किडनीच्या आजारांपासून वाचायचं आहे, तर या गोष्टींना आजच करा दूर!

किडनीच्या आजारांपासून वाचायचं आहे, तर या गोष्टींना आजच करा दूर!

अनेकदा कळत- नकळत आपण अशा काही गोष्टी खातो की ज्याचा थेट परिणाम शरीरावर होतो. याच कारणामुळे अनेक आजारांना आपण बळी पडतो.

  • Share this:

आपण दररोज काय जेवतो यावर आपलं आरोग्य आणि स्वास्थ्य अवलंबून असतं. अनेकदा कळत- नकळत आपण अशा काही गोष्टी खातो की ज्याचा थेट परिणाम शरीरावर होतो. याच कारणामुळे अनेक आजारांना आपण बळी पडतो. आज आम्ही तुम्हाला कोणत्या गोष्टी खालल्यामुळे किडनी स्टोन होऊ शकतो याबद्दल माहिती देणार आहोत.

शिमला मिरची खाण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहे, पण तुम्हाला माहीत आहे का यात ऑक्सलेटचे खडे असतात. हे खडे शरीरातील कॅल्शियमसोबत एकत्र होऊन कॅल्शियम ऑक्सलेटचे खडे होतात. यालाच किडनी स्टोन म्हटलं जातं. द हेल्थमध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, जर तुम्ही शिमला मिरची खाण्याचं प्रमाण कमी केलं तर किडनी स्टोन होण्याची शक्यताही बहुतांश कमी होईल.

भारतीय खाद्यपदार्थांमध्ये टॉमेटोचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यामुळे भाज्यांची आणि आमटीची चव वाढते. पण टॉमेटोच्या बियांमध्ये असलेल्या ऑक्सलेटमुळे किडनी स्टोन होऊ शकतो. त्यामुळे जेवणात टॉमेटोचा वापर करताना शक्यतो त्यातल्या बिया काढून टाकाव्यात.

सीफूडमध्ये प्युरिन्सचं प्रमाणही सर्वाधिक असतं. सीफूड जास्त प्रमाणात खाल्लं तर शरीरात यूरिक अॅसिड मोठ्या प्रमाणात तयार होतं. या अॅसिडचं रुपांतर किडनी स्टोनमध्ये होतं. याशिवाय चॉकलेचमुळेही किडनी स्टोन होऊ शकतो. फार कमी लोकांना माहीत आहे की, चॉकलेटमध्ये ऑक्सलेटचं प्रमाण जास्त असतं. जर तुम्हाला किडनी स्टोन आहे किंवा पोटाचे अन्य आजार आहेत तर चॉकलेट खाणं टाळा.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

70 वर्षांची म्हातारी हत्तीण आठवतेय का? अशक्तपणामुळे अखेर ती कोसळली

कंबरदुखीपासून त्रस्त आहात तर हे घरगुती उपाय एकदा करून पाहा!

या पद्धतीने तुम्ही पावसाळ्यात टिकवू शकता भाज्या आणि कडधान्य

वेळीच सावध व्हा, या 7 कारणांमुळे घरातून दूर जाईल लक्ष्मी!

VIDEO : कलम 370 रद्द केल्यानंतर सरसंघचालकांची वाढवली सुरक्षा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 16, 2019 07:15 PM IST

ताज्या बातम्या