डॉक्टरRx- कर्करोगाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

डॉक्टरRx- कर्करोगाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

आतापर्यंत अनेक कर्करोगाचे रुग्ण बरे झाले आहेत. हा रोग पूर्णपणे बरो होत नाही हेही एक कटू सत्य आहे.

  • Share this:

मुंबई, ०४ नोव्हेंबर २०१८- जसलोक रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट डॉ. बोमन ढाबर यांनी कर्करोग सुरुवातीला ओळखण्याच्या लक्षणांबद्दल माहिती दिली आहे. कर्करोग म्हटलं की आजही अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकतो. पण आता ही काही फाशीची शिक्षा राहिलेली नाही. आपण फक्त  जागरुक राहणं गरजेचं आहे. कर्करोग हा एक असा आजार आहे ज्यामध्ये 'कपटीपणा' आहे. वैद्यकीय भाषेत कपटी म्हणजे हळहूळ सुरू होणारा रोग. रुग्णाला हा रोग झालाय हे माहीत नसल्यामुळे तो विश्वासघातकीही आहे.

आतापर्यंत अनेक कर्करोगाचे रुग्ण बरे झाले आहेत. हा रोग पूर्णपणे बरो होत नाही हेही एक कटू सत्य आहे. माझं अंतिम लक्ष्य हे मुळापासून या रोगाला संपुष्टात आणणं आणि यावर एकत्रितपणे प्रतिबंध करणं हे आहे. कर्करोगाची अनेक लक्षणं असतात. काही कळणारे असतात तर काही अतीसुक्ष्म असतात. प्रत्येकाला या सूक्ष्म लक्षणांविषयी जागरुक केले तर आपण ऑन्कोलॉजिस्टकडून यावर उपचार सुरु करू शकतो आणि वेळीच प्रतिबंध करता येऊ शकतो.

सावधता-  

  • आपल्या आंत्रात किंवा मूत्राशयावरील सवयींमध्ये बदल होणं, बद्धकोष्ठामधील अंतर कमी होणं, सैल होणं आणि रक्त पडणं.
  • जखम जी बरी होत नाही.
  • असामान्य रक्तस्त्राव किंवा स्त्राव.
  • स्तन किंवा इतरत्र गुठळी किंवा गाठ तयार होणे.
  • अपचन किंवा गिळताना त्रास होणे.
  • चामखीळ किंवा तीळ मध्ये बदल होणं.
  • खोकला किंवा आवाज येणे.

स्त्रियांना त्यांच्या स्तनांमध्ये झालेल्या बदलांची जाणीव असणे आवश्यक आहे. तपासणीद्वारे स्वत:च्या स्तनांमधील गुठळी किंवा त्वचेतील बदल लक्षात येऊ शकतो. यामुळे पुढील चाचणीमध्ये याचा उपयोग होऊ शकतो. ५५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या स्त्रियांना एक ते दोन वर्षांत स्तनांची मॉमोग्राफी करणं आवश्यक आहे. स्तन कर्करोगाची कौटुंबिक पार्श्वभूमी असणाऱ्या स्त्रियांना वयाच्या ५५ वर्षांपूर्वी स्क्रिनिंगची आवश्यकता आहे.

२१ वर्षाच्या वयोगटातील सर्व स्त्रियांनी गर्भाशयाच्या ग्रीवाच्या कर्करोगाची चाचणी करुन घेणं आवश्यक आहे.

२१ ते २९ या वयोगटातील महिलांनी दर ३ वर्षांनी पॅप चाचणी घ्यावी.

३० ते ६५ वयोगटातील महिलांनी दर पाच वर्षांनी एक पॅप चाचणी आणि एक एचपीव्ही चाचणी करणे आवश्यक आहे.

ज्या स्त्रियांना गर्भाशय आणि गर्भाशयातील हिस्टेरेक्टोमी काढले आहे आणि त्यांना ग्रीव्हिक कर्करोग किंवा पूर्व कॅन्सरची कोणतीही पार्श्वभूमी नाही अशांनी स्क्रीनिंग केली नाही तरी चालते.

कोणतही व्यसन आणि उच्च चरबीयुक्त आहारचे सेवन न करणारी किंवा आरोग्यपूर्ण जीवनशैली असणारी व्यक्ती कर्करोगाला प्रतिबंध करण्यावर उत्तम प्रभाव टाकते.

First Published: Dec 4, 2018 06:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading