मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

घरात साफसफाई करताना होतो त्रास; ’या’ उपायांनी मिळेल धुळीच्या अ‍ॅलर्जीपासून सुटका

घरात साफसफाई करताना होतो त्रास; ’या’ उपायांनी मिळेल धुळीच्या अ‍ॅलर्जीपासून सुटका

बऱ्याच जणांना धुळीचा त्रास होतो, धुळीमुळे खूप शिंका येऊन वाईट अवस्था होते. हा त्रास कायमचा घालवण्यासाठी काही घरगुती उपाय (Home Remedies) करता येतात.

बऱ्याच जणांना धुळीचा त्रास होतो, धुळीमुळे खूप शिंका येऊन वाईट अवस्था होते. हा त्रास कायमचा घालवण्यासाठी काही घरगुती उपाय (Home Remedies) करता येतात.

बऱ्याच जणांना धुळीचा त्रास होतो, धुळीमुळे खूप शिंका येऊन वाईट अवस्था होते. हा त्रास कायमचा घालवण्यासाठी काही घरगुती उपाय (Home Remedies) करता येतात.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली,15 ऑगस्ट : अनेकांना धुळीची अ‍ॅलर्जी (Dust Allergy) असते. धुळ नाकातोंडात गेल्याने शिंका येणे, श्वास घेण्यात त्रास, नाक वाहणं, नाक कोंडल्यासारखं वाटणं, डोळे सुजणं, डोळे, नाक आणि घशात खाज येणं, खोकला, डोकदुखी, थकवा आणि अशक्तपणा (Weakness) असे अनेक त्रास व्हायला लागतात. धूळीची अ‍ॅलर्जी कशी होते? हा प्रश्न अनेकांना पडतो. धुळीच्या अ‍ॅलर्जीचं सर्वात मोठं कारण म्हणजे धुळीचे कण, ज्यांना डस्ट माइट्स (Dust Mites)  म्हणतात. या कणांमध्ये इतके सूक्ष्मजीव (Microorganism) असतात की डोळ्यांनाही दिसत नाहीत. याशिवाय यात पराग कण, प्राण्यांचे केस, कोंडा आणि काही बॅक्टेरिया असतात. कितीही प्रयत्न केले तरी धुळीच्या अ‍ॅलर्जीचा त्रास कमी होत नसेल तर, काही घरगुती उपाय करून पाहा. अ‍ॅपल सायडर व्हिनेगर धूळ अ‍ॅलर्जीचा त्रास कमी होण्यासाठी अ‍ॅपल सायडर व्हिनेगर वापरू शकता. यासाठी 2 चमचे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर एका ग्लास कोमट पाण्यात मिसळून प्या. हवं असेल तर, चवीसाठी थोडं मध घाला. अ‍ॅपल सायडर व्हिनेगर मध्ये अ‍ॅन्टी-इम्फ्लामेन्ट्री आणि अ‍ॅन्टी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. जे अ‍ॅलर्जी कमी करण्यास मदत करतात. (work from home tips : वर्क डेस्कवर ठेवा 'ही' झाडं; वाढेल कामाचा उत्साह) लॅव्हेन्डर ऑईल अ‍ॅलर्जी बरी होण्यासाठी लॅव्हेन्डर ऑईल वापरू शकता. लॅव्हेन्डर ऑईलचे 4 ते 5 थेंब गरम पाण्यात घाला आणि त्याची वाफ घ्या. यासाठी वेपोरायझर देखील वापरू शकता. या तेलांमध्ये अ‍ॅन्टी-इम्फ्लामेन्ट्री आणि अ‍ॅनाल्जेसिक गुणधर्म आहेत. ज्यामुळे अ‍ॅलर्जीचा त्रास कमी होतो. ('या' आहेत फ्रीज साफ करण्याच्या सोप्या Tips; दुर्गंध जाऊन चांगली चमक येईल) मध अ‍ॅलर्जीचा त्रास कमी करण्यासाठी मधही वापरता येतं. यासाठी दररोज 2 चमचे मध पिऊ शकता किंवा एक कप पाण्यात मध मिसळून देखील वापरता येतं. मधात अ‍ॅन्टी-इम्फ्लामेन्ट्री आणि अ‍ॅन्टी-बॅक्टेरियाल गुणधर्म असतात. जे अ‍ॅलर्जी कमी करण्यास मदत करतात. (दररोज चहात ‘हा’ पदार्थ घालता तरी माहिती नाहीत फायदे? मग नक्की वाचा…) हळद धुळीची अ‍ॅलर्जी दूर करण्यासाठी हळद आणि काळी मिरी वापरू शकता. यासाठी अर्धा चमचा हळद एक कप दुधात मिसळा. नंतर हे दूध एका भांड्यात उकळा. यानंतर दूध थंड करा आणि त्यात चिमूटभर काळी मिरी आणि काही थेंब मध घालून चांगलं मिक्स करा आणि प्या. हळदीमध्ये अ‍ॅन्टी-इम्फ्लामेन्ट्री आणि अ‍ॅन्टी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत त्यामुळे अ‍ॅलर्जीचा त्रास कमी होतो. (प्रेग्नन्सीत कोरडा खोकला ठरू शकतो धोकादायक; लगेच करा हे 5 उपाय) कोरफड अ‍ॅलर्जी कमी करण्यासाठी कोरफड रसाचा वापरू शकता. यासाठी कोरफडीची पानं कापून त्याची साल काढा. त्यावरचा पिवळा थर काढून टाका. यानंतर, जेल बाहेर काढा. एक कप पाणी आणि जेल मिक्सरमध्ये बारीक करून ज्युस काढून प्या. कोरफडीतही अ‍ॅन्टी-इम्फ्लामेन्ट्री गुणधर्म आहेत. त्यामुळे बॅक्टेरिया आणि बुरशी नष्ट होते. जे अ‍ॅलर्जीमुळे होणारे सर्व त्रास कमी करण्यासत मदत करतात.
First published:

Tags: Home remedies, Home-decor, Lifestyle, Pollution

पुढील बातम्या