मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /या 5 चुकांमुळं तुमचं वजन कधीच नाही होत कमी; Weight Loss च्या मार्गातील जानी दुश्मन ओळखा

या 5 चुकांमुळं तुमचं वजन कधीच नाही होत कमी; Weight Loss च्या मार्गातील जानी दुश्मन ओळखा

वजन कमी करण्यासाठी लोक कितीतरी प्रकारच्या सप्लिमेंट्स घेत असतात आणि वेगवेगळे व्यायामही करतात. पण हे सर्व प्रयत्न कधी कधी पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरत नाहीत. जाणून घेऊया वजन कमी न होण्यामागची प्रमुख कारणे कोणती..

वजन कमी करण्यासाठी लोक कितीतरी प्रकारच्या सप्लिमेंट्स घेत असतात आणि वेगवेगळे व्यायामही करतात. पण हे सर्व प्रयत्न कधी कधी पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरत नाहीत. जाणून घेऊया वजन कमी न होण्यामागची प्रमुख कारणे कोणती..

वजन कमी करण्यासाठी लोक कितीतरी प्रकारच्या सप्लिमेंट्स घेत असतात आणि वेगवेगळे व्यायामही करतात. पण हे सर्व प्रयत्न कधी कधी पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरत नाहीत. जाणून घेऊया वजन कमी न होण्यामागची प्रमुख कारणे कोणती..

नवी दिल्ली, 05 जानेवारी : काही लोक सडपातळ होण्यासाठी डाएटिंगपासून ते व्यायामापर्यंत सर्व काही करतात. पण तरीही त्यांना वजन कमी करता येत नाही. खरं तर, वजन कमी न होण्यामागे काही मोठी कारणे असू शकतात. त्यामुळे या वर्षी तुम्हीही वजन कमी करण्याचा संकल्प केला असेल, तर वजन कमी करण्याच्या या अज्ञात शत्रूंपासून (Weight loss mistakes) दूर राहा.

पोटावरची चरबी (Belly Fat), वाढलेले वजन कमी करण्यासाठी लोक कितीतरी प्रकारच्या सप्लिमेंट्स घेत असतात आणि वेगवेगळे व्यायामही करतात. पण हे सर्व प्रयत्न कधी कधी पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरत नाहीत. जाणून घेऊया वजन कमी न होण्यामागची प्रमुख कारणे कोणती असू शकतात.

वजन कमी न होण्याची कारणे

झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, फिटनेस एक्सपर्ट आणि न्यूट्रिशनिस्ट अजरा खान यांनी सोशल मीडियावर वजन वाढण्याच्या मोठ्या कारणांबद्दल सांगितले आहे. त्यामुळे वजन किंवा पोटाची चरबी कमी होण्यात समस्या येतात. जसे-

1. शनिवार-रविवार होणारी चूक

आजरा खान सांगतात की, कधी-कधी आठवडाभर डाएटिंगमुळे आपल्याला आपल्या आवडत्या पदार्थांपासून दूर राहावं लागतं. त्यानंतर वीकेंडला आपण बाहेर पडलो की मग राहवत नाही. भावनिकदृष्ट्या कमकुवत होतो आणि हात मोकळा सोडून आपण खाऊ लागतो. मग कॅलरी वाढतच जातात.

2. नियोजनाचा अभाव

जर तुम्हाला वजन झपाट्याने कमी करायचे असेल तर योग्य नियोजन करा. यामुळे तुम्ही बाहेरून खाद्यपदार्थ मागवणे टाळू शकाल. कारण, वारंवार बाहेरून अन्न मागवणे हे फिटनेसच्या उद्दिष्टांसाठी धोकादायक ठरू शकते. अर्थात आपण हेल्दी फूड ऑर्डर करू शकतो. पण, तरीही घरीचेच पदार्थ खाण्याला प्राधान्य असायला हवे.

3. चुकीचा आहार

आपण काय खातो हे महत्त्वाचे आहे. अनेकांना फक्त तेलकट, स्निग्ध पदार्थ जास्त खाल्ल्याने आपले वजन वाढते, असे वाटते. पण त्यासाठी साखर देखील कारणीभूत आहे, हे अनेकजण विसरून जातात किंवा बऱ्याच जणांना साखर हे वजन वाढण्याचे कारण ठरू शकते, याची कल्पनाच नसते. आपण बाहेर असताना कित्येक गोड पदार्थ खात असतो, त्यातून प्रिझर्वड साखर पोटात जाते.

हे वाचा - लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात

4. शारीरिक हालचाली कमी

आपण दररोज शारीरिक हालचाली करत नसलो, तरीही वजन कमी करण्यात समस्या येऊ शकते. अर्थात, आपण लहान शारीरिक क्रियाकलाप करता. पण ते नियमितपणे करायला सुरुवात करा. तज्ञांच्या मते, जर तुम्हाला फक्त हलके चालायचे असेल तर दररोज 5 किलोमीटर चालण्याचे लक्ष्य ठेवा.

हे वाचा - तुम्हीही कामाच्या ठिकाणी नेहमी बिझी असता का? मग या 7 गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या

5. संप्रेरक असंतुलन

तुमचे संप्रेरक असंतुलित असल्यास, जास्त काम केल्याने इंफ्लामेशन होऊ शकते आणि वजन कमी करणे कठीण होऊ शकते. असंतुलित हार्मोन्सची माहिती घेण्यासाठी थायरॉईड, पीसीओएस किंवा इस्ट्रोजेन चाचण्या केल्या जाऊ शकतात.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Weight, Weight loss tips