मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Monsoon Food: पावसाळ्याच्या दिवसात रात्री कधीच खाऊ नयेत हे 4 पदार्थ; अचानक त्रास वाढतात

Monsoon Food: पावसाळ्याच्या दिवसात रात्री कधीच खाऊ नयेत हे 4 पदार्थ; अचानक त्रास वाढतात

पावसाळ्याच्या काळात खाण्या-पिण्याच्याबाबती छोटीशी चूक देखील आपल्याला आजारी बनवू शकते. त्यामुळे आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही खाद्यपदार्थांबद्दल सांगत आहोत, जे तुम्ही पावसाळ्यात रात्रीच्या वेळी पूर्णपणे खाणे टाळावे-

पावसाळ्याच्या काळात खाण्या-पिण्याच्याबाबती छोटीशी चूक देखील आपल्याला आजारी बनवू शकते. त्यामुळे आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही खाद्यपदार्थांबद्दल सांगत आहोत, जे तुम्ही पावसाळ्यात रात्रीच्या वेळी पूर्णपणे खाणे टाळावे-

पावसाळ्याच्या काळात खाण्या-पिण्याच्याबाबती छोटीशी चूक देखील आपल्याला आजारी बनवू शकते. त्यामुळे आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही खाद्यपदार्थांबद्दल सांगत आहोत, जे तुम्ही पावसाळ्यात रात्रीच्या वेळी पूर्णपणे खाणे टाळावे-

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 10 जुलै : पावसाळा हा बहुतेक लोकांना खूप आवडतो. खाद्यप्रेमींसाठी हा ऋतू स्वर्गापेक्षा कमी नाही. या ऋतूमध्ये आवडीचे पदार्थ खाण्याची लालसा अनेक पटींनी वाढते. पण, दुसरीकडे या ऋतूत स्वत:ला निरोगी ठेवायचे असेल तर आपल्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

विशेषत: संध्याकाळी आणि रात्री जेव्हा वातावरण खूप आल्हाददायक असते, तेव्हा तळलेल्या पदार्थांपासून ते स्टॉल्सवरील चटपटीत पदार्थ लोकांना खायला आवडतात. मात्र, या काळात आपली एक छोटीशी चूक देखील आपल्याला आजारी बनवू शकते. त्यामुळे आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही खाद्यपदार्थांबद्दल सांगत आहोत, जे तुम्ही पावसाळ्यात रात्रीच्या वेळी पूर्णपणे खाणे टाळावे-

तेलकट आणि तळलेले पदार्थ -

पावसाळ्यात अनेकदा लोकांना संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळीस घराबाहेर पडून रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉल्सवर जाऊन पकोडे, समोसे आणि टिक्की खायला आवडते. मात्र, आपण असं अजिबात करू नये. वास्तविक, स्टॉल्सवर मिळणारे तेलकट आणि तळलेले पदार्थ तुम्हाला आजारी पाडू शकतात. कारण ते खुल्या वातावरणात शिजवले जातात, ज्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते.

जर तुम्हाला ते खायचेच असतील तर तुम्ही ते घरी बनवू शकता आणि एअर फ्रायर वापरू शकता. मात्र, तरीही ते रात्री अजिबात खाऊ नका. वास्तविक, पचनास तेलकट पदार्थ खूप जड असतात आणि जर ते रात्री खाल्ले तर ते अन्न पचवण्याच्या शरीराच्या क्षमतेमध्ये अडथळा आणू शकतात, ज्यामुळे तुमच्यासाठी समस्या उद्भवू शकतात.

हिरव्या पालेभाज्या -

हिरव्या पालेभाज्या खाणं आरोग्यासाठी खूप चांगले मानले जात असले तरी पावसाळा आला की ते टाळणेच योग्य ठरते. विशेषत: रात्रीच्या वेळी त्या अजिबात खाऊ नयेत. कारण या हंगामात या हिरव्या भाज्यांच्या पानांमध्ये आपल्याला हानी पोहोचवणारे कीटक असू शकतात आणि रात्री बनवले तर ते तुम्हाला सहज दिसणार नाहीत आणि त्यामुळे आपण आजारी पडू शकता.

हे वाचा - Health Tips : रात्रीच्यावेळी कोणत्या कुशीवर झोपणे असते अधिक फायदेशीर?

दही -

दही हे प्रोबायोटिक आहे आणि म्हणूनच प्रत्येकाने त्याचा आहारात समावेश करण्याची शिफारस केली जाते. मात्र, योग्य वेळी ते खाणे गरजेचे आहे. दह्यात कूलिंग इफेक्ट असतो आणि म्हणूनच पावसाळ्यात रात्रीच्या आहारात दही खाणे आरोग्यासाठी चांगले असते. विशेषत: ज्या लोकांना आधीच सायनुसायटिसचा त्रास आहे, त्यांनी दही अजिबात खाऊ नये. कोणतीही सर्दी सायनुसायटिस खराब करते आणि रात्री दही किंवा ताक खोकला वाढवू शकतो.

हे वाचा - महागड्या आणि केमिकल हेअर रिमूव्हल क्रीम खरेदी करू नका; हा आहे सोपा घरगुती उपाय

सीफूडला नाही म्हणा -

पावसाळ्यात समुद्रातील खाद्यपदार्थ पूर्णपणे टाळावेत, वेळ कोणतीही असो. तुम्ही सीफूड प्रेमी असाल, तरीही तुम्हाला जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. वास्तविक, पावसाळ्यात पाणी दूषित होते आणि अशा परिस्थितीत तुम्ही जे मासे किंवा कोळंबी खातात ते तुम्हाला आजारी पाडू शकतात आणि अतिसार आणि इतर आरोग्य समस्या निर्माण करू शकतात.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Health Tips