 'या' Blood group च्या व्यक्तींना Heart attack चा सर्वाधिक धोका; पाहा तुमचा रक्तगट तर नाही ना?

'या' Blood group च्या व्यक्तींना Heart attack चा सर्वाधिक धोका; पाहा तुमचा रक्तगट तर नाही ना?

हार्ट अटॅकचा रक्तगटाशीही संबंध असल्याचं संशोधनात दिसून आलं आहे.

  • Share this:
मुंबई, 21 ऑक्टोबर : भारतात हृदयविकार असलेल्या रुग्णांचा (Heart disease) आकडा मोठा आहे.दिवसेंदिवस हृदयविकाराचा झटका येणाऱ्या रूग्णांची संख्याही वाढते आहे (Heart attack). अयोग्य जीवनशैली, तणाव, चिंता आणि इतर अशी बरीच कारणं यामागे आहेत. पण यासोबत हृदयविकारांचा धोका ब्लड ग्रुपशीही (Blood group) संबंधित आहे. काही रक्तगटाच्या व्यक्तींना हार्ट अटॅकचा धोका सर्वाधिक असतो  (Heart attack and blood group). अलीकडेच झालेल्या संशोधनात असं आढळून आलं आहे, की A, B आणि AB रक्तगट असलेल्या व्यक्तींना हृदयाशी संबंधित आजारांचा धोका जास्त असतो. ओ (O) रक्तगट असलेल्या व्यक्तींना हृदयाशी संबंधित विकारांचा धोका अन्य म्हणजेच A, B किंवा AB रक्तगटांच्या व्यक्तींच्या तुलनेत कमी असतो. अँटीबॉडीज अर्थात प्रतिपिंडांचं महत्त्व कोरोनाच्या कालखंडात आपल्याला चांगलंच कळलं आहे. अँटीबॉडीज म्हणजे शरीराच्या बाहेरून शरीरात येऊ पाहणारे विषाणू, जिवाणू किंवा अन्य घटकांशी प्रतिकार करणारा घटक. रक्तपेशींच्या पृष्ठभागावरही एका चिकट पदार्थाच्या रूपात अँटीबॉडीज असतात. त्या शरीराबाहेरून आलेले व्हायरस, बॅक्टेरिया आणि परजीवींपासून शरीराचं संरक्षण करतात. सर्वच म्हणजेच A, B, AB आणि O या रक्तगटांच्या रक्तपेशींच्या पृष्ठभागावर काही विशेष अँटीबॉडीज असतात. A आणि B रक्तगटातल्या पेशींच्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या प्रकारच्या अँटीबॉडीज असतात. AB रक्तगटाच्या पेशींच्या पृष्ठभागावर या दोन्ही प्रकारच्या अँटिबॉडीज आढळतात. हे वाचा - Depression ग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा! फक्त 15 मिनिटांत डिप्रेशनमधून मुक्तता ओ ब्लड ग्रुपच्या तुलनेत ए किंवा बी ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका 8 टक्के अधिक असतो. ओ ग्रुपच्या तुलनेत बी ग्रुप असलेल्या व्यक्तींना मायोकार्डिल इन्फार्क्शनचा धोका जास्त असतो. तसंच, ओ ब्लड ग्रुपच्या तुलनेत एक ग्रुपच्या व्यक्तींना हृदयक्रिया बंद पडण्याचा धोका 11 टक्के जास्त असतो. A आणि B रक्तगट असलेल्या व्यक्तींच्या रक्तवाहिन्यामध्ये रक्त गोठून गुठळ्या होण्याची शक्यता 51 टक्के असल्याचं एका अभ्यासातून आढळलं आहे. रक्तातल्या वॉन विलेब्रँड फॅक्टरची पातळी, कोलेस्टेरॉलची पातळी आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याची जास्त शक्यता ओ व्यतिरिक्त अन्य रक्तगटांमध्ये आढळत असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. अद्याप यावर अधिक संशोधन सुरू आहे. हे वाचा - या 5 पदार्थांनी अचानक वाढू शकते रक्तातील साखरेची पातळी, वेळीच व्हा सावध मानसिक तणाव, विचित्र जीवनशैली (lifestyle), अनियमित आहार, जंक फूड (Junk food) किंवा जास्त मसालेदार अन्न खाणं यांमुळे हृदयविकाराचा धोका वाढू लागला आहे. उच्च रक्तदाबामुळे हृदयावर अनावश्यक ताण पडल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तसंच ज्या व्यक्ती धूम्रपान करतात आणि मद्यपान करतात, त्यांनादेखील हृदयविकार होऊ शकतो. वजन जास्त वाढल्यानेही हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. नियमित व्यायाम केल्याने आणि जीवनशैली संतुलित राखल्याने हे सर्व दुष्परिणाम टाळता येऊ शकतात. त्यामुळे हृदय निरोगी ठेवायचं असेल, तर या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि गरज पडल्यास तातडीने तज्ज्ञांचा सल्लादेखील घेतला पाहिजे.
First published: