Home /News /lifestyle /

लग्न टिकून राहण्यासाठी वधू- वरांनी 'या' वैद्यकीय चाचण्या करणं अत्यंत आवश्यक

लग्न टिकून राहण्यासाठी वधू- वरांनी 'या' वैद्यकीय चाचण्या करणं अत्यंत आवश्यक

लग्न टिकून राहण्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मुला-मुलीची जोडी परस्परपूरक असणं आवश्यक आहे.

नवी दिल्ली, 13 सप्टेंबर: आपल्या भारतीय संस्कृतीत लग्न संस्काराला (Marriage) विशेष महत्त्व आहे. लग्न जमवताना मुला-मुलीची पत्रिका (Kundali) जुळणे आवश्यक असते. पत्रिका जुळली नाही तर ते लग्न होत नाही. अनेकदा पत्रिका जुळलेली असूनही लग्न टिकलं नसल्याची अनेक उदाहरणं दिसतात तरीही आजच्या काळात देखील अनेक लोक पत्रिका जुळल्याशिवाय लग्न करण्यास मान्यता देत नाहीत. लग्न टिकून राहण्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मुला-मुलीची जोडी परस्परपूरक असणं आवश्यक आहे. याकरता लग्नापूर्वी वधू-वरांनी काही वैद्यकीय चाचण्या (Medical Tests) करणं महत्त्वाचं आहे, मात्र आजही याबाबतीत मोठ्या प्रमाणात उदासीनता दिसून येते. लग्नानंतर कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी वधू-वरांनी किमान या पाच वैद्यकीय चाचण्या करून घेणं आवश्यक आहे. जाणून घेऊया त्या विषयी. एचआयव्ही चाचणी (HIV Test) : एखाद्या मुलाला किंवा मुलीला एचआयव्ही (HIV) संसर्ग झालेला असेल तर दुसऱ्याचे आयुष्य पूर्णपणे उध्वस्त होऊ शकते. म्हणून, लग्नापूर्वी एचआयव्ही चाचणी करणं अत्यंत आवश्यक आहे. यामुळे फसवणूक टळेल. आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील. ओव्हरी टेस्ट (Ovary Test) : आजकाल मुली बरंच वय झाल्यानंतर लग्न करतात. अशा वेळी मुलीनं आपली ओव्हरी (Ovary Test) म्हणजेच बीजांडांची तपासणी अवश्य करून घ्यावी. वाढत्या वयामुळे मुलींमध्ये स्त्रीबीजांचे उत्पादन कमी होतं, आणि मुलं होण्यात अडचणी येऊ शकतात. यामुळे स्त्रीची आई होण्याची क्षमतादेखील समजू शकते. त्यामुळे उशिरा लग्न करणाऱ्या मुलींनी ओव्हरी टेस्ट करून घेणं महत्त्वाचं आहे.

Body Exercise for men : पिळदार बॉडीसाठी फॉलो करा या सोप्या स्टेप्स

वंध्यत्व चाचणी (Infertility Test) : लग्नापूर्वी मुलांनीही शुक्राणूंची (Sperm) स्थिती आणि संख्या याबाबतची वंध्यत्व चाचणी करून घेणेदेखील महत्वाचं आहे. मूल जन्माला घालण्याबाबत निर्णय घेताना याची मदत होते. गर्भधारणा होण्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी ही चाचणी महत्त्वाची ठरते. लग्नापूर्वीच ही चाचणी केल्यानं काही अडचण असल्यास वेळेवर उपचार घेणंही शक्य होतं. अनुवांशिकता चाचणी (Genetic Test) : लग्नापूर्वी, मुलगा आणि मुलगी दोघांनीही त्यांची अनुवांशिकता चाचणी करणं आवश्यक आहे. ही चाचणी केल्यामुळे आपल्या भावी जोडीदाराला कोणताही अनुवांशिक रोग (Genetic Disorder) नाही याची खात्री करता येईल. काही आजार असल्यास वेळीच उपचार करणं शक्य होतं. एसटीडी चाचणी (STD Test) : लग्नानंतर लैंगिक संक्रमित रोगांची लागण होऊ नये, यासाठी एसटीडी टेस्ट (STD Test) करणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण एसटीडी म्हणजेच सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज (Sexually Transmitted Diseases) हा अत्यंत धोकादायक आजार आहे.

Ear Pain : कानांचा त्रास 'या' घरगुती उपायांनी करा कमी आणि तासाभरात मिळवा आराम!

 रक्त गट चाचणी (Blood Group Compatibility Test) :
पती-पत्नी दोघांचा रक्तगट (Blood Group) एकमेकांशी सुसंगत नसेल तर गर्भधारणेदरम्यान समस्या निर्माण होऊ शकतात. दोघांच्या रक्तगटात आरएच घटक (RH Factor) समान असणं आवश्यक आहे. त्यामुळे लग्नापूर्वीच रक्तगट अनुकूल आहेत याची चाचणी करून घेणं आवश्यक आहे. रक्त विकार चाचणी (ब्लड डिसऑर्डर टेस्ट- Blood Disorder Test) : विवाहापूर्वी मुलींनी ब्लड डिसऑर्डर टेस्ट (Blood Disorder Test) अर्थात रक्त विकार चाचणी करणं आवश्यक आहे. यामुळे हिमोफीलिया किंवा थॅलेसेमिया आहे का याची माहिती मिळते. याचा थेट परिणाम होणाऱ्या अपत्यांवर आणि वैवाहिक जीवनावर होतो. याकरता लग्नापूर्वीच ही चाचणी आवश्यक आहे.

Winter Fruits: थंडीची चाहूल लागताच आहारात 'या' फळांचा करा समावेश

 लग्न टिकून राहण्यासाठी मुला-मुलींच्या वैद्यकीय चाचण्या करणं आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं भविष्यात उद्भवणाऱ्या अडचणींवर आधीच मार्ग काढता येऊ शकतो. नंतर होणारे वाद, लग्न तुटण्याचे प्रसंग टाळता येणं शक्य होतं.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Marriage, Medical

पुढील बातम्या