मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

स्वप्नात या 4 गोष्टी पाहणं शुभसंकेत मानले जातात; सुख-समृद्धीमध्ये होते भरभराट

स्वप्नात या 4 गोष्टी पाहणं शुभसंकेत मानले जातात; सुख-समृद्धीमध्ये होते भरभराट

स्वप्न शास्त्रानुसार अशी काही स्वप्ने आहेत, जी आपल्याला भविष्यातील घडामोडींचे शुभ संकेत देतात. भोपाळचे ज्योतिषी पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी आपल्याला अशाच काही स्वप्नांबद्दल सांगितले आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 19 जून : झोपेत स्वप्न पाहणे ही एक कॉमन प्रक्रिया आहे. कोणते स्वप्न आपल्याला दिसेल यावर कशाचेच नियंत्रण नसते. असे मानले जाते की, प्रत्येक स्वप्न आपल्याला आगामी भविष्याबद्दल काही संकेत देते. आपल्याला फक्त हे संकेत समजून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीला पडणारी स्वप्न वेगळी असतात. काही लोकांना चांगली स्वप्ने पडतात, तर काहींना वाईट स्वप्ने पडतात. स्वप्न शास्त्रानुसार अशी काही स्वप्ने आहेत, जी आपल्याला भविष्यातील घडामोडींचे शुभ संकेत देतात. भोपाळचे ज्योतिषी पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी आपल्याला अशाच काही स्वप्नांबद्दल सांगितले आहे. जे स्वप्नशास्त्रानुसार खूप शुभ मानली जातात. जाणून घेऊया कोणती (Swapna Shastra) आहेत ती स्वप्ने?

- सूर्यप्रकाश पाहणे

स्वप्न शास्त्रानुसार तेजस्वी सूर्यप्रकाश पाहणे हे शुभ स्वप्न मानले जाते. शास्त्रामध्ये सूर्याला नवीन जीवनाचा उदय आणि प्रतीक मानले गेले आहे, त्यामुळे स्वप्नात तेजस्वी सूर्यप्रकाश पाहण्याचा अर्थ असा आहे की, तुमच्या जीवनात लवकरच नवीन बदल घडणार आहेत, जे तुमच्यासाठी शुभ असतील. याशिवाय नोकरी, व्यवसायात प्रगतीचे संकेत मिळू शकतात.

- थंडीमध्ये स्वतःला थंडी वाजताना पाहणे

तुमचा स्वप्नशास्त्रावर विश्वास असेल तर, स्वप्नात स्वतःला थंडी वाजताना पाहणे हे देखील एक शुभ स्वप्न आहे. हे स्वप्न याचे लक्षण आहे की, तुमचा वाईट काळ संपला आहे आणि येणारा काळ आपल्यासाठी प्रगतीचा असेल. याशिवाय, याशिवाय त्याच असाही अर्थ होतो की, आजपर्यंत तुमचे जे काही काम काही कारणास्तव अडकले आहे, ते लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.

- खरेदी करणे

असे मानले जाते की स्वप्नात स्वतःला बाजारात खरेदी करताना पाहणेही खूप शुभ असते. हे स्वप्न सूचित करते की, तुमच्या जीवनातून आर्थिक संकटे दूर होणार आहेत आणि लवकरच तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. याशिवाय व्यवसायातही लाभ होण्याचे संकेत आहेत.

हे वाचा - पावसाळा सुरू होताच मुलांना ताप भरतो; या 6 गोष्टींची घ्या नीट काळजी

- स्वप्नात हवाई प्रवास

जर तुम्ही स्वप्नात स्वत:ला हवाई प्रवास करताना पाहत असाल तर ते तुमच्यासाठी शुभ संकेत ठरू शकते. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की, तुमचा येणारा काळ खूप चांगला असेल. तुम्ही सुरू केलेली सर्व कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील. नोकरी आणि व्यवसायात मोठे यश मिळू शकते.

हे वाचा -  आपल्या चेहऱ्यावर भुवया का असतात? कारण आहे खूपच खास

(सूचना : येथे दिलेली माहिती स्वप्नशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Lifestyle, Vastu