या सवयींमुळे अनेकजण होतात हृदय विकाराचे शिकार

या सवयींमुळे अनेकजण होतात हृदय विकाराचे शिकार

डॉक्टरांच्यामते, चुकीच्या सवयी आणि बदलती जीवनशैली या सगळ्याच्या परिणाम हृदयावर होतो.

  • Share this:

बदलत्या जीवनशैलीमुळे भारतातली तरुणाई अनेक आजारांनी ग्रस्त आहे. याततही हृदयाशी निगडीत अनेक विकार मोठ्या प्रमाणात तरुणांना होत आहेत. डॉक्टरांच्यामते, चुकीच्या सवयी आणि बदलती जीवनशैली या सगळ्याच्या परिणाम हृदयावर होतो. नेमकी त्या कोणत्या सवयी असतात ज्यामुळे हृदयाचे गंभीर आजार होतात ते जाणून घेऊ...

सतत टीव्ही पाहणं- अनेक तास टीव्ही किंवा कॉम्प्यूटरच्या समोर बसल्यास हृदयाशी निगडीत आजारांचा धोका 80 टक्क्यांनी वाढतो. भलेही तुमचं वजन योग्य असलं तरी जास्तवेळ टीव्ही आणि कॉम्प्यूटर समोर बसल्यास शरीरातील चरबी वाढते आणि रक्तातील साखरेचं प्रमाणही वाढतं.

झोपेत घोरणं- जर तुम्हाला झोपेत घोरण्याची सवय असेल तर या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. कारण घोरण्याची समस्या ऑब्सट्रक्टिव स्लीप एप्निया या आजाराचा संकेत देते. जास्तकरून ही समस्या लठ्ठ लोकांमध्ये दिसून येते.

दातांमध्ये दुखणं- संशोधनात यावर स्पष्टता झाली नसली तरी दात दुखणं आणि हृदय रोग यांचा जवळचा संबंध आहे. जेव्हा तुम्ही तोंड स्वच्छ साफ करत नाही तेव्हा बॅक्टेरिया आणि प्लाक जमा होतात आणि पुढे जाऊन दातांच्या धमण्यांमध्ये प्लाक जमा होऊन हृदयासाठी धोका निर्माण होतो.

मद्यपान करणं- अनेक तरुण फॅशनच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात मद्यपान करतात. दारू हृदयासाठी कोणत्याही शापापेक्षा कमी नाही. थोड्या प्रमाणात मद्यपान करण्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकतं. मात्र त्याहून जास्त सेवन असल्यास हृदय विकाराचा धोका बळावतो.

फळं आणि भाज्या न खाणं- आरोग्य सुदृढ ठेवायचं असेल तर ताजी फळं आणि भाज्या खाण्याला पर्याय नाही. दिवसभरात पाच फळं आणि भाज्या खाल्ल्याने हृदयाशी निगडीत आजार 20 टक्क्यांनी कमी होतात.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

ही 5 फळं कॅन्सरला ठेवू शकतील कायमचं दूर

अन्न चावण्याची योग्य पद्धत कळली तर कधीही होणार नाही पोटाचे आजार!

Research: ...म्हणून विवाहबाह्य संबंधांत पुरुषांपेक्षा महिला असतात जास्त आनंदी

Vastushastra: स्वप्नातही या 7 गोष्टी घरात करू नका, नाही तर...

पुणे: पाण्यात अडकलेल्या चिमुकल्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2019 01:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading