नवी दिल्ली, 31 डिसेंबर: महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. अशा काळात तुमचे सेवानिवृत्ती नंतरचे जीवन सुखकर होण्यासाठी आतापासूनच नियोजन करणं (planning for retirement) गरजेचं आहे. नोकरी करताना कामाच्या गडबडीत तुम्ही अद्यापही सेवानिवृत्तीनंतर स्वतःला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये,यासाठी नियोजन केले नसेल, तर नवीन वर्षात (new year) ते नक्की करा. खरं तर व्यावसायिक जीवनाला (professional life) सुरुवात होताच वृद्धापकाळासाठी नियोजन सुरू केले पाहिजे. मात्र, आजही खासगी क्षेत्रात (private sector) काम करणारे लोक सेवानिवृत्तीचा क्वचितच विचार करतात.
तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमचे ईपीएफओ (EPFO) मध्ये खाते असेल, तर उत्तम नियोजन करून तुम्ही एक उत्तम सेवानिवृत्ती योजना तयार करू शकता. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था त्यांच्या खातेधारकांच्या पगाराचा काही भाग हा ईपीएफमध्ये गुंतवतात. ईपीएफओ सोबत ईपीएस (EPS) म्हणजेच कर्मचारी पेन्शन योजना जोडलेली आहे.
कर्मचारी पेन्शन योजना (EPS) ही सेवानिवृत्ती योजना आहे, जी ईपीएफओद्वारे मॅनेज केली जाते. ही योजना वयाच्या 58 व्या वर्षी निवृत्त होणाऱ्या संघटित क्षेत्रात काम केलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीत किंवा संस्थेत काम करण्यास सुरुवात करता, तेव्हा पीएफ अकाउंटसोबत तुमचं ईपीएस अकाउंट उघडलं जातं. पीएफ आणि ईपीएस खात्याचे योग्यप्रकारे व्यवस्थापन करून, तुम्ही वृद्धापकाळात चांगले जीवन जगू शकाल एवढी रक्कम तुम्ही नक्कीच साठवू शकता.
लवकर वजन कमी व्हावं म्हणून भरपूर लिंबूपाणी पिताय; फायद्याऐवजी होईल दुष्परिणाम
तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी नोकरी सुरू केली आणि तुमचा मूळ पगार दरमहा 20,000 रुपये असेल, तर तुम्ही तुमच्या सेवानिवृत्तीसाठी चांगले पैसे जमा करू शकता. कारण मूळ पगारातूनच ईपीएफसाठी पैसे जमा केले जातात. यामध्ये गुंतवणूक 12 टक्के कर्मचारी आणि 12 टक्के संबंधित कंपनी, संस्था यांच्याकडून केली जाते. म्हणजेच तुमच्या मूळ पगाराच्या 24 टक्के रक्कम दरमहा तुमच्या पीएफ अकाउंटमध्ये जमा केली जाते. तुमचा मूळ पगार 20,000 रुपये असेल, तर 24 टक्क्याने दरमहा तुमच्या पीएफ अकाउंटमध्ये 4800 रुपये जमा केले जातील. याचाच अर्थ एका वर्षात तुमच्या अकाउंटवर 57,600 रुपये जमा होतील.
ईपीएफमध्ये योग्यवेळी केलेली गुंतवणूक दीर्घकाळानंतर करोडो रुपये देऊन जाते. यामध्ये गुंतवणूक करताना तुम्हाला 8.5 टक्के व्याज मिळते. गुंतवणूक सुरू करण्याचे वय 25 वर्षे असेल आणि मूळ पगार 20 हजार असेल, तर तुम्हाला निवृत्तीच्या वेळी 2.79 कोटी रुपये मिळू शकतात.
ही साधीसुधी लक्षणं ठरतील Silent heart attack ची कारणं, अजिबात करू नका दूर्लक्ष
पीएफमध्ये जमा केलेले पैसे तुम्ही कोणत्याही परिस्थितीत मुदत संपण्यापूर्वी काढू नका. त्यानंतरच तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर करोडो रुपये मिळू शकतील. अत्यंत महत्त्वाचे काम असल्याशिवाय ईपीएफमधून पैसे काढू नका, कारण पैसे काढल्याने तुमची बचत कमी होईल. तसेच, नोकरी बदलताना, तुम्हाला तुमचे पीएफ अकाउंट नवीन कंपनीकडे ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. तसे केले नाही तर नवीन अकाउंटवर व्याज मिळेल, परंतु 3 वर्षानंतर जुन्या पीएफ अकाउंटवरील व्याज बंद होईल.
त्यामुळे या योजनेबद्दल जाणून घेऊन तुम्ही वेळची पावलं उचला आणि आपलं भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle