मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Health Insurance: आरोग्य विमा योजना घेण्यापूर्वी 'या' चार गोष्टी लक्षात ठेवा, ऐनवेळी होणार नाही धावपळ

Health Insurance: आरोग्य विमा योजना घेण्यापूर्वी 'या' चार गोष्टी लक्षात ठेवा, ऐनवेळी होणार नाही धावपळ

जर हेल्थ विम्याची सर्व लिमिट संपली तर?

जर हेल्थ विम्याची सर्व लिमिट संपली तर?

Health Insurance: बाजारात अनेक प्रकारच्या आरोग्य विमा योजना उपलब्ध आहेत, त्यामुळे कोणतीही योजना खरेदी करताना लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 20 सप्टेंबर : कोरोना महामारीमुळे लोकांना आता आरोग्य विम्याचे महत्त्व समजू लागले आहे. हॉस्पिटलमध्ये होणारा खर्च लक्षात घेऊन लोकांनी आता आरोग्य विमा कवच घेण्यास सुरुवात केल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बाजारात अनेक प्रकारच्या आरोग्य विमा योजना उपलब्ध आहेत, त्यामुळे लोकांनी कोणतीही योजना घेताना सावधगिरी बाळगली पाहिजे आणि स्वतःसाठी योग्य आरोग्य विमा कवच निवडता यायला हवे. त्यामुळे रुग्णालयाच्या खर्चाची चिंता बऱ्याच अंशी कमी होते. हेल्थ इन्शुरन्स कवच घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल माहिती घेऊ.

किती कवर घेतला पाहिजे

मनात पहिला प्रश्न येतो की आरोग्य विमा संरक्षण किती पुरेसे असेल का? यावर तज्ज्ञ म्हणतात, “याचं कोणतंही ठरावीक उत्तर नाही. भविष्यात आपल्याला कोणत्या प्रकारचा आजार होऊ शकतो हे सांगता येत नाही. ढोबळमानाने बोलायचं झालं तर भविष्यात आपण आजारी पडलो तर कोणत्या रुग्णालयात उपचारासाठी जाऊ शकतो? यावर हे अवलंबून आहे. त्या हॉस्पिटलमध्ये हार्ट बायपासची किंमत किती आहे? हॉस्पिटलमध्ये हार्ट बायपासचा खर्च लक्षात घेऊन किमान वैद्यकीय कव्हर घेण्याची योजना आखली पाहिजे.

पर्सनल मेडिकल हिस्ट्री

तुमचे वैद्यकीय विमा संरक्षण किती असावे हे समजून घेण्याचा आणखी एक मार्ग आहे. तुमचे वय, वैद्यकीय इतिहास आणि कुटुंबातील सदस्यांच्या जीवनशैलीच्या आधारेही तुम्हाला याची कल्पना येऊ शकते. भविष्यात तुमचे आरोग्य कसे राहील, हे या गोष्टींवर बऱ्याच अंशी अवलंबून आहे. सहसा, आरोग्य विमा कंपन्या ही माहिती आगाऊ विचारतात. तुमच्याकडून सर्व प्रकारची माहिती घेऊन, भविष्यात तुम्हाला आरोग्याच्या कोणत्याही मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही याची काळजी घेतली जाते. तज्ज्ञ म्हणतात, “आपण बर्‍याच सामान्य आजारांवर उपचारांचा खर्च लक्षात ठेवला पाहिजे आणि पॉलिसीमध्ये त्यांचा समावेश आहे का? याची खात्री केली पाहिजे.

वाचा - वृद्धावस्थेत निरोगी राहण्यासाठी आहारात 'हे' पदार्थ हवेतच

प्रौढ व्यक्तीला 10 लाखांचे कव्हर असावे

एकंदरीत, विमा तज्ञ शिफारस करतात की प्रौढ व्यक्तीला (21 वर्षांपेक्षा जास्त) किमान 10 लाख रुपयांचे संरक्षण असावे. तसेच, जसजसे ते वाढतात तसतसे कव्हरचे प्रमाण देखील वाढले पाहिजे. तज्ज्ञ म्हणतात, “वयाच्या 20 व्या वर्षीही अनेकांना वैद्यकीय विम्याची गरज असते. तुम्ही लहान वयात विमा घेतल्यास त्याचा प्रीमियम देखील स्वस्त असतो. जसजसे आपण मोठे होतो आणि वाढत्या वयाबरोबर अनेक आजार आपल्याला घेरायला लागतात, तसा प्रीमियमही महाग होतो.

कौटुंबिक स्थितीसोबत कव्हरेज बदलतो

तुमच्या बदलत्या कौटुंबिक परिस्थितीनुसार कव्हरेज निवडले पाहिजे. उदाहरणार्थ, लग्नानंतर तुमचे कुटुंब आहे. या प्रकरणात, तुम्ही फॅमिली फ्लोटर प्लॅनची ​​निवड करू शकता. यात पती-पत्नी दोघांचाही समावेश होतो. तुम्ही निवडलेला फॅमिली फ्लोटर प्लॅन जसजसा कुटुंब वाढत जाईल तसतसा बदलला जाऊ शकतो. तज्ज्ञ पुढे म्हणतात, “फॅमिली फ्लोटर प्लॅन असूनही, वैयक्तिक कव्हर असणे देखील महत्त्वाचे आहे. जर एखाद्या महिलेकडे वैयक्तिक पॉलिसी नसेल आणि ती तिच्या पतीसोबत फॅमिली फ्लोटर प्लॅनमध्ये जोडली गेली असेल, तर अशा परिस्थितीत, वैवाहिक जीवनात कोणतीही फूट पडल्यास महिलेला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पती-पत्नीमधील संबंध कितीही चांगले असले तरीही, वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करणे आवश्यक आहे.

First published:

Tags: Health Tips, Insurance