मॉस्को, 8 फेब्रुवारी : म्हातारपणाची (old age) कल्पना करूनच अनेकजण अस्वस्थ होतात. जर्जर झालेलं शरीर, थकलेलं मन आणि मनात मृत्यूचं भय असं या वयाचं चित्र अनेकांच्या डोक्यात असतं. मात्र या आजीबाईंनी (Russian skating granny) जीवनकथा आणि सध्या त्या जगत असलेलं आयुष्य कमालीचं थक्क करणारं आहे. त्यांच्याबद्दल वाचून आणि त्यांचा व्हिडिओ पाहून तुमची जगण्याबाबतची कल्पनाच बदलून जाईल. 'रॉयटर्स'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
या आजीचं नाव आहे ल्युबोव्ह मेरीकुडोव. वय आहे तब्बल 79 वर्ष. आजी राहतात रशियामध्ये लेक बिकाल या ठिकाणी. आईस स्केटिंग (Ice skating) हा त्यांचा केवळ छंद नाही तर तो त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. त्या एकट्या राहतात, मस्त मजेत, पूर्ण आनंद घेत जगतात. तुम्ही हा VIDEO पाहून व्हाल थक्क
सध्या त्यांच्या भागात हिवाळा (winter) सुरू आहे. इथं हिवाळ्यातील तापमान असतं उणे 24. तरीही आजी स्केटिंगचा दिनक्रम अजिबात मोडत नाहीत. उलट स्केटिंग हीच त्यांच्या जगण्याची ऊर्जा बनली आहे.
आजी सांगतात, की मला कुणी जर विचारलं, की तुला सतत आइस स्केटिंग का करावंसं वाटतं? तर मी सांगते, मला सतत आइस स्केटिंग करावं वाटतं कारण माझं मन याची तीव्र इच्छा करतं. आजींच्या घराजवळचा तलावही सध्याच्या तापमानात (temperature) पूर्णपणे गोठलेला आहे. त्या चक्क या तलावावरच स्केटिंग करतात. त्या सांगतात, 'मी एकट्यानं स्केटिंग करत या तलावाच्या परिसरात अनेक चकरा मारते. एकही दिवस हा क्रम चुकवत नाही. माझा पाळीव कुत्राही (dog) माझ्यासोबत असतो.
ल्युबोव्ह आजी एकट्या राहत असल्या तरी त्यांनी पाळलेल्या गायी (cows) आणि कुत्रा त्यांची सोबत करतात. त्या आपल्या गायींना चरायला घेऊन जातात. त्यावेळीही स्केटिंगचेच शूज (skating shoes) त्यांच्या पायात असतात. गायींना घरी घेऊन येतानाही आजी स्केटिंग करतच घरी परततात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dog, Inspiring story, Russia, Winter