नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : काहीजणांना उष्णतेचा त्रास असतो. त्यामुळे तोंड येण्यासारखी समस्या होऊ शकते. ज्यांना तोंड येण्याची समस्या असते, त्यांच्यासाठी ही शरीरातील व्हिटॅमीन बी12 च्या कमतरतेची सूचनाही असू शकते. व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स अशी पोषक तत्वे आहेत, जी आपलं आरोग्य चांगलं राखण्यास मदत करतात. व्हिटॅमीन बी 12 हा एक महत्त्वाचा व्हिटॅमीनचा प्रकार आहे. ज्यामुळे आपल्या शरीरात रक्त्तातील ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या रेड ब्लड सेल्सचं उत्पादन वाढतं. व्हिटॅमीन बी 12 शरीरात कमी झालं तर, त्याची लक्षणं दिसायला लागतात. पण, त्याकडे लक्ष न दिल्यास शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडतं.
व्हिटॅमीन बी12 च्या कमतरतेची लक्षणं
व्हिटॅमीन बी12 कमी झाल्यास वारंवार तोंड येण्याची समस्या सुरू होते.
सतत थकवा वाटणं हे व्हिटॅमीन बी 12 च्या कमतरतेचं लक्षण आहे.
पोटासंबंधी आजार म्हणजे शौचास न होणे किंवा अपचन असा त्रासही या व्हिटॅमिनच्या अभावामुळे होऊ शकतो.
स्मरणशक्ती कमी होणं, मूड स्विंग, हातापायांना मुंग्या येणे, वजन वाढणे, कंबर आणि पाठीचं दुखणं हे देखील व्हिटॅमीन बी12 च्या कमतरतेचं लक्षण आहेत.
व्हिटॅमीन बी12 मुळे त्रास
व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता धोकादायक असते, असं तज्ज्ञांच मत आहे. व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असलेल्या लोकांना अशक्तपणा जास्त जाणवतो. इतकंच नाही तर, त्यांची हाडंही कमजोर होतात. याचा अभाव असल्यास गर्भवती महिलांनाही त्रास होतो. बाळाच्या मानसिक आणि शारीरिक विकासावरही व्हिटॅमिन बी 12च्या कमीचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
कोणाला धोका जास्त?
मांसाहारी पदार्थांमध्ये व्हिटॅमिन बी 12 जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे शाकाहारी लोकांना मांसाहारी लोकांपेक्षा व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेचा जास्त त्रास होतो.
मद्यसेवन करणाऱ्या आणि ऍसिडिटीचा त्रास असलेल्या लोकांमध्ये व्हिटॅमिन बी 12ची कमतरता जास्त असते.
हे वाचा - डिसेंबरमध्ये फिरण्यासाठी बेस्ट ठिकाणं, नवीन वर्षाचं स्वागतही इथं होईल दणक्यात
काय खावं?
डेअरी प्रोडक्ट, सोयाबीन आणि ऍनिमल प्रोडक्टमध्ये व्हिटॅमिन बी 12 असतं. चिकन, मासे, टर्की, मटन यात मोठ्या प्रमाणात असतं. तर, अंड्याच्या पिवळ्या भागात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन बी 12 मिळतं. शाकाहारी लोकांनी दूध आणि पनीरचं सेवन करावं. दररोज दूध प्यायल्यास शरीराला 20 टक्के व्हिटॅमिन बी 12 मिळतं.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips