Home /News /lifestyle /

फक्त 5 पदार्थ; मधुमेही रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास करतील मदत

फक्त 5 पदार्थ; मधुमेही रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास करतील मदत

मधुमेह व्यक्तींना कोरोनासह इतर आजारांचा धोका जास्त असतो, कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर करतो. त्यामुळे त्यांनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

  • myupchar
  • Last Updated :
    मधुमेह एक असा आजार आहे जो शरीराच्या अवयवांच्या हानीचे कारण बनतो. मधुमेह हृदय रोग, स्ट्रोक, स्नायूंची कमजोरी डोळ्यांचे आजार, किडनीचे आजार अशा अनेक समस्या निर्माण करतो. मधुमेह व्यक्तीची रोग प्रतिकारशक्ती कमजोर करतो त्यामुळे अशा व्यक्तीला आजारांचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. myupchar.com चे एम्सशी संबंधित डॉ. अनुराग शाही म्हणाले, हा असा आजार आहे ज्यात रक्तातील साखर अथवा ग्लुकोजची पातळी खूप जास्त वाढते. टाइप 1 मधुमेह होणं टाळता येत नाही पण योग्य आरोग्यदायी जीवनशैलीनं प्री-डायबेटिज, टाइप 2 मधुमेह यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात मदत मिळते. मधुमेहासारख्या रोगाला नियंत्रित करण्यासाठी योग्य प्रमाणात झोप, नियमित व्यायाम आणि योग्य आहाराची आवश्यकता असते. myupchar.com च्या डॉ. मेधावी अग्रवाल यांनी सांगितलं, अनेक पोषक द्रव्यांच्या मदतीने शरीराची प्रतिकारक क्षमता वाढवणं महत्वाचं आहे. विशेषतः जेव्हा व्यक्ती मधुमेही आहे. स्वस्थ राहण्यासाठी संतुलित आहाराची गरज असते आणि जेव्हा मधुमेह असतो तेव्हा तर ती आवश्यकता जास्त असते. मधुमेह असेल तर आहाराबाबतीत अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जसं काय खावं, काय खाऊ नये इत्यादी. इथे आपण अशा पाच पदार्थांची माहिती घेणार आहोत जे मधुमेही रुग्णांना त्यांची रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात मदत करतील. काबुली चणे काबुली चण्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्व ए, डी आणि ई यासोबत जस्त असते. ते मधुमेही रुग्णांसाठी खूप फायद्याचे असतात. शरीरातील साखरेचं अति प्रमाण हृदयाच्या आरोग्यासाठी खूप त्रासदायक होऊ शकतं. या चण्यातील जस्त हा धोका कमी करते. त्यात तंतुमय पदार्थ खूप असतात, त्याने उपाशीपोटी साखर कमी करण्यास मदत होते. गाजर मधुमेही रुग्णांना काळानुसार दृष्टीच्या समस्या त्रास देऊ लागतात. मोतिबिंदू, काचबिंदू होऊ शकतो. गाजरामध्ये बिटा-केरोटीन आणि ल्यूटिन असतं ते डोळ्यांची ही हानी रोखण्यास मदत करते. गाजर हे जीवनसत्व ए चा एक उत्तम स्त्रोत आहे, जो रोगप्रतिकारक शक्तीसाठी चांगला आहे. गाजर लो-ग्लाइसेमिक असल्याने रक्तातील साखर वाढत नाही. अक्रोड अक्रोडमध्ये ई जीवनसत्व खूप असते ते मधुमेही रुग्णांसाठी महत्वपूर्ण अँटीऑक्सिडंट आहे. डायबेटीज केयरमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार ई जीवनसत्व मधुमेही रुग्णांच्या साखरेच्या नियंत्रणात सुधारणा करते. हे जीवनसत्व प्रतिकारशक्तीलाही मदत करते. सिमला मिरची सिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीला वाढवण्यास मदत करते, रक्त शर्करा योग्य ठेवण्यास आणि त्वचेचे आरोग्य वाढवण्यास सहाय्य करते. फॅटी सी फूड साल्मन, सार्डिन और मॅकेरल यासारख्या माशांमध्ये असणारे ओमेगा-3 फॅटी अॅसिड प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चांगले असतात. ओमेगा-3 फॅटी पांढऱ्या रक्त पेशींच्या कार्याला वाढवून रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करत असतात, असं संशोधनात आढळले आहे. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख – मधुमेह न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
    First published:

    पुढील बातम्या