या 6 कारणांमुळे तुम्हाला होते डोकेदुखी

या 6 कारणांमुळे तुम्हाला होते डोकेदुखी

डोकं दुखण्याच्या कारणाला मुळापासून नष्ट करण्याचा आपण प्रयत्न करत नाही. यामुळे थोड्या काळाने डोकेदुखी पुन्हा सुरू होते.

  • Share this:

डोकं दुखू लागलं की सगळे ते दुखणं कसं थांबेल यासाठी उपाय शोधायला लागतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की नेमकी डोकं दुखण्याचं कारण काय आहे? डोकं दुखण्याच्या कारणाला मुळापासून नष्ट करण्याचा आपण प्रयत्न करत नाही. यामुळे थोड्या काळाने डोकेदुखी पुन्हा सुरू होते. शरीरात कोणते कोणते पोषक तत्त्व कमी असल्यामुळे डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागतो.

ड जीवनसत्त्वाची कमतरता- ड जीवनसत्व हे एक असं हार्मोन आहे ज्याची निर्मिती मूत्रपिंडातून होते. आपल्याला हे जीवनसत्त्व अन्न, सप्लीमेंट आणि सूर्यापासून मिळतं. ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळेही डोकेदुखी होते. हे जीवनसत्त्व अधिक प्रमाणात शरीरात असणंही घातक आहे. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

राष्ट्रीय आरोग्य संस्थेनुसार, 19 ते 70 वर्षांच्या व्यक्तिंनी 600 IU (इंटरनॅशनल यूनिट्स) ड जीवनसत्त्व घेणं आवश्यक आहे. 71 वर्षांहून अधिक व्यक्तिंसाठी 800 IU ड जीवनसत्त्व गरजेचं आहे. ड जीवनसत्त्वासाठी धूप, सप्लीमेंट, फॅटी फिश, दुग्दजन्य पदार्थ, संत्र्याचा रस घेऊ शकता.

मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळेही डोकेदुखी होते. हे पोषकतत्त्व मज्जातंतू आणि स्नायू यांचं कार्य सुरळीत ठेवायला मदत करतात. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे मायग्रेनचा त्रासही होऊ शकतो. मॅग्नेशियमला मज्जातंतू आणि नर्वस सिस्टमसाठीचं नॅचरल रिलॅक्सरही म्हटलं जातं. तegume, हिरव्या भाज्या, दूध, दही यांमध्ये मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असतं.

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळेही डोकेदुखी होऊ शकते. पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात. त्यामुळे दररोज किमान दोन ते अडीच लीटर पाणी पिणं आवश्यक आहे.

बी2 जीवनसत्त्वामुळे खाल्लेलं अन्न पचतं आणि अन्नातील पोषकतत्त्व शोषून घेण्याचं काम करतं. हे जीवनसत्त्व हिरव्या पालेभाज्या, दुग्धजन्य पदार्थ, कडधान्य यातून बी2 जीवनसत्त्व मिळतं. हे जीवनसत्त्व स्नायू आणि नसांना स्वस्थ ठेवण्याचं काम करतात.

डॉक्टरांच्या मते, 19 वर्षांहून जास्त वयाच्या पुरुषांसाठी 1.3mg आणि महिलांसाठी 1.1mg प्रमाणात बी2 जीवनसत्त्व गरजेचं आहे. जर महिला गरोदर असेल किंवा नुकतंच बाळाला जन्म दिला असेल तर 1.4 ते 1.6mg बी2 जीवनसत्त्व गरजेचं आहे.

फॉलिक असिडसह बी कॉम्प्लेक्ससह सर्व जीवनसत्त्व नर्वस सिस्टिमसाठी महत्त्वाची असतात. बी कॉम्प्लेक्समध्ये बी1, बी2, बी3, बी5, बी6, बी12 जीवनसत्त्व असतात.

सोडियमच्या कमतरतेमुळेही डोकेदुखी होऊ शकते. व्यायाम किंवा शारीरिक हालचालींमध्ये जर तुम्ही फक्त गोड पदार्थ खात असाल तर शरीरात मीठाचं प्रमाण कमी होऊ शकतं. शरीरात मीठ कमी झाल्यामुळेही डोकेदुखी होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2019 05:23 PM IST

ताज्या बातम्या