मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

औषधं घेताना तुमच्या 4 चुका पडतील महागात; फायद्याऐवजी होईल गंभीर दुष्परिणाम

औषधं घेताना तुमच्या 4 चुका पडतील महागात; फायद्याऐवजी होईल गंभीर दुष्परिणाम

औषधांचे सेवन करताना (Before taking medicine) किंवा इतर कुणालाही देताना काही गोष्टींची काळजी घेण आवश्यक असतं. योग्य माहितीशिवाय औषध  (Medicine without Information ) घेतल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात.

  • Published by:  News18 Desk
दिल्ली, 02 मे :  आजच्या काळात छोट्याछोट्या दुखण्यासाठीही औषधं (Medicine) घेण्याची अनेकांना सवय असते. त्यामुळे दर दहा पंधरा दिवसांनी कोणत्या ना कोणत्या कारणाने औषधं, गोळ्या घ्याव्या लागतात असे आपल्याच आसपास बरेच लोक सापडतील. वय कोणतंही असो औषधं आयुष्याचा भागच बनून गेली आहेत. पण औषधं घेताना नजर चुकीने होणाऱ्या चुका (Mistakes while taking medicine) महागात पडू शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं बऱ्याच वेळा एखादा त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं (Medications without a doctor's Advice) घेण्याची सवय असणाऱ्यांना भविष्यात त्याचा त्रास सहन करावा लागतो. एखादं दुखंणं, आजार झाला की अनेक सल्ले देणारे भेटतात. कुणाच्या तरी सल्ल्याने पेनकिलर खाणं चुकीचं आहे. पेनकिलर आपल्या शरीरासाठी योग्य आहे का? याची आहिती घ्यायला हवी. एखादी पेनकिलर जरी तुमचं दुखणं कमी करत असेल तरी, तिचे वाईट परिणाम शरीरावर होत असतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं टाळलं पाहिजे. (तुम्हाला गंभीर कोरोना तर नाही ना? फक्त लघवीतूनच होणार निदान) छोट्या-छोट्या कारणांसाठी औषधं घेणं हल्ली कोणत्याही वयातल्या लोकांना छोटं दुखणंही सहन होत नाही. डोकेदुखी, मासिक पाळीच्या वेळी होणारी पोटदुखी, थकव्यामुळे झोप येत नसेल तर ताकद वाढवण्यासाठी तर डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नये. अशा गोळ्या किडनीच्या आजारांना आमंत्रण देतात. वेगवेगळ्या प्रकारची औषधं, पेनकिलर आपल्या किडनीवर वाईट परिणाम करतात. एक्सापायरी डेट चेक करा घरात काही औषधं पडून असतील तर त्यांची एक्सपायरी डेट चेक करावी. एक्सपायर झालेली औषधं खाल्ल्याने शरीरावर त्याची रिअॅक्शन होऊ शकते. मेडिकलमधून औषधं विकत घेतानाही औषधांवरील एक्सपायरी डेट चेक करावी. अशी औषधं घरात असतील तर ती फेकून द्यावीत. (फक्त 14 दिवस आणि 3 टप्पे; कोरोनाविरोधी लढा जिंकण्याचा बेस्ट फॉर्म्युला) इतरांची औषधं वापरू नये एखाद्या आजारी व्यक्तीला डॉक्टरने दिलेली औषधं दुसऱ्या व्यक्तीने खाऊ नयेत. एखाद्या व्यक्तीला समस्या असल्यास, डॉक्टरांनी त्याच्यासाठी औषधं लिहून दिल्यास कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याला अशीच समस्या असल्यास तेच औषधं दिलं जातं. जरी डॉक्टरांनी ही औषधं काही विशिष्ट समस्येसाठी लिहून दिली असली तरी, इतर कोणीही ती खाऊ नयेत. प्रत्येकाची योग्य प्रकारे तपासणी केल्यानंतरच डॉक्टर त्यांना औषधं लिहून देतात. म्हणूनच इतर कोणी असं औषध खाणं टाळावं.
First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle, Medicine

पुढील बातम्या