Home /News /lifestyle /

लिव्हर निरोगी ठेवण्याचा मूलमंत्र, रोज खा हे पदार्थ

लिव्हर निरोगी ठेवण्याचा मूलमंत्र, रोज खा हे पदार्थ

यकृताच्या आरोग्यासाठी रोजच्या आहारात काही काही पदार्थांचा समावेश करणं महत्वाचं आहे. त्यामुळे तुमचं लिव्हर निरोगी होईल.

    लिव्हर हे शरीराचा एक महत्वाचा अवयव आहे. लिव्हर हे शरीराची पचन शक्ती, मेटाबॉलिज्म आणि इम्यूनिटी (प्रतिकारशक्ती) वाढवण्याचं काम करतं. याच्या व्यतिरिक्त आपण जे खातो त्याच्यातील पोषक तत्वांना वेगळं करत शरीर लिव्हरमध्येच साठवून ठेवतं. आणि त्याच्या योग्यवेळी गरजेनुसार वापर केला जातो. लिव्हर काही प्रकारची केमिकल्सही तयार करतं. ज्यामुळे आपल्या शरीरातील अनेक अवयव काम करतात. त्यामुळे यकृत अवयव तर आहेच पण त्याबरोबर ते ग्रंथीचंही काम करतं. पाहायला गेलं तर लिव्हरशिवाय आपलं जीवन शक्य नाही. त्यासाठीच म्हटलं जातं की, जर लिव्हर डॅमेज झाली तर शरीरही डॅमेज होतं. त्यामुळे लिव्हरची देखभाल करणं महत्वाचं आहे. तर काही चुकीच्या सवयींमुळे लिव्हरमध्ये अनेक विषारी पदार्थ (Toxins) जमा होतात. ज्यामुळे लिव्हर चांगल्या पद्धतीने काम करण्यात अडचणी येतात. या सगळ्या विषारी पदार्थांना साफ करण्यासाठी सकस आहार घेणं गरजेचं आहे. काही असे पदार्थ आहेत की खाण्यामुळे तुमची लिव्हर निरोगी राहतं आणि चांगलं काम करतं. हळद - हळद अनेक प्रकारच्या आजारांना शरीरापसून दूर ठेवते. हळदीचं सेवन केल्यानं शरीरामध्ये संसर्गही कमी होतो. हळदीमध्ये मुबलक प्रमाणात असलेले कर्क्युमिन तत्व हे शरीरातील एक महत्वाचं तत्व ग्लुटाथियोन एस-ट्रान्सफरेज (glutathione S-transferase) ची निर्मिती वाढवते. ज्यामुळे लिव्हर डिटॉक्स व्हायला मदत होते. याच्या व्यतिरिक्त हळद नुकसान झालेल्या पेशींना दुरुस्त करण्याचंही काम करते. बीट - बीट खाणंही शरीरासाठी खूप फायदेशीर असतं. याच्यामध्ये मिनरल्स आणि विटामिन्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतं. तर याच्यामध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सीडेंट्स ही उपलब्ध असतं. जे आपल्याला अनेक गंभीर आजारांपासूनही वाचवतं. बीट खाण्यामुळे यकृत चांगल्या पद्धतीने साफ होते. आणि पित्तरसाचीही निर्मिती वाढवतं. बीटामुळे केवळ तुमच्या शरीरातील रक्त वाढतं आणि त्यासोबतच लिव्हरही निरोगी राहतं. बीटामध्ये बीटा-कैरोटीन और फ्लैवोनॉइड्सची चांगल्या प्रमामात असतं. जे यकृताचं कार्य उत्तर बनवतं. चहा आणि कॉफीपेक्षा तुम्ही रोज ग्रीन टी घेतलीत तर ते उत्तमच असेल. तर जास्त प्रमाणात पिण्यामुळेही आपल्या शरीराला नुकसान होऊ शकतं. यासाठी योग्य प्रमाणात ते घेतलेलं चांगलं आहे. सफरचंद - आरोग्यदारी फळांमध्ये सफरचंद एक महत्वाचं फळ आहे. सफरचंदामध्ये आपल्या शरीराला आवश्यक असलेली सर्व पोषक तत्व मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. सफरचंदामध्ये असणारं मैलिक एसिड तुमच्या यकृताला चांगल्या प्रकारे साफ करतं. त्यासोबत रक्त साफ करायलाही मदत करतं. तर सफरचंदामध्ये असणारं पेक्टिन फायबर आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि ह्दयासंबधीच्या आजारांपासून आपल्याला दूर ठेवतं. अक्रोड - तसं पाहिलं तर सगळ्या प्रकारचे नट्स आरोग्यदायी असतात. पण अक्रोडला लिव्हर आणि ह्दयासाठी खूप चांगलं मानलं जातं. अक्रोडमध्ये अर्जीनिन नावाचं एक अॅमिनो अॅसिड असतं. जे लिव्हरची चांगली सफाई करतं. याच्या व्यतिरिक्त ओमेगा-3 फैटी एसिड सुद्धा असतं. जे हृदयासंबंधीत आजारांपासून आपला बचाव करतं.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Health, Lifestyle

    पुढील बातम्या