निरोगी जगायचं आहे? 'या' 7 पदार्थांचा आहारात करा समावेश

शरीरातील लोहाच्या अभावामुळे जवळपास 1.2 अब्ज लोकांमध्ये अॅनिमिया म्हणजे रक्तातील तांबड्या पेशींची कमतरता आढळते.

News18 Lokmat | Updated On: Jun 24, 2019 08:46 PM IST

निरोगी जगायचं आहे? 'या' 7 पदार्थांचा आहारात करा समावेश

मुंबई, जून 24 : बदलत्या हवामान आणि जीवनशैलीमुळे शरीर निरोगी आणि सुदृढ ठेवण्यासाठी आहारात भरपूर लोहयुक्त पदार्थ, जीवनसत्त्व आणि प्रथिनं यांचा समावेश करणं आवश्यक आहे. शाकाहारी आहारात खनिजे, जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. निरोगी आरोग्यासाठी खनिजे, आणि जीवनसत्त्वांचे महत्त्व खूप आहे. या सात शाकाहारी पदार्थांचा रोजच्या आहारात समावेश केल्यानं शरीराकरीता उपयुक्त असलेलं लोह तुम्हाला मिळेल. 'जरनल PLOS मेडिसिन'नं केलेल्या अभ्यासानुसार,'जी लोक लोहयुक्त पदार्थांचं सेवन करतात. त्यांच्यामध्ये अॅनिमिया म्हणजे रक्ताशय आणि हाय कोलेस्टेरॉल या समस्या शक्यतो कमी आढळतात. लोह हा खनिजाचा प्रकार आहे, जे शरीराच्या वाढीकरीता, निरोगी आरोग्यासाठी आवश्यक आहे. शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याचं आणि लाल रक्तपेशी तयार करण्याचं महत्त्वपूर्ण काम ते करतात. किमान 18 मिलिग्रॅम इतक्या प्रमाणात दररोज लोहाचं सेवन व्हावं, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

(वाचा :‘हे’ आहेत त्वचेचे अनेक कर्करोग, जाणून घ्या काय आहेत कारणे !)

इंपीरियल कॉलेज लंडन येथील तज्ञांनी केलेल्या रिसर्चनुसार, शरीरातील लोहाच्या अभावामुळे जवळपास, 1.2 अब्ज इतक्या लोकांमध्ये अॅनिमिया म्हणजे रक्तातील तांबड्या पेशींची कमतरता आढळते. या धक्कादायक माहितीमुळे तुम्ही कदाचित अति काळजी कराल. म्हणूनच जाणुन कोणत्या पदार्थाचा समावेश आहारात केल्याने तुम्ही लोहाचं सेवन करू शकता, हे जाणून घेऊया.

1.पालेभाजी : लोह आणि कॅल्शियम असल्यामुळे रक्तवाढीला आणि हाडे बळकट व्हायला उपयुक्त असते. पालेभाज्यांमध्ये कॅलरीचं प्रमाण कमी असतं. शिजवलेल्या 100 ग्रॅम पालेभाजीमध्ये 3.6 मिलिग्रॅम इतक्या प्रमाणात लोह आढळतं. जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट यांसोबत एका वेळेत 20 टक्के लोह पालेभाजीतून मिळतं.

2.कडधान्य : चवळी, हरभरा, वाटाणे आणि सोयाबिन या कडधान्यांनमध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळतं. 200 ग्रॅम शिजवलेल्या कडधान्यांतून 6.6 मिलिग्रॅम म्हणजे RDI च्या 37 टक्के लोह मिळतं. याशिवाय, कडधान्यांनमध्ये असणारं फायबर वजन कमी करण्यास मदत करतं.

Loading...

(वाचा :घर सजवताय? मग करा हे काही छोटे बदल आणि तुमचं घर होईल ट्रेंडी)

3.भोपळ्याच्या बिया : यांमध्ये ‘क’ जीवनसत्त्व आणि मॅगनीज असतं. 28 ग्रॅम भोपळ्याच्या बियांमध्ये 4.2 मिलिग्रॅम म्हणजे 23 टक्के लोह प्राप्त होतं.

4.किनवा : सुप्रसिद्ध असलेला किनवा पुलावामध्येही लोह असतं. एक कप किंवा 185 ग्रॅम किनवामध्ये 2.8 मिलिग्रॅम म्हणजे RDI च्या 15 टक्के लोह त्यामध्ये आढळतं.

5.ब्रोकोली : शरीराला अतिशय पौष्टिक असणाऱ्या ब्रोकोलीमध्ये ‘सी’ जीवनसत्त्व आणि फायबर असतात. 156 ग्रॅम शिजवलेल्या ब्रोकोलीत 1 मिलिग्रॅम इतकं लोह असतं.

(वाचा :हृदयविकारांपासून दूर राहण्यासाठी 'या' 7 पदार्थांचा आहारात समावेश कराच)

6.टोफू : चवीला पनीरसारखं असणाऱ्या टोफूमध्ये पिष्टमय पदार्थाच्या चयापचयात अत्यावश्यक असणारं जीवनसत्त्व बी 1, गटाचे जीवनसत्त्व किंवा अन्यूरिन, मिनरल्स, कॅल्शियम आणि सेलेनियम असतं. 126 ग्रॅम टोफूमध्ये 2.6 मिलिग्रॅम इतकं लोह असतं.

7.डार्क चॉकलेट : चविष्ठ आणि पौष्टिक अशा डार्क चॉकलेटमध्ये भरपूर कॉपर, मॅग्नेशियम आणि फायबर असतात. 28 ग्रॅम 3.3 मिलिग्रॅम इतकं लोह असतं.

'त्या' दिवशी मुथ्थुट फायनान्समध्ये तरुणाची कशी झाली हत्या?नांगरे पाटलांचा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 24, 2019 08:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...