हर्टफोर्ड, 8 मार्च : मी धूम्रपान (Smoking) करत नाही, शिवाय दुसरं कुणी धूम्रपान करत असेल, तर त्या व्यक्तीपासून दूर राहतो किंवा राहते. त्यामुळे मला धूम्रपानामुळे होणाऱ्या दुष्परिणामांचा धोका नाही, असं तुम्हाला वाटत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी.
तुम्ही स्मोक (Smoke) करत नसाल किंवा स्मोकिंग करणाऱ्या व्यक्तीपासून दूर राहत असाल तरीदेखील तुमचं आरोग्य धोक्यात आहे. धूम्रपानाचा दुष्परिणाम तुम्हालाही धोका आहे. येल युनिव्हर्सिटी (Yale University) च्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. जर्नल सायन्स अॅडव्हान्समध्ये हा अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला आहे.
हे वाचा - तुम्ही चुकीच्या वेळी तर बदाम खात नाहीत ना? 'ही' आहे बदाम खाण्याची योग्य वेळ
जी व्यक्ती सिगारेट फुंकते, शिवाय त्या व्यक्तीच्या आसपास असणाऱ्या व्यक्तींना ज्यांना सेकंड हँड स्मोकर्स (Second hand smokers) म्हटलं जातं, त्यांनाही सिगारेटच्या धुरामुळे धोका असतो. मात्र थर्ड हँड स्मोकही (Third hand smoke) आरोग्यासाठी तितकंच हानीकारक आहे. थर्ड हँड स्मोक म्हणजे धूम्रपान केल्यानंतर राहिलेल्या केमिकल्सशी संपर्क येणं. धूम्रपान केल्यानंतर एक तर ती व्यक्ती तुमच्या संपर्कात येते किंवा तुम्ही ज्या ठिकाणी कुणीतरी धूम्रपान करून गेलं आहे, अशा जागेशी आणि तिथल्या वस्तूंशी संपर्कात येता.
धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीचं शरीर, कपडे, हातांवरही सिगारेटमधील हानीकारक केमिकल्स असतात. शिवाय ज्या ठिकाणी त्या व्यक्तीने धूम्रपान केलं आहे, त्याठिकाणच्या भिंती, जमीन आणि वस्तूंवरही असे केमिकल्स चिकटलेले असतात. ज्याचा आजूबाजूच्या व्यक्तींवरही त्याचा दुष्परिणाम होतो. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात ही बाब समोर आली आहे.
हे वाचा - डायबेटिज आणि हृदयाच्या समस्यांना दूर ठेवेल हा ज्युस, संशोधकांचा दावा
संशोधकांनी सिनेमागृहामध्ये हा अभ्यास करून पाहिला. सिनेमागृहाच्या भिंती, खुर्च्यांवर असे सिगारेटमधील केमिकल्स चिकटलेले आढळून आले. त्यामुळे सेकंड हँड स्मोकपासून तुम्ही स्वतचा बचाव करत असाल, मात्र थर्ड हँड स्मोकपासून कुणीही सुरक्षित नाही, असं संशोधकांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.