मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Kitchen Tips : स्वयंपाक घरातील गॅस वाचवण्याच्या या आहेत सोप्या टिप्स; खर्चात होईल मोठी बचत

Kitchen Tips : स्वयंपाक घरातील गॅस वाचवण्याच्या या आहेत सोप्या टिप्स; खर्चात होईल मोठी बचत

Kitchen Tips : आपण काही लहान-सहान चुका करतो, ज्यामुळे गॅस वाया जातो. या लेखात आपण गॅस वाचवण्याच्या टीप्स काय आहेत त्या पाहुया.

Kitchen Tips : आपण काही लहान-सहान चुका करतो, ज्यामुळे गॅस वाया जातो. या लेखात आपण गॅस वाचवण्याच्या टीप्स काय आहेत त्या पाहुया.

Kitchen Tips : आपण काही लहान-सहान चुका करतो, ज्यामुळे गॅस वाया जातो. या लेखात आपण गॅस वाचवण्याच्या टीप्स काय आहेत त्या पाहुया.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : आंतरराष्ट्रीय बाजारात सुरू असलेल्या उलथा-पालथीचा परिणाम पेट्रोलियम पदार्थ आणि स्वयंपाकाच्या गॅसवरही दिसून आला आहे. गेल्या दोन वर्षात एलपीजीची किंमत सातत्यानं वाढू लागली आहे. एलपीजीच्या किमतीत वाढ होत असल्याने सामान्य माणसाच्या खिशाचा भारही त्याच वेगानं वाढू लागला आहे. स्वयंपाकाच्या गॅसशिवाय तासभरही काही काम करणं कठीण आहे. अशा परिस्थितीत, हे आवश्यक आहे की आपण घरातील महाग स्वयंपाकाचा गॅस अत्यंत सुज्ञपणे वापरणे. आपण जेवढा एलपीजी वाचवू (save gas) तेवढा आपलाच फायदा (Kitchen Tips) होईल. एलपीजी वाचवण्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत, ज्याचा अवलंब करून घरातील गॅस दीर्घकाळ चालवता येतो.

जर वापरात असलेले एलपीजी सिलेंडर (LPG cylinder) ठरलेल्या वेळेपूर्वी संपले तर घरातील लोकांच्या कपाळावर चिंतेच्या रेषा उमटतात. आपण काही लहान-सहान चुका करतो, ज्यामुळे गॅस वाया जातो. या लेखात आपण गॅस वाचवण्याच्या टीप्स काय आहेत त्या पाहुया.

स्वयंपाकाचा गॅस वाचवण्यासाठी या टिप्स फॉलो करा

जेव्हाही तुम्ही स्वयंपाक करायला जाल, तेव्हा तुम्ही जे काही तयार करत आहात त्याच्याशी संबंधित सर्व साहित्य जवळ घेऊन ठेवा. यामुळे तुमचा वेळ आणि गॅस दोन्हीची बचत होईल.

स्वयंपाक करताना नेहमी योग्य आकाराचे कढई/पॅन वापरा. जर एखादा मोठा पॅन वापरला गेला तर त्याला गरम करण्यासाठी जास्त गॅस लागतो. त्याच वेळी, अगदी लहान आकाराच्या पॅनमध्ये अन्न शिजवतानाही गॅसची ज्योत बाहेर येते आणि गॅसचा वापर जास्त होतो.

हे वाचा - सरकारी बँकेत खातं असणाऱ्यांसाठी योजना; दरमाह 28 रुपयात मिळणार 4 लाखांचा फायदा, कसा?

झाकण न ठेवता अन्न शिजवण्यामुळं जास्त गॅस वापरला जातो. यामुळे स्वयंपाकासाठी गॅसवर तीनपट अधिक खर्च केला जाऊ शकतो. म्हणून जेव्हाही तुम्ही अन्न तयार करता तेव्हा ते झाकून शिजवा.

जर तुम्हाला भाजी बनवायची असेल तर ती शिजवण्यासाठी पॅनऐवजी प्रेशर कुकरचा उपयोग करण्याचा प्रयत्न करा. कारण प्रेशर कुकरमध्ये अन्न तुलनेने लवकर तयार होते. यामुळे तुमच्या गॅसचा वापर कमी होतो.

दूध, भाज्या, फ्रोजन फूड शिजवण्यापूर्वी किमान 1 ते 2 तास आधी फ्रिजमधून बाहेर काढा. यानंतरच ते शिजवा किंवा गरम करा यामुळे गॅसचा वापर कमी होईल.

मांस, डाळी, चिकन शिजवण्यासाठी जास्त गॅस वापरला जातो. त्यामुळे या गोष्टी शिजवण्यासाठी नेहमी प्रेशर कुकरचा वापर करा. जर मायक्रोवेव्ह असेल तर आधी सेमीकुक करा, मग ते अधिक लवकर शिजेल.

हे वाचा - निरोगी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी उपवास आहे गरजेचा; नवं संशोधन आलं समोर

गॅसवर स्वयंपाक करताना, नेहमी लक्षात ठेवा की गॅस मध्यम आचेवर राहिला पाहिजे, कारण अन्न उच्च आचेवर जळू शकते आणि खूप कमी आगीवर जास्त गॅस खर्च करण्याची शक्यता असते.

हिवाळ्यात गॅसची टाकी लवकर संपते. याचे एक कारण म्हणजे सर्व लोकांना गरम पाणी हवे असते. अशा काळात गॅस वाचवण्यासाठी गॅसवर पाणी गरम करण्याऐवजी इलेक्ट्रिक वॉटर हीटर किंवा सौर ऊर्जेचा वापर करावा.

First published:

Tags: Gas, Lifestyle