Home /News /lifestyle /

Kidney Damage : तुमच्या 'या' सवयींमुळे किडनीचं होतंय मोठं नुकसान; अशी घ्या काळजी

Kidney Damage : तुमच्या 'या' सवयींमुळे किडनीचं होतंय मोठं नुकसान; अशी घ्या काळजी

निरोगी शरीरासाठी किडनी चांगल्या स्थितीत ठेवणे महत्त्वाचे असते. परंतु तुमच्या दैनंदिन आयुष्यातील काही सवयी तुमच्या किडनीला नुकसान पोहचवू शकतात.

  मुंबई, 28 जून : आपल्या शरीराच्या एकूण आरोग्यामध्ये मूत्रपिंड (Kidney) अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजाव असतात. मूत्रपिंड शरीरातून विष्टा आणि अतिरिक्त द्रव काढून टाकण्यास मदत करतात. शरीरातील पाणी, क्षार आणि खनिजे यांचे निरोगी (Health Tips) समतोल राखण्यासाठी मूत्रपिंड शरीरातून आम्ल देखील काढून टाकतात. तुम्ही हे निरोगी संतुलन राखले नाही तर तुमचे न्यूरॉन्स, स्नायू आणि शरीरातील ऊती खराब होऊ (Kidney Problems) शकतात. थोडक्यात निरोगी शरीरासाठी मूत्रपिंडांना चांगल्या स्थितीत (Kidney Health) ठेवणे महत्त्वाचे असते. डॉ एल एच हिरानंदानी हॉस्पिटलचे सीईओ डॉ सुजित चॅटर्जी यांनी 'इंडिया डॉट कॉम'शी बोलताना काही सवयी सांगितल्या आहेत ज्या तुमच्या मूत्रपिंडाला हानी पोहोचवू शकतात. चला जाणून घेऊया निरोगी शरीरासाठी कोणत्या सवयी टाळायला हव्यात याविषयी... व्हिटॅमिनची कमतरता असलेला आहार काही जीवनसत्त्वे तुमच्या किडनीसाठी फायदेशीर असतात आणि त्यांच्या कमतरतेमुळे किडनीला नुकसान होऊ शकते. किडनीचा आजार असलेल्या लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आढळून येते. व्हिटॅमिन बी 6 देखील इतर औषधांसोबत घेतल्यास मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते. दररोज 10-15 मिनिटे उन्हात बसून व्हिटॅमिन डी मिळवता येऊ शकते. व्हिटॅमिन बी 6 हे सॅल्मन, चणे, बटाटे आणि इतर पिष्टमय अन्नपदार्थ आणि लिंबूवर्गीय नसलेल्या फळांमधून मिळू शकते.

  Muscle Pain: अंगदुखीने त्रस्त असाल तर आहारात करा असा बदल; गोळ्या खाण्यापूर्वी करा हे उपाय

  प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचा अतिवापर रात्री प्रक्रिया केलेले अन्न (processed foods) खाल्ल्याने समाधान मिळते मात्र ते तुमच्या मूत्रपिंडासाठी हानिकारक ठरू शकते. प्रक्रिया केलेल्या अन्नात सोडियम आणि फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ते किडनीसाठी नुकसानदायक ठरू शकते. जास्त मिठ खाणे जास्त प्रमाणात मीठाचा (सोडियम) वापर केलेले अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि त्यामुळे मूत्रपिंडाला इजा होऊ शकते. अन्न पदार्थांमध्ये अधिकचे मीठ वापरण्याऐवजी त्यात औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा वापर करून पाहा. ही सवय तुम्हाला कालांतराने आहारात अधिकचे मीठ घालणे टाळण्यास मदत करेल. वेदनाशामक औषधांचा अतिवापर सततची डोकेदुखी तुम्हाला दररोज गोळ्या घेण्यास प्रवृत्त करू शकते. परंतु औषधी जास्त प्रमाणात घेणे तुमच्या मूत्रपिंडासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे तुमच्या वेदना तर कमी होतात मात्र त्यामुळे मूत्रपिंडाचा कर्करोग देखील होऊ शकतो. पुरेसा व्यायाम न करणे जे लोक आठवड्यातून किमान तीन वेळा व्यायाम करतात त्यांच्यामध्ये किडनी स्टोन होण्याची शक्यता कमी असते. किडनीचे कार्य बिघडलेल्या लोकांना चालण्याचा सल्ला दिला जाते. कारण त्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांवर मात करता येते. किडनीसह शरीर निरोगी ठेवण्यासाठी दिवसातून किमान 30 मिनिटे आणि आठवड्यातील पाच दिवस व्यायाम करावा.

  Hing Health Benefits : हिंग खाण्याचे हे फायदे माहिती आहेत का? बीपी आणि डायबीजसाठीही ठरते उपयुक्त

  पाणी कमी पिणे शरीर हायड्रेटेड ठेवणे अतिशय गरजेचे असते. भरपूर पाणी पिल्याने किडनीला कचरा काढून टाकण्यास मदत होते. खूप कमी द्रवपदार्थात खूप जास्त टाकाऊ पदार्थांमुळे किडनी स्टोन आणि मूत्रपिंडाच्या इतर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे तज्ज्ञांकडून दररोज 12 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. जास्त प्रमाणात अल्कोहोल घेणे तुम्ही अल्कोहोल किंवा वाइनशिवाय जगू शकत नसाल तर ते तुमच्या मूत्रपिंडासाठी हानिकारक ठरू शकते.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle

  पुढील बातम्या