मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /General Medical Check Up : घरच्या घरी करा या 3 सोप्या टेस्ट; 30 सेकंदात कळेल तुम्ही किती निरोगी आहात

General Medical Check Up : घरच्या घरी करा या 3 सोप्या टेस्ट; 30 सेकंदात कळेल तुम्ही किती निरोगी आहात

रोजच्या कामांमध्ये आरोग्य तपासणीसाठी वेळ काढणं लोकांना अवघड आहे. परंतु, वर्षातून एकदा शरीराची सामान्य तपासणी (general medical check up) करून आपण गंभीर आजार वेळेत ओळखू शकतो. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही घरबसल्यादेखील काही सोप्या चाचण्यांद्वारे तुमचं आरोग्य तपासू शकता.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 02 डिसेंबर : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात निरोगी आयुष्यासाठी (Healthy life) शरीराची नियमित तपासणी करणं अत्यंत आवश्यक आहे. रोजच्या कामांमध्ये आरोग्य तपासणीसाठी वेळ काढणं लोकांना अवघड आहे. परंतु, वर्षातून एकदा शरीराची सामान्य तपासणी (general medical check up) करून आपण गंभीर आजार वेळेत ओळखू शकतो. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही घरबसल्यादेखील काही सोप्या चाचण्यांद्वारे तुमचं आरोग्य तपासू शकता. व्यायाम प्रकार काही सेकंदात तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक खास गोष्टी सांगू शकतात. याबाबत 'आज तक'ने माहिती दिली आहे.

पहिला व्यायाम -

दोन्ही हातांची बोटं तळहातावर दाबून मूठ तयार करा. हात सुमारे 30 सेकंद या स्थितीत ठेवा. जेव्हा तुम्ही तुमचे हात उघडता तेव्हा तुमचे तळवे थोडे पांढरे होतील. रक्त प्रवाह कमी झाल्यामुळे हे घडतं. यानंतर तळहातांचा रंग पूर्वीसारखा किती काळ सामान्य राहतो, हे पाहावं लागेल. यामध्ये हात किंचित सुन्न होऊ शकतात किंवा तळहातांपर्यंत रक्त पोहोचण्यास वेळ लागू शकतो. हे आर्टिरियोवेनस सोरायसिसचं (Arteriovenous psoriasis) लक्षण असू शकतं. यामध्ये ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक द्रव्यं हृदयापासून शरीराच्या इतर भागापर्यंत पोहोचवणाऱ्या रक्तवाहिन्या जाड आणि कडक होतात.

दुसरा व्यायाम -

या चाचणीमध्ये नखांची मुळं 5 सेकंद दाबून आरोग्य तपासलं जातं. यामध्ये हाताची नखं 5 सेकंद दाबली जातात. मागील व्यायामाप्रमाणे, तुमची नखं काही काळ पांढरी होऊ शकतात. रक्तप्रवाह नखांवर परत येण्यासाठी 3 सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागू नये. लक्षात ठेवा, प्रत्येक बोटावर होणारी रक्त प्रवाहाची हालचाल (movement of blood flow) भिन्न रोगांची लक्षणं दर्शवते.

हे वाचा - खाद्य पदार्थांमध्ये हिंगाचा अतिवापर ठरतो हानीकारक; या लोकांनी विशेष काळजी घेण्याची गरज

जर तुम्हाला अंगठ्यात दुखत असेल, तर ते श्वसनाच्या समस्येचं लक्षण असू शकतं. तर्जनी म्हणजेच अंगठ्याच्या पुढील बोट हे मोठ्या आतड्यात किंवा पचनसंस्थेतील बिघाडाचं लक्षण असू शकतं. मधले बोट आणि अनामिका (करंगळीच्या शेजारचे) ही बोटं हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे रोग सूचित करतात. हाताच्या करंगळीत दुखण्याची समस्या हा लहान आतड्यात बिघाड होण्याचा इशारा असू शकतो.

हे वाचा - Health Tips: तुम्हाला माहीत आहे का? या गोष्टी शिजवून खाणं आरोग्यासाठी असतं अपायकारक

तिसरा व्यायाम-

या चाचणीसाठी, पालथे/तोंड खाली करून जमिनीवर सरळ झोपा. नंतर हात शरीराच्या सरळ रेषेत आणा आणि हळूहळू दोन्ही पाय वर करा. सुमारे 30 सेकंद शरीराला या स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला असं करण्यात अडचण येत असेल, तर ही पाठ किंवा पोटाच्या खालच्या भागाशी संबंधित समस्या असू शकते.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Health, Health Tips