नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी : लग्न म्हणजे नेमकं काय असतं? लग्न (Marriage Life) झाल्यावर आपल्याला ही गोष्ट पूर्णपणे समजू लागते. प्रत्येक लग्नात काही गोष्टी नक्कीच कॉमन असतात पण तरीही प्रत्येक लग्न वेगळं असतं. लग्नाचे यश कोणावरही अवलंबून नसते, तर दोन्ही जोडीदार मिळून हे नातं पुढे नेतात. अनेकवेळा असे घडते की पती-पत्नीमध्ये खूप प्रेम आणि समज असूनही त्यांच्यात भांडणे होतात (Arguments happen). खरं तर या भांडणांशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याची माहिती लग्नाआधी आपल्याला असणं आवश्यक आहे, कारण ज्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो, त्याच गोष्टी नंतर पुढे जाण्यासाठी समस्या बनतात. यामुळे लग्न करण्यापूर्वी काही गोष्टी जाणून (Happy Marriage Tips) घेतल्या पाहिजेत.
तुम्हाला लग्न नेमकं का करायचं आहे?
हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार, लग्न हा तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे, पण तुमच्या आयुष्याचा आधार फक्त लग्नच आहे असे नाही. त्यामुळे सर्वप्रथम स्वतःला विचारा की तुम्ही एखाद्या व्यक्तीशी लग्न का करत आहात? तुमची चेकलिस्ट पूर्ण करण्यासाठी तुम्ही लग्न करत आहात का? की आणखी काही कारण आहे? हे प्रश्न स्वतःच स्वत:ला केल्याने तुम्हाला बरंच काही स्पष्ट होईल.
तुम्ही कुटुंबात मिक्सअप व्हायला तयार आहात का?
लग्न करताना प्रत्येकजण आपल्या जोडीदाराविषयीच माहिती घेतो, पण जोडीदाराचा परिवारही तितकाच महत्त्वाचा असतो. यात जर तुम्ही वधू असाल तर जबाबदारी आणखी वाढते. अशा स्थितीत नंतर काही अडचण येण्याआधी, मोकळेपणाने बोला, लग्नानंतर कुटुंबासोबत कसे राहावे लागेल? तुम्ही संयुक्त कुटुंबात राहाल की पती-पत्नी दोघे वेगळे राहाल? याविषयी आधीच माहिती घ्या.
हे वाचा -
बेडरूममध्ये पलंगाच्या आत किंवा खाली या वस्तू ठेवू नये; होऊ शकते आर्थिक नुकसान
करिअरचे काय?
लग्नापूर्वी ही गोष्ट देखील स्पष्ट ठेवा की, लग्नानंतर तुम्ही कोणत्या शहरात काम कराल किंवा तुमच्या नोकरीचे स्वरूप काय असेल. जर तुम्ही परदेशात किंवा इतर कोणत्याही शहरात कामाला जात असाल तर तुमच्या जोडीदाराकडून तुमच्या करिअर आणि नोकरीबाबत काही गोष्टी नक्कीच स्पष्ट करून घ्या. त्याचबरोबर अनेक मुलींच्या नोकरीमुळे पुढे कुटुंबात निराशेचे वातावरण तयार होते. अशा स्थितीत दोन्ही बाजूंनी हे स्पष्ट व्हायला हवे की, नोकरी करणाऱ्या सुनेची कोणाला काही अडचण आहे का? त्याचबरोबर मुलीनेही तिच्या करिअरशी निगडीत बाब स्पष्ट केल्यानंतरच लग्नाला हो म्हणायला हवं.
हे वाचा -
लग्नापूर्वी नवरीच्या हातावर का काढली जाते मेहंदी?जाणून घ्या कारण
कुटुंब नियोजन
कुटुंब नियोजनाबाबत काही गोष्टी स्पष्ट करणेही महत्त्वाचे आहे. अनेक जोडप्यांना लग्नानंतर मूल दत्तक घ्यायचे असते. अशा परिस्थितीत जर जोडीदाराचे मत तुमच्यापेक्षा वेगळे असेल तर तुमच्यात भांडणे आणि तणावाची परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे लग्नापूर्वी, जोडीदाराकडून आपल्या मुलाबद्दल भविष्यातील नियोजन काय आहे हे स्पष्ट करा म्हणजे नंतर वाद नकोत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.