मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

पावसाळ्यात मुलांना सर्दी-पडसं होण्याची वाटतेय भिती? या गोष्टी करा अन् बिनधास्त रहा

पावसाळ्यात मुलांना सर्दी-पडसं होण्याची वाटतेय भिती? या गोष्टी करा अन् बिनधास्त रहा

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

बदलत्या हवामानाचा प्रत्येक वयोगटावर परिणाम होतो. मात्र, याचा सर्वाधिक फटका मुलांना बसतो. त्यांना आजारी पडू नये म्हणून तुम्ही तुमच्या आईने दिलेल्या या टिप्स वापरून पाहू शकता.

    मुंबई, 9 ऑगस्ट : पावसाळ्यात सर्दी-पडसं (Viral Cold and Fever) होणं ही साधारण बाब असते. वातावरणातला बदल, पाण्याशी आलेला संपर्क, अशा बऱ्याच गोष्टींमुळे अनेक जण आजारी पडतात. विशेषतः लहान मुलांना याचा धोका अधिक असतो. मिशिगन सीएस मॉट चिल्ड्रन रुग्णालयाने केलेल्या सर्व्हेनुसार, तीन ते सहा वर्षांच्या मुलांना दर वर्षी एक ते दोन वेळा सर्दी नक्कीच होते. ही सर्दी सुमारे दोन आठवड्यांपर्यंत राहू शकते. अर्थात यापासून बचावासाठी आपल्याकडे कित्येक घरगुती उपाय (Home remedies for Cold and Cough) परंपरागत चालत आले आहेत. यातल्या काही उपायांची माहिती घेऊ या. 'हेल्थशॉट्स' या वेबसाइटने याबाबतच्या माहितीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. अशी घ्या खबरदारी सध्या कोरोनामुळे सर्वांनाच वैयक्तिक स्वच्छतेचं महत्त्व माहिती झालं आहे. आपल्या मुलांनाही वारंवार हात-पाय धुण्याची सवय (Habit of Cleaning Hands) लावणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी साबण-पाणी उपलब्ध नसेल, त्या ठिकाणी अल्कोहोल-बेस्ड हँड सॅनिटायझर वापरणंही योग्य ठरते. शिंकल्यामुळे किंवा अन्य गोष्टींमुळे सर्दीचे विषाणू विशेषतः हातावर राहतात. हे हात डोळे, तोंड, नाक अशा ठिकाणी लागल्यास त्यामार्फत विषाणू (Germs enter through face, nose and eyes) शरीरात प्रवेश करू शकतात. त्यामुळे तुम्ही स्वतःदेखील वारंवार हात धुण्याची सवय लावायला हवी आणि मुलांनाही त्याबद्दल मार्गदर्शन करावं. तसेच, मुलांना तोंड, डोळे, नाक अशा ठिकाणी वारंवार स्पर्श न करण्यासही सांगावं. फ्लूची लक्षणं ताप येणं, थंडी वाजणं आणि अंगदुखी ही फ्लूची (Symptoms of Flu) सर्वसाधारण लक्षणं आहेत. दहा दिवसांपेक्षा जास्त काळ ही लक्षणं दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं ठरतं. मूल तीन महिन्यांपेक्षा कमी वयाचं असेल, तरी आजारी पडल्यानंतर त्वरित डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. मुलाला झालेली सर्दी हवामानातल्या बदलामुळे झालेली साधारण सर्दी (Viral Cold) आहे, की फ्लू आहे याचं निदान डॉक्टर करू शकतात. त्यानुसार मग तुम्ही पुढील उपचार करू शकता. वाचा - अनेक राज्यांमध्ये डायरियाचा उद्रेक, आजार होऊ नये यासाठी 'या' गोष्टी टाळा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय आपल्याकडे आजीबाईंच्या बटव्यात लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती (Immunity Boosting in Kids) वाढवण्यासाठी कित्येक उपाय आहेत. त्यातला एक उपाय म्हणजे ओव्याचं पाणी. आपल्याला माहिती आहे की ओवा हा पोटदुखीसाठी गुणकारी असतो; मात्र रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही त्याचा वापर होऊ शकतो. यासाठी एक मोठा चमचा भरून ओवा एक ग्लास पाण्यात (Ajwain Water benefits) उकळून घ्या. हे पाणी निम्मं होईपर्यंत उकळत राहा. त्यानंतर हे पाणी थंड करून थोड्या-थोड्या वेळाने एक-दोन चमचे एवढ्या प्रमाणात मुलांना पाजत राहा. मूल मोठं असेल तर अर्धा कप पाणी प्यायला देण्यासही हरकत नाही.

    वाचा -Zoonotic lagnya Virus : कोरोना, मंकीपॉक्सनंतर आता लँग्या व्हायरस; 35 रुग्ण आढळले, अशी आहेत लक्षणं

    यासोबतच हळदीच्या दुधाचे (Turmeric Milk Health Benefits) औषधी गुणधर्मदेखील तुम्हाला माहिती असतील. खोकला झाल्यानंतर जवळपास सर्वांच्या घरात पहिल्यांदा त्या व्यक्तीला दूध-हळद दिलं जातं. लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीदेखील दूध-हळद गुणकारी ठरतं. दुधामध्ये हळद उकळून, ते कोमट झाल्यानंतर लहान मुलांना प्यायला (immunity Boosting Drinks) द्यावं. यासाठी कच्ची हळद वापरल्यास आणखी उत्तम; मात्र ती उपलब्ध नसल्यास स्वयंपाकघरातली साधी हळददेखील तुम्ही वापरू शकता. अशा प्रकारे घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही आपल्या मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकता.
    First published:

    Tags: Health Tips

    पुढील बातम्या