मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Kitchen Tips : हे पदार्थ फ्रीजरमध्ये ठेवू नयेत; आरोग्यवर होऊ शकतात उलटे परिणाम

Kitchen Tips : हे पदार्थ फ्रीजरमध्ये ठेवू नयेत; आरोग्यवर होऊ शकतात उलटे परिणाम

काही पदार्थ फ्रीझरल्यामुळं त्यांच्यातील पोषक तत्त्वं कमी होतात किंवा त्यांची चव खूप वाईट होते किंवा अतिथंडपणामुळं त्यांच्यावर प्रक्रिया होऊन ते खाण्यायोग्य राहत नाहीत.

काही पदार्थ फ्रीझरल्यामुळं त्यांच्यातील पोषक तत्त्वं कमी होतात किंवा त्यांची चव खूप वाईट होते किंवा अतिथंडपणामुळं त्यांच्यावर प्रक्रिया होऊन ते खाण्यायोग्य राहत नाहीत.

काही पदार्थ फ्रीझरल्यामुळं त्यांच्यातील पोषक तत्त्वं कमी होतात किंवा त्यांची चव खूप वाईट होते किंवा अतिथंडपणामुळं त्यांच्यावर प्रक्रिया होऊन ते खाण्यायोग्य राहत नाहीत.

नवी दिल्ली, 06 डिसेंबर : आपण बर्‍याचदा भाज्या, फळं आणि दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ खराब होऊ नयेत म्हणून फ्रीझरमध्ये (freezer) ठेवतो. मात्र, यामुळं उलट ते पदार्थ खराब होत असतात हे आपल्याला माहीत आहे का? काही पदार्थ फ्रीझरल्यामुळं त्यांच्यातील पोषक तत्त्वं कमी होतात किंवा त्यांची चव खूप वाईट होते किंवा अतिथंडपणामुळं त्यांच्यावर प्रक्रिया होऊन ते खाण्यायोग्य राहत नाहीत. टीव्ही 9 ने याबाबत माहिती दिली आहे. जाणून घेऊ, कोणते (These foods should not be kept in the freezer) आहेत ते पदार्थ.

1. दूध (Milk)

फ्रीजरमध्ये ठेवल्यावर दुभत्या जनावरांपासून मिळणाऱ्या दुधात 87 टक्के पाणी असतं. ते जेव्हा गोठतं, तेव्हा त्याची रचना मोठ्या प्रमाणात बदलते आणि ते दाणेदार आणि चिकट होऊ शकते. गोठलेलं दूध विरघळल्यावर ते घट्ट पदार्थ आणि पाणचट भाग असं वेगवेगळं होऊ शकतं. दुधात फॅटचं प्रमाण जितकं जास्त असेल, तितकं असं होण्याचं प्रमाण जास्त असेल. नंतर हे फक्त स्मूदी बनवण्यासाठी किंवा फक्त बेकिंगसाठी वापरलं जाऊ शकतं.

2. काकडी

जेव्हा काकडी फ्रीजरमध्ये (freezer) मोठ्या प्रमाणात ठेवली जाते, तेव्हा त्यांची चव खूपच विचित्र होते. काकड्यांच्या पोतावरही परिणाम होतो आणि त्या सामान्य तापमानाला आल्यानंतर त्या खाण्याची इच्छा होत नाही.

3 अंडी

अंडी फ्रीजरमध्ये साठवल्यास त्यांची कवचं तडकू शकतात. तडकलेलं अंडं बराच काळ राहिल्यास त्यात जीवाणूंचा शिरकाव होऊ शकतो. ते खाण्यायोग्य राहण्याची शक्यता कमी होते किंवा ते खराब होऊ शकतं.

जर तुम्हाला अंडी फ्रीझरमध्ये ठेवायची असतील तर, तुम्ही त्यांना चांगलं फेटून हवाबंद डब्यात ठेवू शकता. यामुळे काही काळ तरी त्यांच्यात जीवाणूंचा शिरकाव होण्याचं नक्कीच थांबेल. पण, ती लवकरात लवकर वापराणं आवश्यक आहे.

4. फळं

जर तुम्ही फळे फ्रीजरमध्ये ठेवली तर त्यांच्यातील पौष्टिकता कमी होते. ती आतून सुकतात आणि त्यांच्या चवीवर परिणाम होतो.

हे वाचा - Indian Coast Guard Recruitment: उमेदवारांनो, सरकारी नोकरीसह लाखो रुपये पगाराची संधी; या पदांसाठी लगेच करा अप्लाय

5. पास्ता

शिजलेला उरलेला पास्ता फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर तो पुन्हा गरम केल्यावर मऊ होतो. तुम्ही शिजवलेला पास्ता एखादे वेळेस फ्रीजमध्ये ठेवू शकता.

हेे वाचा - Mental Health : काही केल्या मनातून नकारात्मक विचार जात नाहीयेत; या 5 उपायांनी त्यांना पळवून लावा

6. टोमॅटो सॉस

टोमॅटो सॉस फ्रीझरमध्ये ठेवल्यास त्याचं चोथा-पाणी होऊन त्याचा पोतही खराब होतो. त्यामुळं टोमॅटो सॉस फ्रीझरमध्ये न ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

7. बटाटे

बटाट्यांमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते आणि फ्रीजरमध्ये ठेवल्यावर ते मऊ आणि खराब होऊन जातात. चांगले राहण्याच्या उद्देशाने आपण ठेवतो मात्र त्यांचे हाल उलट खराब होते.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Food, Health, Health Tips, Superfood