मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Corona Omicron: कोरोनाच्या सौम्य लक्षणांना घातक बनवतील तुमच्या या 5 चुका; या गोष्टींची काळजी घ्या

Corona Omicron: कोरोनाच्या सौम्य लक्षणांना घातक बनवतील तुमच्या या 5 चुका; या गोष्टींची काळजी घ्या

या आजाराबाबत निष्काळजी राहिल्यास सौम्य संसर्ग गंभीर स्वरूप घेऊ शकतो. कोविड-19 च्या नवीन प्रकाराचा (ओमिक्रॉन) संसर्ग झाल्यावर काही आवश्यक खबरदारी घ्यावी, असं तज्ज्ञांनी सुचवले आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 13 जानेवारी : कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन (Corona Omicron) प्रकाराचे रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत. अशा परिस्थितीत, संसर्ग झाल्यावर सौम्य लक्षणांकडे दुर्लक्ष न करणं आणि ताबडतोब चाचणी करून उपचार सुरू करणं महत्त्वाचं आहे. या आजाराबाबत निष्काळजी राहिल्यास सौम्य संसर्ग गंभीर स्वरूप घेऊ शकतो. कोविड-19 च्या नवीन प्रकाराचा (ओमिक्रॉन) संसर्ग झाल्यावर काही आवश्यक खबरदारी घ्यावी, असं तज्ज्ञांनी सुचवले आहे.

लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

झी न्यूजनं दिलेल्या माहितीनुसार, ओमिक्रॉन संसर्गग्रस्तांना पहिले तीन ते पाच दिवस घसा खवखवणं आणि ताप येणं अशी लक्षणं दिसतात. यादरम्यान, 102-103 अंशांपर्यंत ताप येऊ शकतो. अंगदुखी आणि डोकेदुखीच्या तक्रारीही लोकांमध्ये दिसून येत आहेत. तेव्हा कोरोनाच्या सामान्य आणि गंभीर लक्षणांवर लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. अगदी सौम्य लक्षणंही गांभीर्याने घ्या. विषाणूजन्य तापाप्रमाणे उपचार करू नका. तुम्हाला कोणतीही चिन्हं दिसल्यास त्वरित कोविड चाचणी करा.

डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घ्या

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधं घ्या. विनाकारण स्टिरॉइड्स वापरू नका. कोरोनाची लागण झाल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेतल्यास हा आजार गंभीर रूप घेऊ शकतो.

उशीरा चाचणी केल्यास तोपर्यंत रोग वाढतो

बहुतेक लोक चाचणी उशिरानं करतात. यामुळं आजार वाढू शकतो. चाचणीसाठी उशीर करू नका आणि शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे त्वरित लक्ष द्या. चाचणीपूर्वी आणि नंतर विलगीकरणामध्ये रहा.

हे वाचा - Omicron Symptoms: ओमायक्रॉनची लक्षणे काय? संसर्ग झालाय हे कसं ओळखाल? वाचा तज्ज्ञांचं मत

उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची समस्या असल्यास

उच्च रक्तदाब किंवा मधुमेहाच्या रुग्णांना कोरोना संसर्गानंतर जास्त त्रास होतो. त्यामुळं अशा रुग्णांना अधिक सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. कोविड-19 ची बहुतेक प्रकरणं सौम्य लक्षणांनी सुरू होतात. परंतु, नवीन प्रकारांच्या कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढत असताना आजार गंभीर रूप धारण करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हे वाचा - RTPCR रिपोर्ट निगेटिव्ह आलाय तरीपण कोरोनाची लक्षणं आहेत; हे कारण असू शकते

पहिल्या दिवसापासून लक्षणं नियंत्रित करण्यासाठी उपचार करा

डॉक्टरांच्या मते, रुग्णांनी लक्षणं दिसल्याच्या पहिल्या दिवसापासून यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोविड-19 च्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका आणि बरे होत असताना लक्षणं गंभीर स्वरूप धारण करणार नाहीत याची विशेष काळजी घ्या.

First published:

Tags: Corona, Coronavirus, Health Tips