मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

मेकअप बॉक्समधील या वस्तू बाथरूमचा करतील कायापालट, दिसेल अधिक स्वच्छ आणि चमकदार

मेकअप बॉक्समधील या वस्तू बाथरूमचा करतील कायापालट, दिसेल अधिक स्वच्छ आणि चमकदार

आज आम्‍ही तुम्‍हाला टॉयलेट स्वच्छ करण्‍यासाठी अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही काही मेकअप प्रॉडक्ट्स वापरून बाथरूम सहज स्वच्छ करू शकता.

आज आम्‍ही तुम्‍हाला टॉयलेट स्वच्छ करण्‍यासाठी अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही काही मेकअप प्रॉडक्ट्स वापरून बाथरूम सहज स्वच्छ करू शकता.

आज आम्‍ही तुम्‍हाला टॉयलेट स्वच्छ करण्‍यासाठी अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही काही मेकअप प्रॉडक्ट्स वापरून बाथरूम सहज स्वच्छ करू शकता.

  मुंबई, 16 ऑगस्ट : अनेक वेळा असे डाग आणि घाण टॉयलेटवर जमा होते. जी साफ करूनही साफ होत नाही. यामुळे आपल्याला कधी कधी मनस्तापाचा सामनाही करावा लागतो. आज आम्‍ही तुम्‍हाला टॉयलेट स्वच्छ करण्‍यासाठी अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही काही मेकअप प्रॉडक्ट्स वापरून बाथरूम सहज स्वच्छ करू शकता. जाणून घेऊया कोणते आहेत ते मेकअप प्रोडक्टस आणि ते कसे वापरायचे. ग्लिसरीन झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, टॉयलेट सीट स्वच्छ करण्यासाठी ग्लिसरीन खूप मदत करू शकते. यासाठी कोल्ड्रिंकची 1 बाटली घ्या आणि त्यात 1 कप व्हाईट व्हिनेगर घाला आणि चांगले मिसळा. यानंतर एक कप ग्लिसरीन, 4-5 चमचे लिंबाचा रस आणि 2 चमचे ऑलिव्ह ऑइल घालून चांगले मिसळा. हे मिश्रण तुम्ही बाटलीत साठवून गरजेनुसार टॉयलेट सीटवर स्प्रे करून स्वच्छ करू शकता. बनवलेले हे क्लिनर वापरण्यापूर्वी चांगले मिक्स करून वापरा.

  Furniture Cleaning Tips: वर्षानुवर्षे टिकेल घरातील फर्निचर, फक्त ‘या’ टिप्स फॉलो करा

  टॅल्कम पावडर टॅल्कम पावडर चेहऱ्यावर लावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. त्यामुळे प्रत्येकाच्या मेकअप बॉक्समध्ये ते असतेच. हे टॅल्कम पावडर तुम्ही बाथरूम स्वच्छ ठेवण्यासाठीदेखील वापरू शकता. बाथरूममध्ये खूप वास येत असेल तर टॉयलेट पॉटमध्ये थोडी टॅल्कम पावडर टाका आणि नंतर फ्लश करा. सलग ४-५ दिवस टॅल्कम पावडर वापरल्याने तुमच्या बाथरूमचा वास पूर्णपणे निघून जाईल. हे करताना लक्षात ठेवा की यासाठी फक्त टॅल्कम पावडर वापरा. इतर कोणतेही पावडर टॉयलेट पॉटमध्ये टाकू नका. Wash Basin Cleaning: वॉश बेसिन स्वच्छ करण्यासाठी करू नका जास्त खर्च, अगदी स्वस्तात होईल चकाचक टूथपेस्ट टूथपेस्टचा वापर बाथरूममधील इतर वस्तू स्वच्छ करण्यासाठी केला जाऊ शकतो. टॅप आणि वॉश बेसिनसारख्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्ट स्क्रबरमध्ये लावून घासून घ्या. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही त्यात थोडासा बेकिंग सोडादेखील टाकू शकता. टॅप आणि वॉश बेसिनवर 5-7 मिनिटे टूथपेस्ट लावून ठेवा आणि नंतर पाण्याने धुवा आणि टिश्यू किंवा कपड्याने पुसून घ्या. यामुळे टॅप आणि वॉश बेसिनवरील सर्व डाग सहज निघून जातील.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle

  पुढील बातम्या