Home /News /lifestyle /

Ramadan 2021 – डायबिटीजच्या रुग्णांनी रोझा ठेवण्याआधी करा हे उपाय

Ramadan 2021 – डायबिटीजच्या रुग्णांनी रोझा ठेवण्याआधी करा हे उपाय

मधुमेही रुग्णांनी (diabetes patients) डॉक्टरांच्या सल्लानेच उपवास करावा.

    मुंबई, 14 एप्रिल : रमजानचा पवित्र महिना (Ramadan 2021) सुरू झाला आहे. मुस्लिम बांधवांमध्ये या महिन्याचं विशेष महत्त्व आहे. मुस्लिम बांधव या महिन्यात कडक असे उपवास करतात. जवळपास प्रत्येक मुस्लिम हा उपवास करतो. याला रोझा (roza) असं म्हटलं जातं. अगदी पहाटेच न्याहारी केली जाते तर त्यानंतर दिवसभर पाण्याचा घोटही घेतला जात नाही आणि संध्याकाळी इफ्तारी म्हणजेच फराळ करून उपवास सोडला जातो. असा हा उपवास संपूर्ण महिनाभर चालतो. पण उपवास म्हणजे त्याचा शरीरावर परिणाम होतो. त्यातही मधुमेही रुग्ण असेल तर त्यांना आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे रोझा करताना मधुमेही रुग्णांनी रोझा करावा की नाही आणि रोझा केला तर नक्की काय काळजी घ्यावी, असे प्रश्न पडतात. हेच सगळे मुद्दे लक्षात घेऊन अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या जेएन मेडिकल कॉलेजच्या एका सेमिनार मध्ये जेएन मेडिकल कॉलेजच्या राजीव गांधी (Rajiv Gandhi) सेंटर फॉर डायबिटीज अँड अँडोक्रॉइनोलॉजी आणि मेडिसिन विभागाच्या वक्त्यांसमवेत अन्य वक्त्यांनी रोझा ठेवण्याबाबत तसंच मधुमेहींनी रोझा ठेवताना नक्की काय काळजी घ्यावी याबद्दल माहिती दिली. मधुमेहींनी ही काळजी घ्यावी काही शोध सांगतात की उपवास शरीरासाठी चांगला असतो पण मधुमेहीसांठी हा घातक ठरू शकतो. त्यामुळे योग्य डॉक्टरच्या सल्ल्यानेच रोझा ठेवणं योग्य. हे वाचा - अरे बापरे! बिस्कीट खाताच मॉडेलला मारला लकवा; आता झाली भयंकर अवस्था रोझाचे मधुमेहींवर वेगवेगळे परिणाम होऊ शकतात. ज्यांना उच्च मधुमेह आहे किंवा रक्त शर्करा कमी असते किंवा गर्भवती आहात त्यांनी रोझा ठेवू नये. मधुमेह पीडित लोकांनी कमीत कमी एक महीना आधी आपल्या डॉक्टरचा सल्ला घेतला पाहिजे कारण रोझा ठेवल्यानंतर त्यांच्या औषधांमध्ये किंवा त्याच्या मात्रेत बदल होऊ शकतात. मधुमेहींनी सकाळची न्याहारी किंवा संध्याकाळचा फराळ हा संयमाने करायला हवा. साखर असलेले पेय, तळलेले पदार्थ, उच्च कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ टाळालया हवेत. हे वाचा - सूर्यप्रकाशात ती बाहेर पडूच शकत नाही; महिलेला आहे Rare Sunlight Allergy आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळोवेळी आपली साखर तपासायला हवी त्याने रोझा तुटत नाही.
    Published by:News Digital
    First published:

    Tags: Diabetes, Health Tips, Lifestyle, Ramdan, Tips for diabetes

    पुढील बातम्या