Home /News /lifestyle /

Essential Nutrition: रोजच्या जेवणातून ही 6 पोषक तत्वे मिळायला हवीत; निरोगी आयुष्याचे सोपे गुपित

Essential Nutrition: रोजच्या जेवणातून ही 6 पोषक तत्वे मिळायला हवीत; निरोगी आयुष्याचे सोपे गुपित

आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेले 6 पोषक घटक म्हणजे जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने, चरबी, पाणी आणि कर्बोदके. निरोगी राहण्यासाठी, आपण दररोज आपल्या आहारात कोणत्या पौष्टिक पदार्थांचा समावेश केला पाहिजे, त्याविषयी जाणून घेऊया.

    मुंबई: 29 जून : धावपळीच्या जीवनशैलीचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होत असून आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होत आहेत. आपल्या शरीराला चांगल्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठी पोषक तत्वांची गरज असते. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे, कार्बोहायड्रेट, प्रथिने यांसह अनेक पोषक घटक असतात. आज आपण जाणून घेणार आहोत की, कोणत्‍या 6 आवश्‍यक पोषक घटकांची आपल्या शरीराला दररोज आवश्‍यकता असते आणि त्यांची कमतरता कशी पूर्ण (Essential Nutrition for Health) करता येईल. 'मेडिकल न्यूज टुडे'च्या वृत्तानुसार, आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेले 6 पोषक घटक म्हणजे जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने, चरबी, पाणी आणि कर्बोदके. निरोगी राहण्यासाठी, आपण दररोज आपल्या आहारात या पौष्टिक पदार्थांचा समावेश केला पाहिजे. या सर्व पोषक तत्वांची कमतरता पूर्ण करून आपण स्वतःला अनेक आजारांपासून वाचवू शकता आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकता. रोगप्रतिकारक शक्ती सुधारून तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता. अशा प्रकारे आवश्यक पोषक तत्वांची कमतरता पूर्ण करा 1. जीवनसत्त्वे ही सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत जी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात, प्रोस्टेट कर्करोग रोखतात, दात आणि हाडे मजबूत करतात, कॅल्शियम शोषण्यास मदत करतात, त्वचा निरोगी ठेवतात आणि मेंदू आणि मज्जासंस्थेच्या कार्यास चालना देतात. फळे आणि भाज्यांमधून आपल्याला भरपूर जीवनसत्त्वे मिळू शकतात. 2. लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड ही प्रमुख खनिजे आहेत. शरीरातील खनिजे पाण्याची पातळी संतुलित करण्यास, त्वचा, केस आणि नखे निरोगी बनविण्यास आणि हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. तुम्हाला ही आवश्यक खनिजे लाल मांस, आयोडीनयुक्त मीठ, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आणि भाज्यांमध्ये मिळू शकतात. 3. प्रथिने हे एक मॅक्रोन्यूट्रिएंट आहे, जे आपल्या शरीरातील पेशींचे कार्य व्यवस्थित ठेवते. प्रथिने आपल्या शरीरातील स्नायू, हाडे, त्वचा, केस यांच्या वाढीस मदत करतात आणि अँटीबॉडीज बनवतात. अंडी, मांस, चिकन, मासे, सीफूड, शेंगा, दूध, दही आणि फळे यांपासून आपल्याला प्रथिने मिळतात. जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्ही तुमच्या आहारात पनीरचा समावेश करू शकता. 4. ठराविक प्रमाणात चरबी आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. चरबी आपल्या शरीराला ऊर्जा देते आणि आरोग्य सुधारण्यास मदत करते. आपल्या पेशी वाढण्यास, स्नायूंच्या हालचाली सुधारण्यास आणि मेंदूचे कार्य सुधारण्यास त्यांची मदत होते. अक्रोड, वनस्पती तेल, मासे आणि ड्रायफ्रुट्समध्ये भरपूर चरबीयुक्त घटक असतात. हे वाचा - पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार 5. कर्बोदके शरीरासाठी आवश्यक असतात. ते शरीरातील सर्व पेशींना ऊर्जा देतात. लोकांनी पांढरी ब्रेड, पास्ता आणि तांदूळ यासारख्या कार्बोहायड्रेट्सचे सेवन मर्यादित केले पाहिजे. कर्बोदके रोगप्रतिकारक शक्ती, मेंदूचे कार्य, मज्जासंस्था आणि पचनसंस्था सुधारण्यास मदत करतात. फळे, भाज्या, ब्राऊन राईस, ओट्स, पास्ता, ब्रेड इत्यादींमधून तुम्हाला भरपूर कार्बोहायड्रेट्स मिळतात. हे वाचा - Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम 6. पाणी शरीरासाठी सर्वात महत्वाचे पोषक तत्वांपैकी एक आहे. कोणालाही सर्व वेळ हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे. डिहायड्रेशनमुळे डोकेदुखी, शारीरिक आणि मानसिक कार्यात समस्या येऊ शकतात. मानवी शरीरात बहुतेक पाण्याचा समावेश होतो आणि शरीराचे कार्य सुधारण्यासाठी ते आवश्यक असते. पाणी आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते, पोषक द्रव्ये वाहून नेते आणि बद्धकोष्ठता कमी करते. आपण दररोज 3 ते 4 लिटर पाणी प्यावे. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या