Home /News /lifestyle /

Winter Superfoods : हिवाळ्यात या 7 सुपरफूड्सचा आहारात समावेश हवाच; रोगप्रतिकारक शक्ती राहील स्ट्राँग

Winter Superfoods : हिवाळ्यात या 7 सुपरफूड्सचा आहारात समावेश हवाच; रोगप्रतिकारक शक्ती राहील स्ट्राँग

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिकात्मक छायाचित्र

कोरोना विषाणूची दुसरी लाट आता पूर्ण ओसरली आहे, असे वाटत असताना कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वेगानं वाढत आहे. कोरोनावर जालीम उपाय नसल्याने आपण आपली प्रतिकारशक्ती वाढवणेच गरजेचे आहे.

    नवी दिल्ली, 03 जानेवारी : थंडीचा हंगाम जोरात सुरू असून कोरोना विषाणूच्या नवीन प्रकार ओमिक्रॉनने पुन्हा एकदा लोकांच्या अडचणी वाढवल्या आहेत. अशा परिस्थितीत आरोग्याची काळजी घेणे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणे खूप महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत तुम्ही काही सुपरफूड्सचा आहारात समावेश करू शकता. जे तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करतील. दैनंदिन आहारात या गोष्टींचा समावेश करणे फायदेशीर ठरेल. रताळे टीव्ही 9 ने दिलेल्या बातमीनुसार, रताळे व्हिटॅमिन ए, पोटॅशियम आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध आहे. बद्धकोष्ठतेवर फायदेशीर आहे. रोग प्रतिकारशक्ती वाढवते आणि जळजळ कमी करते. तुम्ही ते भाजून खाऊ शकता. त्यातून तुम्हाला व्हिटॅमिन सी मिळते, त्यातून रोगप्रतिकार शक्ती वाढवते. आवळा आवळा रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे अनेक आजार दूर राहतात. त्यात भरपूर पोषक घटक असतात. आवळा मुरंब्बा, लोणचे, रस, चटणी किंवा पावडरच्या स्वरूपातही खाऊ शकतो. खजूर खजूर आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. कॅल्शियम समृद्ध खजूर हाडे आणि दात मजबूत ठेवण्यास मदत करतात. तज्ज्ञांच्या मते, खजुराच्या नियमित सेवनाने ऑस्टिओपोरोसिस आणि संधिवात यांसारख्या हाडांशी संबंधित समस्या टाळता येतात. गूळ आयुष मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गुळाचे सेवन काढ्याच्या रूपात केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. हे फ्लू आणि सामान्य सर्दी सारख्या रोगांशी लढण्यास देखील मदत करते. गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, जस्त, सेलेनियम आणि पोटॅशियम सारखी अनेक खनिजे असतात. ते रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात आणि संक्रमण दूर ठेवतात. नाचणी यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. त्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे. त्यात भरपूर पोषक घटक, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्याच्या आहारात त्यांचा समावेश केल्यास शरीर निरोगी राहते. उदाहरणार्थ, तुमच्या रोजच्या आहारात नाचणीचा समावेश केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. कारण त्यात असलेले अमीनो अ‌ॅसिड भूक कमी करते. आहारातील फायबर समृद्ध, नाचणी पचन सुधारण्यास मदत करते. यामुळे निद्रानाश, चिंता आणि तणावाच्या परिस्थितीत मदत करण्यासाठी ओळखले जाते. याशिवाय फायबर आणि व्हिटॅमिन बी ने भरपूर बाजरी स्नायूंसाठी देखील फायदेशीर आहे. हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यास मदत होते. बाजरीमध्ये भरपूर फायबर असते. यामुळे रक्ताभिसरण सुधारते. हे वाचा - Sleeplessness In Cold & Cough: सर्दी-खोकल्यानं रात्रीची झोपही उडवलीय; या घरगुती उपायांनी मिळेल आराम ब्रोकोली ब्रोकोली हे पोषक तत्वांचे पॉवरहाऊस आहे. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यात मदत होते. तज्ज्ञांच्या मते, एक कप ब्रोकोलीमध्ये संत्र्याइतकेच व्हिटॅमिन सी मिळते. ब्रोकोलीमध्ये बीटा-कॅरोटीन, पोटॅशियम, मॅग्नेशियम, जस्त आणि लोह भरपूर प्रमाणात असते. ब्रोकोलीचे सेवन करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ती उकळून खाणे. हे वाचा - सुकून गेलीत का तुमची महागडी मेकअप प्रोडक्ट्स? फेकून देण्यापूर्वी हे सोपे उपाय करून पुन्हा वापरा आले आल्यात ऑक्सिडेटिव्ह आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. जे हिवाळ्यात घसा खवखवणे बरे करण्यास मदत करतात. अदरक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील प्रभावी आहे. हृदयविकार, कर्करोग, पाचन समस्या आणि मळमळ यांचा धोका कमी करण्यासाठी देखील ते उपयुक्त आहे. तज्ज्ञांच्या मते, आले विषाणू आणि बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करतात. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या