मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

डिप्रेशनमधून बाहेर कसं पडायचं? 'हे' उपाय ठरतील प्रभावी

डिप्रेशनमधून बाहेर कसं पडायचं? 'हे' उपाय ठरतील प्रभावी

सध्याच्या काळात मूड ऑफ असणे (mood disturb) , चिंता वाटणे, अस्वस्थ वाटणे या गोष्टी साहजिक आहेत. पण याचा आरोग्यावर घातक परिणाम होत असतो.

सध्याच्या काळात मूड ऑफ असणे (mood disturb) , चिंता वाटणे, अस्वस्थ वाटणे या गोष्टी साहजिक आहेत. पण याचा आरोग्यावर घातक परिणाम होत असतो.

सध्याच्या काळात मूड ऑफ असणे (mood disturb) , चिंता वाटणे, अस्वस्थ वाटणे या गोष्टी साहजिक आहेत. पण याचा आरोग्यावर घातक परिणाम होत असतो.

  मुंबई 02 मे : सध्याच्या काळात मूड ऑफ असणे (mood disturb) , चिंता वाटणे, अस्वस्थ वाटणे या गोष्टी साहजिक आहेत. पण याचा आरोग्यावर घातक परिणाम होत असतो. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करुनही चालत नाही. ही डिप्रेशनची (depression) लक्षणं असतात. डिप्रेशनमध्ये असणारी व्यक्ती सहसा कोणाशी मिसळत नाही. या व्यक्तीचा मूड सतत खराब दिसतो. त्यामुळे काही सोप्या उपायांनी यातून मार्ग काढता येईल. काय आहेत हे उपाय पाहूयात स्वत:साठी एक सपोर्ट नेटवर्क तयार करा डिप्रेशन किंवा चिंतेतून बाहेर येण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे स्वतःची मदत करणे. यासाठी स्वत:साठी एक आधार तयार करा, एक नेटवर्क तयार करा. मित्रमैत्रीणींसोबत किंवा काहींसाठी ते कुटुंबीयांसोबतदेखील असू शकते. त्यामुळे एक सामाजिक सपोर्ट तयार होईल. तणाव कमी करा जेव्हा तुम्ही ताणतणावात असता तेव्हा शरीर कोर्टिसोल नावाचं हॉर्मोन तयार करते. हे जास्त काळ राहिल्यास ते शरिरात डिप्रेशन तयार करु शकते. त्यामुळे ताणतणाव कमी करा.

  सुंदर, सुगरण नव्हे तर अशी बायको हवी मला! पत्नीबाबत बदलल्या तरुणांच्या अपेक्षा

  चांगली झोप पूर्ण करा चांगला मूड तयार करण्यासाठी उत्तम आणि संपूर्ण झोप (good sleep)  फार महत्त्वाची असते. डिप्रेशनचे शिकार असणारे अनेक लोक हे झोपेच्या समस्येनं त्रस्त असतात. अनेकांना नीट झोप लागत नाही. त्यासाठी झोपण्याच्या किमान एक तास आधी इलेक्ट्रॉनिक साधनं बंद करा व वाचन किंवा अन्य काही अॅक्टिव्हिटी करा. चांगली झोप लागते. जेवणाच्या पद्धती सुधारा डायट आणि मानसिक आजार यांच्यावर अजून शोध सुरु असला तरीही खाल्लेल्या अन्नाचा आणि सवयींचा मानसिक दृष्ट्या मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे योग्यवेळी आणि योग्य अन्न ग्रहन करणे गरजेचे असते. नकारात्मक विचारांना आवर घाला नकारात्मक विचार डिप्रेशनचं फार मोठ कारण आहेत. अनेक पुस्तक, ऑनलाइन क्लासेस यावर मार्गदर्शन करतात. त्यामुळे नकारात्मक विचारांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. चांगल्या सवयींची यादी तयार करा डिप्रेशनला दूर करुन मूड चांगला करायचा असल्यास स्वत:विषयी काही गोष्टी समजून घेणं गरजेचं असतं. यासाठी काही गोष्टींची यादी तयार करा. त्यात जसे की, पाळीव प्राण्यांना पाळून त्यांना प्रेम देणं, गाणे ऐकणे, हॉट बाथ घेणं किंवा चांगलं पुस्तक वाचणं, अशा अनेक गोष्टींचा समावेश या यादीत करता येईल. जेव्हा मूड खऱाब वाटत असेल अशावेळी या गोष्टी केल्याने मूड ठिक होण्यास मदत होईल.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Depression, Health Tips, Personal life

  पुढील बातम्या