जास्त थकवा जाणवतोय? तुम्हाला असू शकतो थायरॉईडचा त्रास; ‘ही’ 4 योगासनं ठरतील उपयुक्त

जास्त थकवा जाणवतोय? तुम्हाला असू शकतो थायरॉईडचा त्रास; ‘ही’ 4 योगासनं ठरतील उपयुक्त

योगाने शरीर, मन आणि जीवनाचा उत्तम ताळमेळ साधता येतो. त्यामुळे थायरॉइडला मुळापासून नष्ट करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही योग सांगणार आहोत.

  • Share this:

मुंबई, 15 जुलै : थायरॉइडचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशातील प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये थायरॉइडचं निदान दिसून येतं. खासकरून महिलांमध्ये याचं प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांना शारीरिक आणि मानसिक ताण-तणावांचा सामना जास्त प्रमाणात करावा लागतो. धावपळीची जिवनशैली असणाऱ्या महिलांमध्ये थायरॉईड फार सर्वसामान्य झालयं. फक्त एवढचं नाही तर, थायरॉईडमुळे वजन वाढणे, सांधेदुखी, नैराश्य, हार्मोनमध्ये असंतोल आणि हृदयाशी निगडीत आजार होतात. रक्तदाब, हृदयरोग, फुफ्फुसाचे आजार तसेच आरोग्याशी निगडीत अन्य अनेक समस्यांवर योगाभ्यास प्रभावी ठरतं.  महिलांकरिता योग अतिशय फायदेशीर आहे. विशेषत: स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर), हार्मोनमधील असमतोल अशा समस्यांपासून योग केल्यानं सुटका होऊ शकते. योगाने शरीर, मन आणि जीवनाचा उत्तम ताळमेळ साधता येतो. त्यामुळे थायरॉइडला मुळापासून नष्ट करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही योग सांगणार आहोत.

कपालभाती प्राणायाम

कपालभाती हे एक असं आसन आहे ज्यामध्ये सगळ्या योगासनांचा फायदा होतो. शरीरातील विषारी द्रव्यं हे आसन करताना श्वासाद्वारे बाहेर टाकली जातात. हे आसन करण्यासाठी तुम्ही सिद्धासन, पद्मासन किंवा वज्रासन या स्थितीमध्ये बसून श्वास हळू हळू बाहेर सोडावा.

सावधान ! आंघोळ करताना करताय का 'या' चुका? तुमचं होतंय मोठं नुकसान

हे करत असाताना पोटाला आतमध्ये दाबून घ्यावे आणि जास्तीत जास्त वेळा श्वासाला बाहेर फेकण्याचा प्रयत्न करावा. दररोज अर्धा तास हे आसन केल्याने फक्त थायरॉईड नाही तर, दात आणि केसाच्या समस्याही दूर होतील.

उज्जयी

आपल्या श्वासावर नियंत्रण मिळवण्यासाठी हे आसन केले जाते. हे आसन करताना गरम हवा शरीरात जाते आणि शरीरातील दूषित पदार्थ बाहेर जाकण्यास मदत होते. हा प्राणायम बसून, उभे राहून आणि झोपून अशा तीन प्रकारे केला जातो.

उभ्याने असे करावे हे आसन –

सावधानच्या स्थितीमध्ये उभे रहावे. दोन्ही पायआणि हाताचे पंजे मोकळे सोडावेत.

जीभेला ओठांमधून हलकेच बाहेर काढावे.

बाहर काढलेल्या जीभेसोबतच श्वासाला सोडावे.

आता हळूहळू मोठा श्वास घ्या आणि जास्त वेळ आत ठेवण्याचा प्रयत्न करा.

शरीराला मोकळे सोडा आणि रोखलेल्या श्वासाला हळूवार बाहेर सोडा.

हे आसन दिवसातून एकदाच करावे.हीय प्रक्रिया बसून आणि झोपूनही केली जाऊ शकते.

रिलेशनशिप दीर्घ काळ टिकवायचं आहे ? मग आपल्या पार्टनरसाठी हे नक्की करा

ग्रीवा संचालन

हे आसन तुम्ही बसलेल्या स्थीतीमध्ये कोठेही करू शकता. म्हणजे घरात, ऑफीसमध्ये काम करत असताना हे आसन करता य़ेऊ शकते. ग्रीवाचा अर्थ होतो गळा. खूप वेळ काम केल्याने मान आणि खांद्यांमध्ये दुखणं चालू होतं. ग्रीवा संचालन म्हणजे मानेला फिरवून व्यायाम करा. याने मानेचा ताण दूर होऊन मानदुखी कमी होते. डोके जड झाल्यासही हे आसन करावे. थायरॉईड ही एक धनुष्याच्या आकाराची ग्रंथी आहे जी तुमच्या गळ्यात असते. थायरॉइडमुळे गळ्याला सूज येते त्यामुळे हे आसन उपयुक्त आहे.

सिंहासन

हे आसन करण्यासाठी वज्रासनच्या स्थितीमध्ये बसावे. गुडघ्यांमध्ये अंतर ठेवून जितके दूर ठेवता येतील तेवढे लांब करावेत. दोन्ही हाताचे तळवे जमिनीला टेकवत, बोटे शरीराकडे ठेवावीत. वाकावे आणि डोक्याला मागे करत जीभेला बाहेर काढावे. डोळ्यांना मोठे करत श्वास घ्यावा. आसनाच्या शेवटी परत वज्रासनमध्ये बसावे. थोड्या वेळाने 5 मिनिटे शवासन करावे.

VIDEO: औरंगाबादमध्ये खळबळ, पायात साखळी कुलूप बांधून फिरतेय महिला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2019 07:30 AM IST

ताज्या बातम्या