रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची आहे? प्या ही दोन खास पेय

रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची आहे? प्या ही दोन खास पेय

आता कडक उन्हाळा सुरू झाला आहे. अशा गर्मीच्या महिन्यात आजारी पडण्याचा धोका अधिक असतो. पुन्हा एकदा कोरोनाचा फैलावही (corona spread) होतो आहे. त्यामुळे प्रत्येकाने रोगप्रतिकारक शक्तीकडे तसंच आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.

  • Share this:

मुंबई, 16 एप्रिल : शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती (Immunity power) ही फार महत्त्वाची असते. जर प्रतिकारक शक्ती कमी झाली, तर आजारी पडण्याचा धोका वाढतो. आता कडक उन्हाळा सुरू झाला आहे. अशा गर्मीच्या महिन्यात आजारी पडण्याचा धोका अधिक असतो.  आता पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव (corona spread)  होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने रोगप्रतिकारक शक्तीकडे तसंच आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेच आहे.

इम्यूनिटी कमी होणं हे अनेक अजारांचं कारण ठरू शकतं. रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यसाठी संतुलित आहराचा फार मोठा वाटा असतो. याशिवाय रोगमुक्त राहण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणं देखील गरजेचं असतं. घरातील वस्तू वापरून काही खास सरबत, ड्रिंक्स (Immunity booster drinks) आपण घेऊ शकतो, जे रोगप्रतिकारक शक्ति वाढवण्यासाठी उपयोगी ठरतील.

(वाचा - Coronavirus Symptoms: मला कोरोना होऊन तर गेला नाही ना? फक्त 5 लक्षणांवरून ओळखा)

आलं, हळद आणि गाजराचा रस -

हा रस बनवण्यासाठी ओवा, आलं, गाजर, हळद, लिंबू या सगळ्या गोष्टी एकत्र बारीक करा. यात एक चिमूटभर काळी मिरी पावडर टाका. त्यानंतर मिसळून प्या. हळद हे उत्तम अँटीऑक्सिडन्ट आहे. काळी मिरीमध्ये पेपरिन असतम. हे सगळे गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लाभदायक ठरतात.

(वाचा - Ramadan 2021 – डायबिटीजच्या रुग्णांनी रोझा ठेवण्याआधी करा हे उपाय)

गाजर आणि  बीट -

गाजर, बीट आणि मोहरीची पावडर, काश्मिरी लाल मिर्ची पावडर हे सगळे पदार्थ एकत्र करून त्यात पाणी मिसळा, त्यानंतर चांगलं एकजीव झाल्यानंतर एका डब्यात हे सगळं भरून तो डबा पॅक बंद करावा. गर्मीच्या ठिकाणी दोन ते तीन दिवस ठेवावा. उन्हातही याला ठेऊ शकतो. याची चव आंबट असते. चार ते पाच दिवस हा रस पिता येतो. हा रस एक उत्तम प्रोबायोटिक आहे, तर आतड्यांच्या स्वास्थ्यासाठी हे उत्तम पेय आहे.

Published by: News Digital
First published: April 16, 2021, 1:19 PM IST

ताज्या बातम्या