• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • आयुष्यातील शुभ घटनांचे असे असतात 5 संकेत; जे तुम्ही या पद्धतीनं ओळखू शकाल

आयुष्यातील शुभ घटनांचे असे असतात 5 संकेत; जे तुम्ही या पद्धतीनं ओळखू शकाल

ज्योतिषशास्त्रात ग्रह, तारे यांच्या अभ्यासावरून मानवी आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या-वाईट घडामोडींबाबत भाकीत केलं जातं. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात चांगले दिवस कधी येणार याचे काही संकेत (Signs) ज्योतिषशास्त्रात वर्णन करण्यात आले आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : मानवी मन अत्यंत संवेदनशील असतं. अनेकदा आपल्याला चांगल्या आणि वाईट गोष्टींची आधीच चाहूल लागते. माणसाच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे याचा अंदाज ज्योतिषशास्त्रात (Astrology) वर्तवला जातो. त्यामुळे अनेक लोक ज्योतिषशास्त्राच्या आधारे आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. काही जणांना कितीही प्रयत्न केले तरी ठरवलेल्या गोष्टीत यश येत नाही. आयुष्यातल्या अडचणी वाढत जातात. अशा वेळी ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन आपली चांगले दिवस कधी येणार याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला जातो. ज्योतिषशास्त्रात ग्रह, तारे यांच्या अभ्यासावरून मानवी आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या-वाईट घडामोडींबाबत भाकीत केलं जातं. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात चांगले दिवस कधी येणार याचे काही संकेत (Signs) ज्योतिषशास्त्रात वर्णन करण्यात आले आहेत. 'आज तक'ने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. ज्योतिषशास्त्र अभ्यासक प्रीतिका मुजुमदार यांनी याबाबत विवेचन केलं आहे. त्यांच्या मते, माणसाच्या आयुष्यात सदैव सुखाचा काळ नसतो. कधी सुख, तर कधी दुःखही येत असतं. जेव्हा आपली वेळ वाईट असते, तेव्हा घरात एक विचित्र शांतता जाणवते. घरात गाय, कुत्रा असे पाळीव प्राणी असतील तर तुमच्या हातून खाणार नाहीत. एरव्ही सतत असणारे पै-पाहुणे कमी होतील; मात्र हा काळ सरून सुखाचे दिवस येतील तेव्हा ही परिस्थिती बदललेली असेल. याचे संकेत तुम्हाला सहज जाणवतील. हे वाचा - Zomato IPO : रोख रक्कम उभी करण्यासाठी तातडीने आणावा लागला IPO; झोमॅटोच्या सीईओंची माहिती - तुमच्या घराच्या अंगणात चिमण्या, पक्षी यांचा किलाबिलाट होऊ लागेल. या अंगणात आलेल्या चिमण्यांना, पक्ष्यांना दाणे घालावेत. - तुमच्या दारात अचानक गाय येऊन थांबत असल्याचं आढळेल. असं झालं तर समजून जा, की तुमचा शुभ काळ सुरू झाला आहे. गायीला खाऊ घालावं. हा एक शुभशकुन (Good Signs) आहे हे लक्षात घ्या. - तुमच्या भरभराटीचा काळ सुरू होण्याचा आणखी एक संकेत म्हणजे घरासमोर अचानक रुईचं रोप उगवून आल्याचं दिसेल. हे वाचा - WhatsApp वर फोटो-व्हिडीओ कसे कराल Save? एका ट्रिकने स्वत:लाच पाठवता येतील महत्त्वाचे मेसेज - तुमच्या घरावर पांढरं कबूतर (White Pigeon) येऊन बसू लागलं असेल, तर तोही तुमच्या चांगल्या दिवसाचाच संकेत आहे. - तुमच्या अंगणात, झाडाझुडपात रंगीबेरंगी फुलपाखरं (Butterflies) उडताना दिसू लागली, तर हादेखील शुभ गोष्टी होण्याचा संकेत आहे. - आपल्या आयुष्यात एकच वेळ कायम राहत नाही. दुःखाचे, त्रासाचे दिवस कधी तरी संपतातच. सुखाची चाहूल घेऊन दिवस येतातच. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी या सुखाची चाहूल देतात. हे संकेत ओळखा आणि आपल्या सुखाच्या दिवसांचा आनंद घ्या.
  First published: