नवी दिल्ली, 31 मे : नावात काय आहे? असं प्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक विल्यम शेक्सपिअरने (William Shakespeare) म्हटलं आहे; पण तुमच्या नावाच्या सुरूवातीला जे अक्षर येतं, त्यावरून तुमचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्य या सर्वांबद्दल जाणता येऊ शकतं.
ज्योतिषशास्त्रामध्ये (Astrology) काही अक्षरांना शुभ मानलं जातं. आपल्या जीवनामध्ये जी काही सुख-शांती, वैभव, पैसा, संपत्ती, ऐश्वर्य प्राप्त होतं ते सर्व या अक्षरांमुळे असल्याचं अनेकजण मानतात.
काही वर्षांपूर्वी टीव्हीवरील मालिकांची नावंही एखाद्या विशिष्ट अक्षरांवरून सुरू होणारी दिली जात होती. या मालिकांना प्रेक्षकांचं भरभरून मिळणारं प्रेम अक्षरांमुळेच असल्याचं मालिकांचे निर्माते व दिग्दर्शक वेळोवेळी सांगतही आले आहेत. जीवन आनंदी आणि ऐश्वर्यसंपन्न बनवणारी अशी कोणती भाग्यवान अक्षरं आहेत, याचा उहापोह ‘झी न्यूज हिंदी’च्या वृत्ताद्वारे करण्यात आला आहे.
अक्षर ‘अ’ (A) : गरीब कुटुंबात जन्मतात, मेहनतीवर यशोशिखर गाठतात -
ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या लोकांचे नाव मराठी ‘अ’ किंवा इंग्रजी ‘A’ या अक्षरापासून सुरू होतं, अशा व्यक्ती खूप भाग्यवान असतात. एखादी गोष्ट ठरवली की ती पूर्ण करेपर्यंत स्वस्थ बसत नाहीत. या अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती गरीब कुटुंबात जन्म घेतात. परंतु, मेहनत आणि आपल्या चातुर्याने अमाप पैसा कमवून यशोशिखरावर जाऊन पोहोचतात. अशा व्यक्ती शांततामय व सुख-समृद्धीचे जीवन जगतात.
अक्षर ‘क’, ‘ख’ (K) : स्मितहास्याने जिंकतात मनं, पैसाही कमावतात -
ज्यांची नावं मराठी ‘क’, ‘ख’ किंवा इंग्रजी ‘K’ अक्षरापासून सुरू होतात, अशा व्यक्ती जन्मत:च भाग्यशाली असतात. आयुष्यात हे लोक खूप पैसा कमवतात. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते खूप प्रसिद्ध होतात. आपल्या स्मितहास्यानेच ते सर्वांची मनं जिंकतात.
अ
क्षर ‘प’, ‘फ’ (P) : दिलखुलास व्यक्तिमत्त्व अन् चांगले मित्र असतात -
ज्यांचं नाव मराठी अक्षर ‘प’, ‘फ’ किंवा इंग्रजी अक्षर ‘P’ ने सुरू होतं, अशा व्यक्तींचं व्यक्तिमत्व दिलखुलास असतं. ते खूप चांगले मित्र असतात. त्यांच्याकडे अमाप पैसा व संपत्ती असते व खर्च करण्यामध्ये ते कधीही मागे हटत नाहीत. त्यांच्या हजरजवाबीपणाने ते इतरांना आपल्याकडे आकर्षित करतात.
अक्षर ‘स’, ‘श’ (S) : मेहनती स्वभाव अन् आव्हानांचा करतात सामना -
ज्यांचं नाव मराठी अक्षर ‘स’ ‘श’ किंवा (S) या अक्षरांपासून सुरू होतं, त्या व्यक्ती खूप मेहनती आणि प्रतिभावान असतात. यश मिळवण्यासाठी असे लोक जीवतोड मेहनत करतात. जीवनात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाचा ते न डगमगता सामना करतात. त्याचमुळे आयुष्यात त्यांना अमाप पैसा, सुख, समृद्धी, लोकप्रियता, सुखसुविधा असं सर्वकाही मिळतं.
ज्योतिषशास्र किंवा अंकशास्र यावर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे त्यामुळे तुम्हाला पटत असेल तर तुम्हीही याबद्दल अधिका जाणून घेऊ शकता. दुसरा मार्ग इथली वर्णनं तुम्हाला किंवा तुमच्या मित्रांना लागू होतात का हे पण करमणूक म्हणून पडताळून पाहू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.