नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : प्रत्येक व्यक्तीला काहीना काही वाईट सवयी असतात, ज्यामुळे आरोग्याचे नुकसान होते. या सवयी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक तर असतातच, तसेच वृद्धत्वही लवकर चेहऱ्यावर दिसू लागतं. आपण आपल्या जीवनशैलीची वेळीच काळजी घेतली तर वृद्धत्व येण्याचा वेग कमी होऊ शकतो. पब्लिक हेल्थ न्यू मेक्सिको स्टेट युनिव्हर्सिटीचे (Public Health New Mexico State University) प्रोफेसर डॉ. जगदीश खुबचंदानी यांनी 'आज तक'ला दिलेल्या माहितीनुसार अशा पाच वाईट सवयींबद्दल सांगितले आहे, ज्यामुळे व्यक्ती कमी वयातच वृद्ध दिसू लागतो.
तणाव (Stress)-
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही गोष्टीची जास्त काळजी केल्याने माणूस लवकर वृद्ध होऊ शकतो. त्यामुळे लोक काही मानसिक किंवा शारीरिक आजारांनाही बळी पडू शकतात. आपल्या लक्षात येत नाही, पण तणाव हा एक अतिशय घातक आणि सायलेंट किलर आहे. त्यामुळे दीर्घकाळ तरुण राहायचे असेल तर जास्त ताण घेणे टाळा.
पुरेशी झोप न मिळणे-
पुरेशी झोप न मिळणं ही देखील एक मोठी समस्या आहे, ज्याचा तणावाशी खोल संबंध आहे. झोप आपल्याला तरुण राहण्यास आणि तणावमुक्त राहण्यास मदत करते आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते. तरीही काही लोक झोपेला गांभीर्याने घेत नाहीत. तरुणांमध्ये ही समस्या वेगाने वाढत आहे, ज्याचे दुष्परिणाम भविष्यात दिसू शकतात.
हे वाचा - रेरा (RERA) कायदा काय आहे? बांधकाम व्यवसायाशी संबंधित तक्रार करण्याची सुविधा
खराब आहार-
खराब आहार देखील जलद वृद्धत्वासाठी मोठ्या प्रमाणात जबाबदार असतो. डॉ. खुबचंदानी म्हणतात की, 21 व्या शतकात सोडा, प्रक्रिया केलेले अन्न आणि फॅटी फूड यासारख्या गोष्टी आपल्या आहाराचा एक मोठा भाग बनल्या आहेत आणि आपल्या आयुर्मानाच्या दरात घट होण्यास सर्वात जास्त जबाबदार आहेत.
शारीरीक हालचाल, व्यायाम नसणे-
दैनंदिन जीवनशैलीत व्यायाम न करणे किंवा शरीर पुरेसे सक्रिय न ठेवणे याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, व्यायामाच्या अभावामुळे रोग लवकर घेरतात आणि व्यक्ती वेगाने वृद्धत्वाकडे जाते. व्यायाम न केल्याने बायोलॉजिकल, साइकोलॉजिकल आणि फिजिकल आरोग्यावर परिणाम होतो.
हे वाचा - Special Story : परवडणाऱ्या घरांसाठी अशी आहे पंतप्रधान आवास योजना, वाचा सर्व माहिती
धूम्रपान आणि मद्यपान -
तणाव किंवा चिंता टाळण्यासाठी, बरेच लोक दारू, तंबाखू किंवा ड्रग्स सारख्या गोष्टींचे सेवन करू लागले आहेत. याकडे तरुण पिढी अधिक आकर्षित होत आहे. या गोष्टींच्या अतिसेवनाने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. परंतु, त्याआधीच त्याचे सतत आणि अतिसेवन आपल्याला वेगाने वृद्धत्वाकडे ढकलते.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Lifestyle