चिकन खाण्याचे 5 फायदे तुम्हाला माहीत नसतील, तर आजच जाणून घ्या

चिकन खाण्याचे 5 फायदे तुम्हाला माहीत नसतील, तर आजच जाणून घ्या

चिकनच्या एवढ्या नानाविध रेसिपी आहेत की अनेकदा शाकाहारी लोकांना मांसाहार करणाऱ्यांचा हेवा वाटू लागतो.

  • Share this:

मांसाहार खाणाऱ्यांमध्ये चिकनचं क्रेझ एवढ्या मोठ्या प्रमाणात असतं की फक्त चिकनचं नाव ऐकूनच त्यांना अनेक पदार्थ दिसू लागतात. मित्र- मैत्रिणींना भेटणं असो किंवा कोणताही कार्यक्रम असो जेवणात चिकनचा एक तरी पदार्थ असतोच. त्यातही चिकनच्या एवढ्या नानाविध रेसिपी आहेत की अनेकदा शाकाहारी लोकांना मांसाहार करणाऱ्यांचा हेवा वाटू लागतो. पण चिकनची खासियत फक्त त्याच्या चवीत नाहीये तर चिकन खाण्याचे अनेक फायदेही आहेत. आज आम्ही यातीलच 5 महत्त्वाच्या फायद्यांबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. हे फायदे वाचून तुम्ही चिकन खाण्याचा विचार एकदा तरी कराल.

प्रोटीन सप्लाय- चिकनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं. त्यामुळे जिम करणाऱ्यांना तसंच डाएट करणाऱ्यांना चिकन खाण्याचा सल्ला दिला जातो. प्रोटीनमुळे आपल्या मांसपेशींना ताकद मिळते. ज्यांना शरीराची ताकद वाढवायची असेल त्यांनी चिकन खाण्याला प्राधान्य दिलं पाहिजे.

वजन कमी करण्यात होते मदत- सुदृढ आहारात चिकनचा समावेश केला जातो. हे लीन मीट आहे. याचा अर्थ असा की यात फार फॅट नसतात. त्यामुळे नियमित स्वरुपात चिकन खाण्याने वजन कमी होण्यास मदत मिळू शकते.

हाडांची ताकद वाढते-  प्रोटीन व्यतिरिक्त चिकनमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फोरस मुबलक प्रमाणात असतं. या दोन्ही गोष्टी हाडांना मजबूत करण्यात आणि त्यांची ताकद वाढवण्यात अतिशय उपयोगी आहेत. त्यामुळे नियमित स्वरुपात चिकन खाल्ल्याने शरीरात गाठी होण्याचा धोकाी कमी होतो.

तणावापासून मुक्ती- चिकनमध्ये ट्रिप्टोफेन आणि विटामिन बी5 हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं. हे शरीरातील तणाव कमी करण्यात मदत करतं. चिकनमध्ये मॅग्नेशियमही असतं. यामुळे पीएमएसच्या लक्षणांपासून दूर राहण्यास मदत होते. त्यामुळे चिकन खाल्ल्यामुळे तुम्ही तणावमुक्त होऊ शकता.

रोग प्रतिकारशक्ती वाढते- चिकनमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे अनेक गुणधर्म आहेत. सूप स्वरुपात चिकन खाणं जास्त फायदेशीर आहे. सर्दी दूर करण्यासाठी चिकन सूप पिणं सर्वोत्तम मानलं जातं.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

जाणून घ्या लो ब्लड प्रेशरची कारणं आणि लक्षणं

दररोज दोन केळी खाल्ल्यावर शरीरात होतील हे बदल

भर पावसात डेटवर जात असाल तर या गोष्टी एकदा वाचाच!

VIDEO : आदित्य ठाकरे लालबाग राजाच्या चरणी

Published by: Madhura Nerurkar
First published: September 10, 2019, 1:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading