Home /News /lifestyle /

OMG! हे कसं शक्य आहे? महिलेच्या चक्क काखेतून निघतं दूध

OMG! हे कसं शक्य आहे? महिलेच्या चक्क काखेतून निघतं दूध

आपल्या मुलीला ब्रेस्टफिडिंग करणाऱ्या महिलेने काखेतून दूध निघत असल्याचा आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.

    लंडन, 17 फेब्रुवारी : ब्रेस्टप्रमाणेच (Breast milk) काखेतूनही दूध (Milk from armpit) येत असल्याचं सांगितलं तर कुणालाही आश्चर्यच वाटेल. किंबहुना कुणाचा यावर विश्वासच बसणार नाही. मात्र एका महिलेच्या काखेतून चक्क असं दूध येत आहे. या महिलेने आपला हा अनुभव आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे (Woman Armpit Leaks Milk). लिंडसे व्हाइटला (Lindsay White) एक लहान मुलगी आहे, जिचं नाव आहे एली. ती एलीला ब्रेस्टफिडिंग करते. असंच स्तनपान करताना तिला तिच्या काखेत ओलसरपणा जाणवला. कदाचित घाम असावा असं तिला सुरुवातीला वाटलं. पण नंतर तिने जेव्हा हात वर करून काखेत पाहिला तेव्हा तिला तिथं एक मोठी गाठ दिसली. ती गाठ तिने दाबली आणि त्यातूनच चक्क दूध येऊ लागलं. काखेतून दूध येत असल्याचं पाहून लिंडसे घाबरली. तिने लगेच डॉक्टरांकडे धाव घेतली. डॉक्टरांनी तिची तपासणी केली. तेव्हा हे तिचं थर्ड निपल असल्याचं निदान झालं. हे वाचा - सर्व पुरुष Fail..! फक्त महिलांनाच माहितेय 'या' 20 शब्दांचा अर्थ @thelittlemilkbar या आपल्या टिकटॉक अकाऊंटवर तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. लिंडसेचा हा व्हिडओ पाहिल्यानंतर बऱ्याच महिलांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यापैकी एका महिलेनेही प्रेग्नन्सीनंतर आपल्या काखेतूनही असा घाम येत असल्याचं सांगितलं. कदाचित तेसुद्धा घाम नव्हे तर दूध असावं असं ती म्हणाली. तज्ज्ञांच्या मते, काही वेळा महिलांच्या शरीरात तयार होणारं दूध शरीराच्या इतर भागात जातं. जिथं त्याला वाव मिळतो, तिथून ते बाहेर येतं. जसं लिंडसेच्या काखेतून येऊ लागलं. हे वाचा - तुमचं मूलही शाळेत जायला घाबरतंय का? त्याच्यासोबत school bullying होत नाही ना याआधी तीन मुलांची आई असलेल्या मिनास्टोनातील (Minnesota) महिलेनेही आपला असाच अनुभव शेअर केला होता. आपल्या काखेतून दूध निघत असल्याचा व्हिडीओ तिने @ollieoooop या आपल्या टिकटॉक अकाऊंटवर शेअर केला होता. याबाबत सांगताना ती म्हणाली, ब्रेस्टफिडिंग करणाऱ्या महिलांना pittiesहोतात. म्हणजे जेव्हा ब्रेस्ट मिल्कमुळे ब्रेस्ट टिश्यू जड होतात तेव्हा काखेत एक गाठ किंवा सूज येते. माझ्या शरीरात जो मला हा बदल जाणवला तसा कुणासोबत झाला असावा याबाबत मला माहिती नाही. पण यामुळे तिच्या काखेतून दूध येतं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle, Viral, Woman

    पुढील बातम्या