मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तुम्हीही नाश्त्याच्यावेळी या चुका करता? आत्ताच बदला सवय, शुगर वाढण्यासोबत होतात अनेक दुष्परिणाम

तुम्हीही नाश्त्याच्यावेळी या चुका करता? आत्ताच बदला सवय, शुगर वाढण्यासोबत होतात अनेक दुष्परिणाम

नाश्त्याच्यावेळी टाळा या चुका

नाश्त्याच्यावेळी टाळा या चुका

  मुंबई, 17 ऑगस्ट : तुम्ही ऐकले असेलच की सकाळचा नाश्ता हा दिवसभरातील आपल्या आहारातील सर्वात महत्त्वाचा पदार्थ आहे. त्यामुळे निरोगी जीवनशैलीसाठी निरोगी नाश्ता करणे खूप महत्वाचे आहे. अनेकजण सकाळच्या घाईत नाश्ता करणं विसरतात आणि सरळ जेवण करणं पसंत करतात. असे अनेक लोक आहेत जे सकाळी तळलेल्या भाजलेल्या गोष्टी खाऊन पोट भरतात. पण अशा सवयींचा तुमच्या आरोग्यावर खूप परिणाम होतो. EatThis च्या मते, आहारतज्ञांचा असा विश्वास आहे की जर तुम्हाला तुमच्या रक्तातील साखरेची समस्या वाढवायची नसेल, तर तुम्ही नाश्त्यामध्ये काही चुका करणे टाळले पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया शुगरची समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी नाश्ता करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. ब्रेकफास्टदरम्यान या चुका करू नका कमी फायबर घेणे जर तुम्ही नाश्त्यामध्ये फायबरचे प्रमाण कमी ठेवत नसाल तर कार्बोहायड्रेट तुमच्या रक्तप्रवाहात वेगाने विरघळू लागते आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखर वाढण्याची शक्यता वाढते. एवढेच नाही तर फायबरमुळे तुमची पचनक्रिया चांगली राहण्यासही मदत होते. त्यामुळे 5 ग्रॅम कार्बोहायड्रेट्ससह 1 ग्रॅम फायबरचे सेवन केल्यास चांगले होईल.

  लहान मुलांना Monkeypox चा जास्त धोका; व्हायरसपासून वाचवण्यासाठी द्या हे सुपरफूड

  नाश्ता न करणे बरेच लोक घाईघाईत नाश्ता करणे सोडून देतात. मात्र तुमच्या या सवयीमुळे रक्तातील साखर नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. यामुळे मधुमेह टाइप 1 ची समस्या उद्भवू शकते आणि त्यामुळे हृदयविकार, मज्जातंतू, किडनी खराब होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. तुमच्या या निष्काळजीपणामुळे अवयव आणि ऊतींचेही नुकसान होऊ शकते. प्रोटीनची कमतरता नाश्त्यात फायबर असणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकाच गरजेचा आहे प्रोटीनचा समतोल सेवन. यासाठी तुमच्या नाश्त्याची योजना अशा प्रकारे करा की सकाळी तुमच्या प्लेटमध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, फॅट तसेच प्रोटीन यांचा समावेश असेल. यासाठी तुम्ही ड्रायफ्रुट्स, दही, दूध, अंडी इत्यादींचा समावेश नाश्त्यात करू शकता. Increase Eyesight : निरोगी डोळ्यांसाठी आहारात या गोष्टींचा करा समावेश; मिळतील सर्व पोषक घटक हेल्दी फॅट्सचे सेवन न करणे प्रोटीनप्रमाणेच हेल्दी फॅट्सदेखील रक्तात कार्बोहायड्रेट विरघळण्याचा दर कमी करते. जे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. हे शरीरातील कोणत्याही प्रकारची जळजळ कमी करण्यास देखील मदत करते. अशा परिस्थितीत नाश्त्यामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिडचा समावेश जरूर करावा.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle, Superfood

  पुढील बातम्या