मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /`या` चार राशीच्या व्यक्तींमध्ये असतं मल्टिटास्किंगचं कसब; अनेक कामं एकाचवेळी करतात पूर्ण

`या` चार राशीच्या व्यक्तींमध्ये असतं मल्टिटास्किंगचं कसब; अनेक कामं एकाचवेळी करतात पूर्ण

काही राशींचे लोक मल्टिटास्कर असतात. त्यात प्रामुख्यानं सिंह, मीन, कर्क आणि वृश्चिक या राशींचा समावेश होतो.

काही राशींचे लोक मल्टिटास्कर असतात. त्यात प्रामुख्यानं सिंह, मीन, कर्क आणि वृश्चिक या राशींचा समावेश होतो.

काही राशींचे लोक मल्टिटास्कर असतात. त्यात प्रामुख्यानं सिंह, मीन, कर्क आणि वृश्चिक या राशींचा समावेश होतो.

    मुंबई,  24 डिसेंबर:  मानवी जीवनावर 9 ग्रह, 27 नक्षत्रं आणि 12 राशी परिणाम करतात, असं ज्योतिष शास्त्र (Jyotish Shastra) सांगतं. राशीचे गुणधर्म मानवी स्वभावातही दिसून येतात. दैनंदिन जीवनात हे गुणधर्म आपल्याला आसपासच्या व्यक्तींमध्ये दिसून येतात. काही लोक आपलं काम अत्यंत कमी कालावधीत आणि वेळेपूर्वी पूर्ण करतात, तर काही लोकांना कामं पेंडिंग ठेवण्याची किंवा सावकाश पूर्ण करण्याची सवय असते. हा स्वभावाचा भाग असला तरी ही गोष्ट संबंधित व्यक्तीच्या राशीवर अवलंबून असल्याचं ज्योतिष शास्त्राचे अभ्यास सांगतात. काही राशींचे लोक हे मल्टिटास्कर (Multitasker) असतात. या लोकांकडं अनेक कामं एकाचवेळी आणि वेळेत पूर्ण करण्याची हातोटी असते. अशा राशींची माहिती `टीव्ही नाइन हिंदी`ने दिली आहे.

    जीवनात यशस्वी व्हावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी प्रत्येकजण परिश्रम करत असतो. नाव, पैसा मिळवण्यासाठी काही लोक एकापेक्षा अधिक कामं, व्यवसाय करत असतात. एकापेक्षा अधिक कामं, व्यवसाय करणं प्रत्येकाला शक्य होतं असं नाही. त्यासाठी काही अंगभूत गुण महत्त्वाचे असतात. ही बाब तुमच्या राशीवर अवलंबून असते. काही राशींचे लोक मल्टिटास्कर असतात. त्यात प्रामुख्यानं सिंह, मीन, कर्क आणि वृश्चिक या राशींचा समावेश होतो.

    वृश्चिक (Scorpion) :

    वृश्चिक राशीचे लोक मेहनती आणि मल्टिटास्क करणारे असतात. एकावेळी अनेक कामं करण्याचं कसब या राशीच्या लोकांकडं असतं. आपलं काम वेळेपूर्वी पूर्ण करण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या क्षमतेवर गर्व असतो.

    आता Burger खाता खाताच घटवा वजन; McDonald’s ने शोधला सॉलिड उपाय; पाहा VIDEO

    कर्क (Cancer) :

    कर्क रास असलेले लोकदेखील मल्टिटास्क करणारे असतात. ते एकावेळी अनेक कामं अगदी सहजपणे करू शकतात. हे लोक इतरांसाठी प्रेरणादायी असतात. मल्टिटास्क करण्याच्या सवयीमुळे या लोकांना बऱ्याचदा अनेक कामं एकावेळी करावी लागतात. हे लोक कधीही आळशीपणा करत नाहीत. वेळेपूर्वी काम पूर्ण करण्याच्या सवयीमुळे हे लोक अन्य लोकांसाठी प्रेरणादायी ठरतात.

    सिंह (Leo) :

    सिंह राशीच्या लोकांना मल्टिटास्किंग आवडतं. हे लोक एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रीत करू शकत नाहीत. बऱ्याचदा मनःशांतीसाठी त्यांना अनेक कामं करावी लागतात. या राशीचे लोक खूप विचार करतात. या लोकांना विचारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मन व्यस्त ठेवणं गरजेचं असतं. अशा परिस्थितीत मल्टिटास्किंगमुळे (Multitasking) त्यांना त्याचं कौशल्य दाखवण्याची आणि प्रशंसा मिळवण्याची संधी मिळते. दुसऱ्याचं लक्ष वेधून घेण्याचं कौशल्य देखील या लोकांच्या स्वभावात असतं. या कारणांमुळे या लोकांना मल्टिटास्किंग करणं आवडतं.

    मीन (Pisces) :

    मीन राशीच्या लोकांना एका वेळी अनेक कामं करायला आवडतं. या लोकांना वेळ वाया घालवणं आवडत नाही. या राशीच्या लोकांनी एकदा ध्येय निश्चित केलं की ते पूर्ण करण्यासाठी 24 तास देखील काम करू शकतात. मल्टिटास्किंग हे या राशीच्या लोकांच्या क्षमतेचं आणि प्रतिभेचं प्रतिबिंब असतं.

    First published:

    Tags: Astrology and horoscope, Zodiac signs