मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /मांड्यांवरील चरबी घटण्यासाठी हे व्यायाम प्रकार आहेत गुणकारी; लगेच दिसू लागेल परिणाम

मांड्यांवरील चरबी घटण्यासाठी हे व्यायाम प्रकार आहेत गुणकारी; लगेच दिसू लागेल परिणाम

पायांच्या चांगल्या आरोग्यासाठी मांडीच्या स्नायूंचा योग्य आकार राखणं, टोनिंग करणं आणि मजबूत करणं आवश्यक आहे. मांड्या मजबूत करण्यासाठी काही व्यायाम खूप प्रभावी आहेत.

पायांच्या चांगल्या आरोग्यासाठी मांडीच्या स्नायूंचा योग्य आकार राखणं, टोनिंग करणं आणि मजबूत करणं आवश्यक आहे. मांड्या मजबूत करण्यासाठी काही व्यायाम खूप प्रभावी आहेत.

पायांच्या चांगल्या आरोग्यासाठी मांडीच्या स्नायूंचा योग्य आकार राखणं, टोनिंग करणं आणि मजबूत करणं आवश्यक आहे. मांड्या मजबूत करण्यासाठी काही व्यायाम खूप प्रभावी आहेत.

मुंबई, 27 फेब्रुवारी : लठ्ठपणामुळं (Obesity) अनेक आजार मागे लागतात. शिवाय, तुमचा लुक आणि पर्सनॅलिटीही खराब होते. शरीराच्या कोणत्याही भागात चरबीमुळं अनेक समस्या निर्माण होतात. विशेषत: मांडीची चरबी (Thigh fat) कमी करणं कठीण असतं. पायांच्या चांगल्या आरोग्यासाठी मांडीच्या स्नायूंचा योग्य आकार राखणं, टोनिंग करणं आणि मजबूत करणं आवश्यक आहे. मांड्या मजबूत करण्यासाठी काही व्यायाम खूप प्रभावी आहेत, ज्यांच्या मदतीनं चरबीवर नियंत्रण ठेवता येतं. शिवाय, हे व्यायाम मांड्या मजबूत करण्यास (Exercises that strengthen the thighs) मदत करतात.

1) चालणं

मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी चालणं हा चांगला व्यायाम आहे. धावण्यानं मांड्यांवरील चरबी कमी होऊ शकते. आपण आपल्या सवडीनुसार सकाळी 20 मिनिटं आणि संध्याकाळी 20 मिनिटं चालण्याच्या किंवा धावण्याचा व्यायाम करू शकता.

2) सायकल चालवणं

ताण-तणावातून मुक्त होण्यासाठी हा एक उत्तम व्यायाम आहे. हा एक कार्डिओ व्यायाम आहे, जो केवळ मांड्या टोन करण्यास मदत करत नाही, तर हृदयाचं आरोग्यदेखील सुधारतो. सायकल चालवण्यानं वजन झपाट्यानं कमी करता येतं. सायकलिंगमुळे स्नायूही मजबूत होतात.

हे वाचा - कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं तेव्हा अशी लक्षणं दिसतात; त्याकडे दुर्लक्ष घातक ठरेल

3) पोहायला जा

पोहणं तुम्हाला मांडीची चरबी कमी करण्यास मदत करू शकतं. दररोज एक तास पोहल्यानं मांड्या मजबूत होतात आणि एकंदरीत आरोग्यावरही चांगले परिणाम होतात.

4) पायऱ्यांचा वापर करा

हल्ली प्रत्येकजण लिफ्ट किंवा एस्केलेरेटर वापरतो. याऐवजी ऑफिस किंवा मॉलमध्ये लिफ्ट किंवा इलेक्ट्रॉनिक पायऱ्या वापरण्याऐवजी चढण्या-उतरण्याच्या पायऱ्यांचा वापर करा.

हे वाचा - नीट पचन न होणं अनेक गंभीर आजारांचं कारण बनतं; आहारातील या चुका ताबडतोब बदला

5) स्क्वाट्स करा

पायांना आकार देण्यासाठी हा एक उत्तम व्यायाम आहे. मांडीची चरबी कमी करण्यासाठी दररोज 20-30 मिनिटं स्क्वाट्स करा.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Health Tips, Types of exercise, Weight loss tips