• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Diabetics type 2 : या 5 पदार्थांनी अचानक वाढू शकते रक्तातील साखरेची पातळी, वेळीच व्हा सावध

Diabetics type 2 : या 5 पदार्थांनी अचानक वाढू शकते रक्तातील साखरेची पातळी, वेळीच व्हा सावध

अन्नातील कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थांनी रक्तातील साखरेची पातळी (Worst Food For Diabetics type 2) वाढते. या पदार्थांचं आपल्या शरीरात शर्करेमध्ये रूपांतर होतं. अशा 5 पदार्थांविषयी आम्ही आपल्याला माहिती देत आहोत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : अनेक आरोग्यवर्धक पदार्थही टाइप 2 मधुमेह (Diabetics type 2) असलेल्या लोकांमध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतात. परंतु, आपल्याला ते पूर्णपणे टाळण्याची गरज नाही. रक्तातील साखरेच्या चांगल्या नियंत्रणासाठी या पदार्थांचं सेवन कमी करण्याची गरज आहे. तुम्हाला टाईप 2 मधुमेह असल्यास, रक्तातील साखरेच्या नियंत्रणासाठी कार्बोहायड्रेटचं प्रमाण मोजण्याचं महत्त्व तुम्हाला माहीत असेलच. अन्नातील कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थांनी रक्तातील साखरेची पातळी (Worst Food For Diabetics type 2) वाढते. या पदार्थांचं आपल्या शरीरात शर्करेमध्ये रूपांतर होतं. अशा 5 पदार्थांविषयी आम्ही आपल्याला माहिती देत आहोत. व्हाइट ग्रेन्स कार्ब्सचे स्त्रोत असतात पांढरा ब्रेड, पास्ता आणि तांदूळ यासारखं पांढरं धान्य हे कार्बोहायड्रेटचे स्त्रोत आहेत. यांच्यातील तंतुमय पदार्थ (फायबर - Fiber) प्रक्रियेदरम्यान बऱ्याच प्रमाणात काढले गेलेले असतात. फायबरचे अनेक फायदे आहेत. हे शरीराद्वारे पचवलं जात नाही. याच्यामुळं आतड्यांच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो आणि रक्तातील साखरेची पातळीकमी राहण्यास मदत होते. साखर मोठ्या प्रमाणात असलेल्या गोड पेयांमध्ये पोषक घटक कमी असतात तुम्ही साखर मोठ्या प्रमाणात असलेली पेये पीत असाल किंवा कोल्ड ड्रिंक्स घेत असाल तर रक्तातील साखर नियंत्रित करणे खरोखरच कठीण आहे. सोडा, आईस टीमध्ये साखर मोठ्या प्रमाणात असते. शिवाय, फळांच्या ज्यूससारख्या पेयांमध्ये प्रथिनं, स्निग्ध पदार्थ किंवा फायबर राहिलेले नसतात. फ्रूट ज्यूसपेक्षा फळं चावून खाणं अधिक चांगलं ठरतं. हे वाचा - Smartphone च्या या App ने घटवलं Heart Attack चं प्रमाण, वाचा काय आहे हे अ‍ॅप्लिकेशन फास्ट फूड फास्ट फूडमुळं आरोग्य बिघडतं. हॅम्बर्गर आणि फ्रेंच फ्राईजसारख्या पदार्थांमध्ये फक्त कॅलरी आणि चरबी जास्त असते, असं आपल्याला वाटतं. मात्र, फास्ट फूडमध्ये साखर आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्सदेखील जास्त असतात. ते शरीराला हानीकारक असतात. स्टार्च भाज्या, जे मोठ्या प्रमाणात साखरेची पातळी अस्थिर करू शकतात मटार आणि कॉर्न सारख्या इतर स्टार्च भाज्या साखरेची पातळी वाढवू शकतात. हे पदार्थ ब्रोकोली, फुलकोबी, कोबी आणि लेट्यूस सारख्या स्टार्च नसलेल्या भाज्यांपेक्षा जास्त प्रमाणात कार्ब्स असलेले असतात. मात्र, या आहारातून पूर्णपणे वगळण्याची गरज नाही. त्यातून चांगलं आणि पोषक घटकही मिळतात. हे वाचा - एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे सनी देओलची पत्नी!मात्र प्रसिद्धीपासून राहते दूर नॉन डेअरी दूध दुग्धजन्य पदार्थांचा विचार करायचा तर दूधही कर्बोदकांमध्ये गणलं जातं. परंतु ते कमी जीआय (ग्लायसेमिक इंडेक्स)कार्ब आहे. ते फारसं हानीकारक नाही. मात्र, प्राण्यांपासून नव्हे तर, वनस्पतींपासून मिळणाऱ्या दुधात (सोया मिल्क इ.) कार्बचं प्रमाण जास्त असतं. (सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
  Published by:News18 Desk
  First published: