कोणत्याही असो शारीरिक वेदना; औषधांविना फक्त घरातील पदार्थांपासून मिळेल आराम

कोणत्याही असो शारीरिक वेदना; औषधांविना फक्त घरातील पदार्थांपासून मिळेल आराम

वारंवार वेदनाशामक घेणे शरीरासाठी घातक आहे.

  • Last Updated: Aug 10, 2020 08:32 PM IST
  • Share this:

कुठल्याही प्रकारच्या वेदना सुरू झाल्या की लगेच लोक वेदनाशामक औषध घेतात. वारंवार वेदनाशामक घेणे शरीरासाठी घातक आहे. डोकेदुखी, अर्धशिशी किंवा कंबरदुखी असो. घरातील नैसर्गिक वस्तूचा उपयोग करून या वेदनांपासून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा. आपल्या स्वयंपाक घरात असे पदार्थ आहेत जे वेदना शमवण्यासाठी मदत करतात.

हळद

हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्याने अंगदुखी, सांधेदुखी यापासून आराम मिळतो. myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला म्हणाले, हळदीत भरपूर प्रमाणात अँटीबायोटिक, अँटीबॅक्टीरियल, अँटी फंगल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुण आहेत. या वेदनाशामक औषधाचा उपयोग ऑस्टियोआर्थराइटिस, रूमेटॉइड आर्थराइटिस, सांधेदुखी, संधिवात आणि स्नायूंच्या वेदनाशमनासाठी होतो.

चेरी

चेरीमध्ये थायमीन, राइबोफ्लॅविन, जीवनसत्व बी6 आणि पॅटोथेनिक अॅसिड खूप प्रमाणात असते. त्यात नायसिन, फोलेट आणि जीवनसत्व ए पण असते. त्यासोबतच यातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सांध्याचे दुखणे, संधिवात यासारखे दुखणे दूर करण्यास मदत करतात. मॅग्नेशियम नैसर्गिकपणे वेदनाशामकाचे काम करते आणि पोटॅशियम सूज कमी करते. अंगदुखीला कायमचे दूर ठेवण्यासाठी नियमित चेरी खायला हवी.

पुदीना

नैसर्गिक वेदनाशामक म्हणून पुदिना खूप उपयोगी आहे. पुदिना सर्व प्रकारच्या वेदनांमध्ये प्रभावी आहे, पण ते पोटाच्या दुखण्यावर जास्त परिणामकारक आहे. पुदिना पचनाला मदत करते आणि त्याने स्नायूंच्या वेदना, डोकेदुखी, दातांच्या वेदनांपासून आराम मिळतो.

आलं

आल्याचं सेवन शारीरिक वेदनाच नाही तर सूज पण कमी करतात. त्यातील नैसर्गिकपणे उपलब्ध असलेले एनाल्जेसिक वेदनाशामक आहे. ते गळ्यातील खवखव आणि वेदना दूर करते. पाळीच्या काळात शरीराचे आखडणे आणि स्नायूंच्या वेदना देखील आल्याने कमी होतात.

लाल मिरची

लाल मिरचीमध्ये असलेले कॅप्सेकिन हे तत्व वेदना निवारण करणाऱ्या गुणांनी भरपूर आहे आणि औषधांपेक्षा जास्त परिणामकारक आहे. myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, लाल मिरचीची पेस्ट लावल्याने किंवा कॅप्सूल खाल्ल्याने सांध्यांचे दुखणे आणि सूज याने नसांमध्ये होणाऱ्या वेदना कमी होतात. आयुर्वेदात याचा उपयोग डोकेदुखी पासून आराम मिळवण्यासाठीदेखील केला जातो.

भोपळ्याच्या बिया

पेपिटास मॅग्नेशियमचा एक चांगला स्त्रोत आहे. हे एक असे क्षार आहे, जे अर्धशिशीपासून आराम देते. ते ऑस्टियोपोरोसिसला प्रतिबंध करण्यास आणि उपचार म्हणूनही मदत करते. रात्री पाय आखडतात ते रोखण्यासाठीसुद्धा उपयुक्त आहे.

मासे

माशांमध्ये असलेले ओमेगा-3 फॅट सूज कमी करणे आणि वेदनांपासून वाचवण्यात मदत करते. ओमेगा-3 फॅट सॅल्मन माशात असते. हा मासा खाल्ल्याने संधीवातातील सूज खूप कमी होते.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - अंगदुखी

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: August 10, 2020, 8:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading